Virat Kohli याची टीम इंडियाच्या विजयानंतर जाहीर माफी, नक्की काय झालं?
Virat Kohli Apologized | विराटने टीम इंडिया विजयात सर्वाधिक योगदान दिलं. विराटने सर्वाधिक नाबाद 103 धावा केल्या. त्यानंतरही विराटने सर्वांसमोर माफी का मागितली? जाणून घ्या.
पुणे | टीम इंडियाने आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील 17 वा सामना जिंकला आहे. टीम इंडियाने बांगलादेशवर 7 विकेट्सने विजय मिळवला. टीम इंडियाचा वर्ल्ड कपमधील सलग चौथा विजय ठरला. टीम इंडियाने विजयासाठी मिळालेलं 257 धावांचं आव्हान हे 41.3 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. टीम इंडियाकडून कॅप्टन रोहित शर्मा याने 48 धावा केल्या. शुबमन गिल याने 53 धावांची अर्धशतकी खेळी केली. श्रेयस अय्यर याने 19 धावांचं योगदान दिलं. तर केएल राहुल आणि विराट कोहली या जोडीने टीम इंडियाला विजयापर्यंच पोहचवलं.
केएल राहुल याने 34 बॉलमध्ये नाबाद 34 धावा केल्या. तर विराट कोहली याने विजयी षटकारासह शतकही पूर्ण केलं. विराटने 97 बॉलमध्ये 103 धावांची खेळी केली. विराटचं हे 48 वं वनडे शतक ठरलं. विराटला या शतकी खेळीसाठी त्याला ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरवण्यात आलं. विराटने या खेळीनंतर जाहीर माफी मागितली. नक्की काय झालं आणि काय नाय हे जाणून घेऊयात.
विराटने कुणाची माफी मागितली?
विराटने रवींद्र जडेजा याची माफी मागितली. विराटने शतक ठोकल्याने त्याला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळाला. यामुळे जडेजाची संधी हुतली. जडेजाने 10 ओव्हरमध्ये 38 धावा देत 2 विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे जडेजा मॅन ऑफ द मॅचचा प्रबळ दावेदार होता. विराट कोहली सामन्यानंतर प्रोस्ट प्रोडक्शन शो दरम्यान काय म्हणाला हे आपण जाणून घेऊयात.
विराट काय म्हणाला?
“जडेजाकडून मॅन ऑफ द मॅच हिसकावस्यासाठी क्षमस्व. टीमसाठी मोठं योगदान देण्याची इच्छा होती. वर्ल्ड कपमध्ये माझा नावावर अर्धशतकं आहेत. मात्र मी त्याचं मोठ्या खेळीत रुपांतर करण्यात अपयशी ठरलो. मी अखेरपर्यंत मैदानात उभा राहून टीमला जिंकवू इच्छित होतो, जे मी गेल्या अनेक वर्षांसून करत आलोय”, असं विराट म्हणाला.
विराटकडून जडेजाची माफी
Virat Kohli said – “I am sorry to Jaddu to stealing MOM award from him”. pic.twitter.com/XGUiMc9KfN
— CricketMAN2 (@ImTanujSingh) October 19, 2023
बांगलादेश प्लेईंग ईलेव्हन | नजमुल हुसैन शांतो (कॅप्टन), लिटॉन दास, तंझिद हसन, मेहदी हसन मिराज, तौहीद हृदोय, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), महमुदुल्ला, नसुम अहमद, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान आणि शरीफुल इस्लाम.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.