प्रेमाने जर्सी भेट दिलेल्या खेळाडूवर थुंकला होता विराट कोहली! अनेक वर्षानंतर ‘त्या’ घटनेचा खुलासा
भारताचा दक्षिण अफ्रिका दौरा जबरदस्त गेला. बऱ्याच वर्षानंतर टीम इंडियाने दक्षिण अफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका 1-1 ने बरोबरीत सोडवली. या मालिकेनंतर दक्षिण अफ्रिकेच्या डीन एल्गरने निवृत्ती घेतली. पण आता कुठे जाऊन त्याने एका घटनेचा उल्लेख केला आहे.
मुंबई : दक्षिण अफ्रिकेचा दिग्गज खेळाडू डीन एल्गर पहिल्यांदा 2015 साली भारत दौऱ्यावर आला होता. या मालिकेत त्याला विराट कोहलीच्या आक्रमक स्वभावाचा सामना करावा लागला. विराट कोहली प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना डिवचण्याची एकही संधी सोडत नाही. विजयासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व विराट कोहली मैदानात करताना दिसतो. त्यामुळे विराट कोहलीची स्लेजिंग सर्वश्रूत आहे. आता विराट कोहलीच्या स्लेजिंगबाबत दक्षिण अफ्रिकेचा माजी कर्मधार डीन एल्गरने खुलासा केला आहे. इतकंच नाही तर विराट कोहलीला मारण्याची तयारी केली होती, असंही डीन एल्गरने सांगितलं. डीन एल्गरने बॅटर विथ द बॉईज या कार्यक्रमात विराट कोहलीसोबतची पहिली भेट कशी याबाबत खुलासा केला आहे. विराट कोहली आणि डीन एल्गर यांच्यात नेमकं काय झालं होतं? विराट कोहलीने डीन एल्गरला जर्सी भेट देत शेवट कसा गोड केला. याबाबत जाणून घेऊयात.
“पहिल्यांदा मी भारत दौऱ्यावर गेलो होतो तेव्हा कोहलीचा सामना झाला. तेव्हा खूपच स्लेजिंग झाली होती. मीही कोहलीला अफ्रिकी भाषेत बरंच काही बोललो होतो. पण नंतर लक्षात आलं की त्याचा त्याच्यावर काही एक फरक पडत नाही. आम्ही तिथे दोन कसोटी सामने खेळलो होतो आणि खेळपट्टी हिरवी होती. जेव्हा मी फलंदाजीसाठी गेलो तेव्हा अश्विन आणि जडेजाच्या गोलंदाजी मी सक्षमपणे सामना केला. तेव्हा कोहली माझ्यावर थुंकला. मी त्याला सांगितलं की परत असं केलं तर सोडणार नाही. मी बोलत राहीलो पण नतंतर कळलं की त्याचा काही एक उपयोग नाही.”, असं डीन एल्गरने सांगितलं.
Spirit of Cricket 👏#TeamIndia | #SAvIND pic.twitter.com/MkW3IiPraY
— BCCI (@BCCI) January 4, 2024
एबी डिव्हिलियर्सला विराट कोहलीच्या कृतीबाबत कळलं आणि त्याने तात्काळ विराट कोहलीशी संवाद साधला. तसेच तशी कृती पुन्हा न करण्याबाबत समज दिली होती, असंही डीन एल्गर म्हणाला. त्यानंतर दोन वर्षानंतर विराट कोहली दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर आला होता तेव्हा त्याने माझी भेट घेत माफी मागितली. आम्ही दोघंही बाहेर भेटलो आणि तीन वाजेपर्यंत दारू प्यायलो. त्यानंतर सर्वकाही शांत झालं.
View this post on Instagram
डीन एल्गरने शेवटचा कसोटी सामना भारताविरुद्ध खेळला. या सामन्यानंतर विराट कोहलीन आपली जर्सी एल्गरला भेट दिली होती. यासोबत भारतीय कर्णधार रोहित शर्माने सर्व संघ सहकार्यांनी सही केलेली जर्सी त्याला भेट दिली होती.