Virat Kohli IPL 2022: मॅच सुरु असताना साइट स्क्रीनवर आलेल्या काळ्या मांजरीमुळे विराट कोहली ट्रोल

एका युजरने विराट कोहलीला सल्ला दिलाय. "डियर कोहली, तुम्हाला वाईट नजर लागू नये, असं वाटत असेल, तर तुम्ही टि्वटरवर तुमचे वर्कआऊटचे व्हिडिओ, फोटो शेअर करण बंद करा, किंवा ही काळी मांजर पाळा"

Virat Kohli IPL 2022: मॅच सुरु असताना साइट स्क्रीनवर आलेल्या काळ्या  मांजरीमुळे विराट कोहली ट्रोल
virat kohli Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: May 14, 2022 | 1:24 PM

मुंबई: इंडियन प्रिमीयर लीग  IPL 2022 मध्ये खराब फॉर्म विराट कोहलीची (Virat Kohli) पाठ सोडत नाहीय. तीन वेळा विराट गोल्डन डक म्हणजे शुन्यावर आऊट झालाय. शुक्रवारी पंजाब किंग्स (Punjab kings) विरुद्ध चांगल्या सुरुवातीनंतर विराट फक्त 20 धावाच करु शकला. पंजाब किंग्सने रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला  54 धावांनी पराभूत केलं. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या सामन्यादरम्यान एक इंटरेस्टिंग गोष्ट पहायला मिळाली. आरसीबीचा डाव सुरु झाला होता. त्यावेळी एक काळी मांजर (Black cat) साइट स्क्रीनवर जाऊन बसली. डावाच्या पहिल्याच षटकात हे घडलं, जेव्हा विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस क्रीझवर होते. ती काळी मांजर पाहून डू प्लेसिस चकीत झाला. काळी मांजर काही वेळ स्क्रीन समोर बसून होती. त्यामुळे काही वेळासाठी खेळ थांबला होता. मांजर काही वेळाने तिथून निघून गेली. त्यानंतर सामना सुरु झाला. या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या दरम्यान काही नेटीझन्सनी विराट कोहलीला ट्रोल केलं.

काळ्या मांजरीवरुन विराटला फुकटचे सल्ले

एका युजरने विराट कोहलीला सल्ला दिलाय. “डियर कोहली, तुम्हाला वाईट नजर लागू नये, असं वाटत असेल, तर तुम्ही टि्वटरवर तुमचे वर्कआऊटचे व्हिडिओ, फोटो शेअर करण बंद करा, किंवा ही काळी मांजर पाळा” ‘काळी मांजर काळ्या जादूसाठी वापरतात’ असं एका युजरने लिहिलय. “मला वाटतं काळी मांजरच विराट कोहलीच्या खराब फॉर्मच कारण आहे. आज हे सिद्ध झालं” असं एका युजरने लिहिलय.

सामन्यात काय घडलं?

मुंबईच्या ब्रबॉर्न स्टेडियमवर ही लढत झाली. प्लेऑफच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या सामन्यात पंजाब किंग्सने रॉयल चॅलेंजर्स बँगलोरवर 54 धावांनी विजय मिळवला. RCB चा कॅप्टन फाफ डू प्लेसिसने टॉस जिंकून पहिली गोलंदाजी स्वीकारली. पंजाब किंग्सने प्रथम फलंदाजी करताना धावांचा डोंगर उभा केला. PBKS ने आरसीबीला विजयासाठी 210 धावांचे टार्गेट दिले. पण आरसीबीने निर्धारित 20 षटकात 9 बाद 155 धावा केल्या. या विजयासह पंजाबने महत्त्वाचे दोन पॉइंटस घेतले. पंजाबचे प्लेऑफ मधील आव्हान अद्यापही टिकून आहे. आरसीबीकडून ग्लेन मॅक्सवेलने सर्वाधिक 35 धावा केल्या. रजत पाटीदारने 26 आणि विराट कोहलीने 20 धावा केल्या. अन्य फलंदाज फक्त हजेरीवीर ठरले. पंजाबच्या गोलंदाजांनी आज अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. कागिसो रबाडाने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. जॉनी बेयरस्टो आणि लियाम लिव्हिंगस्टोन हे दोन पंजाबच्या विजयाचे नायक ठरले.

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.