जेव्हा धनश्री आणि युजवेंद्रमध्ये विराट कोहली आला, काय आहे फोटोमागची कहाणी?

धनश्रीने आपल्या इन्स्टाग्रामला एक फोटो शेअर केलाय. ज्याच्यात विराट कोहली, स्वत: धनश्री आणि युजवेंद्र दिसून येत आहे. (Virat Kohli Yuzvendra Chahal And Dhanashree Verma viral photo)

जेव्हा धनश्री आणि युजवेंद्रमध्ये विराट कोहली आला, काय आहे फोटोमागची कहाणी?
धनश्री वर्मा, विराट कोहली आणि युजवेंद्र चहल
Follow us
| Updated on: May 23, 2021 | 11:00 AM

मुंबई : टीम इंडियाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि त्याची बायको धनश्री वर्मा (Dhanashree Verma ) पाठीमागच्या काही दिवसांपासून अचडणीत सापडले होते. चहलच्या आई बाबांना कोरोनाची बाधा झाली होती तर धनश्रीच्या आई आणि भावाला देखील कोरोनाची लागण झाली होती. परंतु आता दोघांच्याही कुटुंबातले सदस्य ठीक आहेत. घरातील सदस्यांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे युजवेंद्र आणि धनश्रीने सुटकेचा निश्वास सोडलाय. ते आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह झालेत. धनश्रीने आपल्या इन्स्टाग्रामला एक फोटो शेअर केलाय. ज्याच्यात विराट कोहली, स्वत: धनश्री आणि युजवेंद्र दिसून येत आहे. मात्र या नवराबायकोच्या जोडीच्यामध्ये विराट कोहली कसा आला, असा प्रश्न अनेकांना पडला. (Virat Kohli Yuzvendra Chahal And Dhanashree Verma viral photo)

काय आहे फोटोमागची कहाणी?

धनश्रीने शेअर केलेल्या फोटोमध्ये धनश्री आणि युजवेंद्रच्या बरोबरमध्ये विराट कोहली थांबला आहे. या नवराबायकोच्यामध्ये विराट कसा काय थांबला, नेमकं काय औचित्य होतं? असा प्रश्न अनेकांना पडला. याचं उत्तर धनश्रीने दिलं आहे.

“हा फोटो कर्णधार कोहली आणि स्पिनर चहलसोबत…. नाश्त्यादरम्यान मजेदार गोष्टीपासून ते मॅचनंतरच्या मस्तीपर्यंत…. प्रत्येक क्षण आनंदाचा होता, आमच्यामध्ये अनेक प्रसंग चर्चिले गेले, एकमेकांच्या गोष्टी एकमेकांना सांगितल्या…!”, असं कॅप्शन धनश्रीने या फोटोला दिलं आहे.

IPL दरम्यानचा खास क्षण

विराट कोहलीच्या नेतृत्वात बंगळुरु संघात युजवेंद्र चहल खेळतो. हा फोटो आयपीएलच्या 14 व्या पर्वात काढलेला आहे. कोरोना व्हायरसच्या एन्ट्रीमुळे आयपीएलचं पर्व अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आलंय.

कोण आहे चहलची बायको धनश्री वर्मा?

युजवेंद्र चहलची जोडीदार धनश्री वर्मा व्यवसायाने डेंटिस्ट, कोरिओग्राफर आणि यूट्यूबर आहे. युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माने मोठा काळ एकमेकांसोबत घालवलेला आहे. त्यानंतर दोघं विवाहबंधनात अडकलेत.

धनश्रीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

धनश्री अधून मधून आपल्या डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करत असते. तिचे व्हिडीओ चाहत्यांना कमालीचे आवडतात. तिचा नुकताच भांगडा डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. तसंच भारतीय संघाचा खेळाडू श्रेयस अय्यरसोबतचा डान्सचा व्हिडीओ तुफान लोकप्रिय झाला होता.

(Virat Kohli Yuzvendra Chahal And Dhanashree Verma viral photo)

हे ही वाचा :

वयाच्या 32 व्या वर्षापर्यंत 100 शतकं, सगळ्या फॉरमॅटमध्ये 63 हजार रन्स, कुटुंब करत होतं तंबाखूची शेती, तो फलंदाज कोण?

विराट कोहली शतकांचा दुष्काळ दूर करणार का?, पाकिस्तानी दिग्गज म्हणतो, ‘फक्त पुढच्या मॅचमध्ये बघाच…!’

भारताचा तो क्रिकेटर ज्याच्या 3 मॅचमध्ये 30 विकेट्स, ईडन गार्डनवर हॅट्रिक, नंतर सगळ्यांसमोर लाज आणली!

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.