IPL 2021: विराटसेना सूसाट! मॅक्सवेलचं दमदार अर्धशतक, राजस्थानवर 7 गडी राखून विजय

यंदाच्या हंगामातील आयपीएलचा 43 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स या तुल्यबळ संघात खेळवण्यात आला. ज्यात अखेरच्या काही षटकात आऱसीबीने चांगली गती घेत सामना 7 विकेट्सने खिशात घातला.

IPL 2021: विराटसेना सूसाट! मॅक्सवेलचं दमदार अर्धशतक, राजस्थानवर 7 गडी राखून विजय
ग्लेन मॅक्सवेलने अप्रतिम अर्धशतक ठोकत संघाला विजय मिळवून दिला.
Follow us
| Updated on: Sep 30, 2021 | 12:18 AM

IPL 2021: यंदाच्या आयपीएलमध्ये अप्रतिम कामगिरी करणाऱ्या विराट कोहलीच्या (Virat Kohli) रॉयल चँलेजर्स बंगळुरु (RCB) संघाने आज पुन्हा एकदा दमदार कामगिरी करत राजस्थान रॉयल्स संघाला 7 विकेट्सनी मात दिली आहे. स्पर्धेतील 43 वा सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानात खेळवण्यात आला. ज्यामध्ये विराटच्या संघाने संयमी उत्कृष्ट खेळ दाखवत सामना 7 गडी आणि 12 चेंडू राखून जिंकला.

सामन्यात आधी नाणेफेक जिंकत विराटने गोलंदाजी घेतली. आपल्या या निर्णयाला पूर्णपणे बरोबर सिद्द करत विराटसेनेने राजस्थान संघाला 149 धावांवर रोखलं. केवळ लुईसच्या अर्धशतकाच्या जोरावर राजस्थान किमान आव्हानात्मक धावसंख्या स्कोरबोर्डवर लावू शकली. पण आरसीबीकडून मात्र भरतने 44 आणि मॅक्सवेलने नाबाद 50 धावा ठोकत संघाला सोपा विजय मिळवून दिला.

राजस्थानची फलंदाजी ढासळली

प्रथम फलंदाजी करताना राजस्थानच्या फलंदाजानी सुमार कामगिरी केली. सलामीवीर एविन लुईसने अप्रतिम अर्धशतक झळकावलं. त्याने 37 चेंडूत 58 धावा केल्या. त्याला यशस्वीने देखील 31 धावांचं योगदान दिलं. पण 77 धावांवर यशस्वीचा विकेट पडल्यानंतर मात्र राजस्थानची फलंदाजी ढासळू लागली. 100 धावांवर लुईस बाद होताच, त्यानंतर एक एक गडी तंबूत परतू लागले. संजू सॅमसन (19) आणि ख्रिस मॉरीस (14) यांना सोडता एकाही फलंजदाजाला दुहेरी आकडाही गाठता आला नाही. त्यामुळे राजस्थानने केवळ 149 रन केले. यावेळी आरसीबीच्या गोलंदाजांनी 10 ओव्हरनंतर दमदार गोलंदाजी केल्यामुळे अशाप्रकारे राजस्थानचे फलंदाज बाद झाले. यावेळी हर्षलने एका षटकात 3 विकेट घेतल्या. तर चहल आणि शाहबाज अहमद यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. तर ख्रिस्टियन आणि गार्टन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतला.

भरतच्या संयमी खेळीसह मॅक्सवेलचं अर्धशतक

आरसीबीची फलंदाजी येताच सलामीवीर विराट आणि देवदत्त यांनी विश्वासू फलंदाजी करण्यास सुरुवात केली. पण संघाच्या 48 धावा झाल्या असताना देवदत्त 22 धावा करुन बाद झाला. त्यानंतरही भरत आणि विराटने डाव सांभाळला. पण 25 धावा करुन विराटही बाद झाला. त्यानंतर भरतच्या 44 धावांमुळे आरसीबीचा डाव सावरला. पण मॅक्सवेलने 30 चेंडूत 6 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 50 धावा केल्या. ज्यामुळे सामना पूर्णपणे आरसीबीच्या पारड्यात झुकला.  मॅक्सवेलच्या अर्धशतकानंतर डिव्हिलीयर्सने 18 व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर चौकार लगावत सामना 7 गडी आणि 12 चेंडू राखून जिंकवून दिला.

हे ही वाचा

AUSW vs INDW, 1st Test: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, सामना कधी, कुठे आणि कसा पाहणार?

टी ट्वेन्टी वर्ल्डकपसाठी धोनीला मेन्टॉर का केलं?, BCCI कडून पहिल्यांदाच मोठा खुलासा, विराटला इशारा!

महिला खेळाडूंसाठी हेही आव्हान, अशी चाचणी ज्यात स्त्री असल्याचं सिद्ध करावं लागतं, जाणून घ्या काय आहे ‘जेंडर वेरिफिकेशन’?

(Virat kohlis RCB Won Match Against Rajsthan Royals with 7 wickets remaining Glenn Maxwell hit hard half century)

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.