Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL मध्ये 10 वर्षातील विराटचं सर्वात खराब प्रदर्शन, आता रन मशीन झाली डक मशीन

IPL 2022: विराटच्या फटक्यांमध्ये आता पहिल्यासारखा आत्मविश्वास दिसत नाही. कधी विराटच्या बॅटमधून निघालेला फ्लिकचा फटका चौकाराची खात्री असायची.

IPL मध्ये 10 वर्षातील विराटचं सर्वात खराब प्रदर्शन, आता रन मशीन झाली डक मशीन
Follow us
| Updated on: May 09, 2022 | 2:45 PM

मुंबई: मागच्या 10 वर्षात प्रथमच IPL मध्ये विराटची सरासरी 20 च्या खाली आली आहे. विराटच्या बॅटमधून धावा जणू आटल्या आहेत. किंग कोहली या सीजनमध्ये फक्त 19.6 च्या सरासरीने खेळतोय. काल सनरायजर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोरमधील सामन्याची सुरुवातच एका मोठ्या विकेटने झाली. SRH चा डावखुरा फिरकी गोलंदाज जगदीश सुचितच्या गोलंदाजीवर विराट खात उघडण्याआधीच तंबूत परतला. विराटला अशा पद्धतीने आऊट झालेलं पाहून कोट्यवधी क्रिकेटप्रेमी निराश झाले. एकवेळ नुसत्या विराट कोहलीच्या नावाने जगातील तमाम गोलंदाजांना कापर भरायचं. तोच कोहली सध्या करीयरच्या खूप खराब फॉर्ममध्ये आहे. IPL 15 च्या सीजनमध्ये कोहली तीन वेळा गोल्डन डक झालाय. म्हणजे पहिल्या बॉलवर बाद झालाय. दोन वर्ष झाली. पण विराटच्या बॅटमधून शतक निघालेलं नाही. पण म्हणून विराटची आक्रमकता कमी झालेली नाही. CSK विरुद्धच्या सामन्यात धोनीचा विकेट गेल्यानंतर कोहलीची आक्रमक Reaction सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.

आधी फ्लिकचा फटका चौकाराची खात्री असायचा

विराटच्या फटक्यांमध्ये आता पहिल्यासारखा आत्मविश्वास दिसत नाही. कधी विराटच्या बॅटमधून निघालेला फ्लिकचा फटका चौकाराची खात्री असायची. आता तोच फटका सोप्या झेलमध्ये बदलला जातोय. आजही विराट सहकारी खेळाडूंसोबत मिळून विकेट गेल्यानंतर तसाच जल्लोष करतो. पण फलंदाजी करताना विराटमधला तो निश्चिय कुठे जातो? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. आता कुठलाही साधा गोलंदाज विराटला सहज आऊट करेल असं वाटतं.

23 नोव्हेंबर 2019 मध्ये विराटने झळकावलं शेवटचं शतक

याआधी सुद्धा विराट सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध शुन्यावर आऊट झाला होता. लखनौ सुपर जायंट्ससमोर विराट फेल ठरला होता. एकाच सीजनमध्ये SRH विरुद्ध विराट दुसऱ्यांदा शुन्यावर आऊट झाला. अनुज रावत खराब फॉर्ममध्ये असल्यामुळे RCB ने विराटला ओपनिंगला पाठवलं. विराटने आयपीएलच्या या सीजनमध्ये 12 इनिंग्समध्ये फक्त 216 धावा केल्यात. यात एक अर्धशतक आहे. खरंतर विराट सारख्या प्लेयरच्या करीयरचा ग्राफ बघितला, तर ही कामगिरी त्याच्या लौकीकाला शोभणारी नाहीय. 23 नोव्हेंबर 2019 मध्ये विराटने बांगलादेशविरुद्ध शेवटचं शतक झळकावलं होतं.

त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.
'कृपा करून...', अजितदादांनी संभाजी भिडे यांना सुनावले खडेबोल
'कृपा करून...', अजितदादांनी संभाजी भिडे यांना सुनावले खडेबोल.
रायगडावरील त्या समाधीसंदर्भात एक सवाल अन् उदयनराजे भडकले, कोण वाघ्या?
रायगडावरील त्या समाधीसंदर्भात एक सवाल अन् उदयनराजे भडकले, कोण वाघ्या?.
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, 31 तारखेला मुंबईत थर्ड डिग्री?
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, 31 तारखेला मुंबईत थर्ड डिग्री?.
वडिलांचं अफेअर अन्.., दिशाच्या मृत्यूचं कारण समोर; क्लोजर रिपोर्ट काय?
वडिलांचं अफेअर अन्.., दिशाच्या मृत्यूचं कारण समोर; क्लोजर रिपोर्ट काय?.
देशमुख हत्या प्रकरणात नव्या कराडची एन्ट्री, कोण आहे सुग्रीव कराड?
देशमुख हत्या प्रकरणात नव्या कराडची एन्ट्री, कोण आहे सुग्रीव कराड?.
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.