Virat Kohli : विराटची जोरदार फलंदाजी, 73 धावांच्या डावात इतिहास रचला, पाहा Highlights Video
या सामन्याच्या 13व्या षटकातील चौथ्या चेंडूवर साई किशोरने एकेरी धाव घेतच त्याने इतिहास रचला.
मुंबई : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमध्ये वानखेडे स्टेडियमवर इंडियम प्रिमीयर लीगमधला 67 वा सामना खेळला गेला. लीगमधली टॉपवर असलेली टीम गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोरमध्ये (GT vs RCB) ही लढत झाली. गुजरातची टीम आधीच प्लेऑफमध्ये पोहोचली आहे. RCB ला प्लेऑफची आशा जिवंत ठेवण्यासाठी विजय आवश्यकच होता. आरसीबीने हा सामना जिंकला. प्लेऑफच्या शर्यतीत अजूनही ते टिकून आहेत. सलामीवीर विराट कोहली (Virat kohli) (73) आणि कॅप्टन फाफ डू प्लेसिस (44) यांच्या फलंदाजीच्या बळावर बँगलोरने गुजरात टायटन्सवर (Gujarat Titans) आठ विकेट राखून विजय मिळवला. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा (RCB) स्टार फलंदाज विराट कोहली गुरुवारी आयपीएल फ्रँचायझीसाठी 7000 धावा करणारा पहिला खेळाडू ठरला. वानखेडे स्टेडियमवर गुजरात टायटन्स (GT) विरुद्धच्या सामन्यात कोहलीने ही कामगिरी केली. या सामन्याच्या 13व्या षटकातील चौथ्या चेंडूवर साई किशोरने एकेरी धाव घेतच त्याने इतिहास रचला.
73 धावांच्या डावात इतिहास रचला, VIDEO पाहण्यासाठी इथे क्लिक करा
प्लेअर ऑफ द मॅच
For his match winning knock of 73, @imVkohli is adjudged Player of the Match as #RCB win by 8 wickets.
Scorecard – https://t.co/TzcNzbrVwI #RCBvGT #TATAIPL pic.twitter.com/5xMYY1DbDD
— IndianPremierLeague (@IPL) May 19, 2022
FIFTY for @imVkohli off 33 deliveries ??
Live – https://t.co/XDXRjk2XBc #RCBvGT #TATAIPL pic.twitter.com/CdNEvQsE18
— IndianPremierLeague (@IPL) May 19, 2022
सर्वाधिक धावा करणारे
या सामन्यापूर्वी तो 57 धावा दूर होता. कोहली लीगच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा खेळाडूही आहे. त्याच्यापाठोपाठ शिखर धवन (6,205), रोहित शर्मा (5,877), डेव्हिड वॉर्नर (5,876), सुरेश रैना (5,528) आणि एबी डिव्हिलियर्स (5,162) यांचा क्रमांक लागतो.
टायटन्सने 5 बाद 168 धावा केल्या
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर कर्णधार हार्दिक पंड्या (47 चेंडूत नाबाद 62) याच्या अर्धशतकाच्या जोरावर गुजरात टायटन्सने 5 बाद 168 धावा केल्या. प्रत्युत्तरात आरसीबीकडून कोहलीने 54 चेंडूत 73 आणि कर्णधार फाफ डू प्लेसिसने 38 चेंडूत 44 धावा केल्या. दोघांनी पहिल्या विकेटच्या भागीदारीत 115 धावा जोडल्या. ग्लेन मॅक्सवेल 18 चेंडूत 40 धावांवर नाबाद राहिला कारण आरसीबीने आठ चेंडू बाकी असताना विजयाची नोंद केली.
मॅन ऑफ द मुव्हमेंट, VIDEO पाहण्यासाठी इथे क्लिक करा
RCB 16 गुणांसह चौथ्या स्थानावर
वानखेडे स्टेडियमवरील या विजयासह RCB 16 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. परंतु दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्याच्या निकालाची प्रतीक्षा करावी लागेल. दिल्ली हरल्यास आरसीबी प्लेऑफमध्ये पोहोचेल.
हार्दिकची अर्धशतकी खेळी
गुजरातने प्रथम फलंदाजी करताना कॅप्टन हार्दिक पंड्याच्या नाबाद (62) आणि राशिद खान नाबाद (19) यांच्या धडाकेबाज फलंदाजीच्या बळावर पाच विकेट गमावून 168 धावा केल्या. बँगलोरने हे लक्ष्य 18.2 षटकात दोन विकेट गमावून पूर्ण केलं.
आणखी दोन टीम्सचं आव्हान संपुष्टात
लखनौ विरुद्ध काल झालेल्या पराभवानंतर कोलकाता नाइट रायडर्सच आव्हान संपुष्टात आलं. आरसीबीच्या विजयानंतर पंजाब किंग्स, सनरायजर्स हैदराबादचं आव्हान संपुष्टात आलय. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे संघ आधीच स्पर्धेबाहेर गेले आहेत.