Virender Sehwag : WTC फायनलमधील पराभवानंतर वीरेंद्र सेहवाग स्पष्टच बोलला, म्हणाला…
Team India : टीम इंडियाला आधी लवकर विकेट घेता आल्या नाहीत आणि दोन्ही डावात टॉप ऑर्डरचे सपशेल अपयशी ठरले. प्लइंग 11 मध्ये अश्विनला स्थान न दिल्याने टीम मॅनेजमेंटवर क्रिकेट विश्वातील आजी-माजी खेळाडू बोट दाखवत आहेत. अशातच रविवारी झालेल्या पराभवावर माजी स्फोटक खेळाडू वीरेंद्र सेहवाग याने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल 2023 सामन्यात टीम इंडियाचा 209 धावांनी दारूण पराभव झाला. टीम इंडियाला सामन्यामध्ये एकदाही वर्चस्व दाखवता आलं नाही, शेवटच्या दिवसापर्यंत कांगारूंची पकड होती. अगदी ठरवलेल्या नियोजनानुसार त्यांनी खेळ करत फायनल जिंकली. टीम इंडियाला आधी लवकर विकेट घेता आल्या नाहीत आणि दोन्ही डावात टॉप ऑर्डरचे सपशेल अपयशी ठरले. प्लइंग 11 मध्ये अश्विनला स्थान न दिल्याने टीम मॅनेजमेंटवर क्रिकेट विश्वातील आजी-माजी खेळाडू बोट दाखवत आहेत. अशातच रविवारी झालेल्या पराभवावर माजी स्फोटक खेळाडू वीरेंद्र सेहवाग याने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाला वीरेंद्र सेहवाग?
WTC फायनल जिंकल्याबद्दल ऑस्ट्रेलियाचे अभिनंदन. ते या विजयाचे हकदार होते. ऑस्ट्रेलियाच्या मजबूत डावखुऱ्या फलंदाजांविरुद्ध संघाने अश्विनला बाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला तेव्हाच भारत हा सामना मानसिकदृष्ट्या हरला होता. टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरच्या फलंदाजांबाबत सेहवाग म्हणाला, ‘संघाच्या टॉप ऑर्डरच्या खेळाडूंना चांगली फलंदाजी करण्याची गरज होती. त्यासोबतच चॅम्पियनशीप जिंकण्यासाठी चांगली मानसिकता आणि दृष्टीकोन आवश्यक असल्याचंही सेहवागने सांगितलं.
Congratulations to Australia on winning the #WTCFinal. They are the deserved winners. India lost it in their minds when they decided to exclude Ashwin against a left-handed heavy attack. Plus the top order needed to bat better. Need to have better mindset and approach to win…
— Virender Sehwag (@virendersehwag) June 11, 2023
आर. अश्विन भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगातील अव्वल फिरकीपटूल तुम्ही जर संघाबाहेर करत असाल तर तुमचाच आत्मविश्वास कमी असल्याचं दिसून येतं. सचिन तेंडुलकरनेही अश्निला बाहेर ठेवण्यावरून मॅनेजमेंटवर निशाणा साधला होता.
ऑस्ट्रेलिया संघाने उत्कृष्ट खेळ केला यामध्ये काही शंका नाहीच मात्र टीम इंडियाची बॅटींग पूर्णपणे फेल गेली. एकट्याच्या जोरावर अनेकवेळा सामने काढून देणारे तोडीसतोड मॅचनविनर खेळाडू फेल गेले. हा पराभव सर्वांच्याच जिव्हारी लागला आहे. सलग दुसऱ्यांदा फायनल गाठून टीम इंडियाचं विजेतेपदाचं स्वप्न भंगलं आहे.