Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

DC vs SRH : कदाचित ‘तो’ टॉयलेटला गेला असेल, म्हणून सुपर ओव्हर खेळू शकला नाही, दिग्गज क्रिकेटपटूचा वॉर्नरला टोला

सुपर ओव्हरमध्ये विस्फोटक फलंदाज असलेल्या जॉनी बेअरस्टोला पाठवायला हवं होतं, असं मत अनेकांनी मांडलं आहे. (DC vs SRH Super Over)

DC vs SRH : कदाचित 'तो' टॉयलेटला गेला असेल, म्हणून सुपर ओव्हर खेळू शकला नाही, दिग्गज क्रिकेटपटूचा वॉर्नरला टोला
Sunrisers Hyderabad
Follow us
| Updated on: Apr 27, 2021 | 12:08 AM

मुंबई : आयपीएलमध्ये रविवारी खेळवण्यात आलेल्या सामन्यात सुपर ओव्हरमध्ये दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) सनरायजर्स हैदराबादवर (Sunrisers Hyderabad) मात केली. हैदराबादने दिल्लीला विजयासाठी सुपर ओव्हरमध्ये 8 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान दिल्लीने सुपर ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर पूर्ण करत विजय साकारला. त्याआधी दिल्लीने हैदराबादला 20 ओव्हरमध्ये 159 धावांवर रोखल्याने सामना बरोबरीत सुटला होता. दरम्यान, सुपर ओव्हमध्ये हैदराबादचा कर्णधार आणि प्रशिक्षकांनी घेतलेला एक निर्णय चुकीचा ठरल्याने संघावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. हैदराबाद विरुद्ध दिल्ली या सामन्यात सुपर ओव्हरमध्ये हैदराबाद संघाने जॉनी बेअरस्टोला फलंदाजीसाठी न पाठवल्यामुळे माजी भारतीय क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने आश्चर्य व्यक्त करत एक मजेशीर ट्विट केलं आहे. (Virender Sehwag questions SRH for not sending Jonny Bairstow in Super Over in DC vs SRH)

या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉच्या 53 आणि रिषभ पंतच्या 37 धावांच्या खेळीच्या जोरावर दिल्लीने 159 धावांपर्यंत मजल मारली होती. या धावांचा पाठलाग करताना हैदराबाद संघाकडून केन विलीयमसनने सर्वाधिक 66 धावांची खेळी केली होती. तर जॉनी बेअरस्टोने अवघ्या 18 चेंडूत 38 धावा फटकावल्या होत्या. त्या जोरावर हैदराबादने निर्धारित 20 षटकांमध्ये 159 धावा केल्या. त्यानंतर सुपर ओव्हर खेळवण्यात आली. त्यावेळी हैदराबादकडून प्रथम फलंदाजी करण्यासाठी कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि केन विलियमसन मैदानात उतरले. या दोघांनी मिळून अवघ्या 7 धावा केल्या होत्या. 8 धावांचा पाठलाग करण्यासाठी दिल्ली संघाकडून रिषभ पंत आणि शिखर धवन ही जोडी मैदानात आली होती. या दोघांनी दिल्लीला शेवटच्या चेंडूवर 1 धाव घेत सामना जिंकून दिला होता.

सुपर ओव्हरमध्ये विस्फोटक फलंदाज असलेल्या जॉनी बेअरस्टोला पाठवायला हवं होतं, असं मत अनेकांनी मांडलं आहे. तसेच याच सामन्यात बेअरस्टोने आक्रमक 38 धावांची खेळी केली होती. या खेळीत त्याने 4 षटकार आणि 3 चौकार फटकावले होते. त्यामुळे तो जर सुपर ओव्हर खेळण्यासाठी मैदानात उतरला असता तर हैदराबादने किमान 7 पेक्षा जास्त धावा जमवल्या असत्या, असं अनेकांना वाटतं. त्यामुळेच हैदराबदने सुपर ओव्हमध्ये जॉनी बेअरस्टोला मैदानात न उतरवणं हा चुकीचा निर्णय होता, असं अनेकांना वाटतं. माजी भारतीय क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागलादेखील हा निर्णय पटला नाही. त्यामुळे त्याने त्याची नाराजी ट्विटरवर एक पोस्ट करुन व्यक्त केली आहे.

विरेंद्र सेहवागचं ट्विट

सेहवागने ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ‘मला वाटतं बेअरस्टो टॉयलेटला गेला असेल. मला हे नाही समजलं की, त्याला सुपर ओव्हरमध्ये फलंदाजी करण्यासाठी का नाही पाठवले. त्याने 18 चेंडूत 38 धावांची आक्रमक खेळी केली होती. तसेच माझ्या मते तो एक चांगला हिटर (आक्रमक फटके मारणारा फलंदाज) आहे. या सामन्यात हैदराबादने चांगली झुंज दिली. परंतु त्यांचा पराभव त्यांनी घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे झाला आहे.

इतर बातम्या

SRH vs DC, IPL 2021 Match 20 Result | सुपर ओव्हरमध्ये दिल्ली कॅपिटल्सची सनरायजर्स हैदराबादवर मात

IPL 2021 : चेन्नईविरुद्धची मॅच हारल्यानंतरही विराट कोहली भलताच खूश, म्हणतो, ‘सर जाडेजा इज ग्रेट…!’

Video | संयमी राहुल द्रविड इतका का भडकला? तो खरंच भडकला की नाटक करत होता? पडद्यामागे काय घडलं? पाहा व्हिडीओ

(Virender Sehwag questions SRH for not sending Jonny Bairstow in Super Over in DC vs SRH)

जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात..
जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात...
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'.
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल.
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?.
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम.
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?.
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?.
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार....
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार.....
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल.
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की.