Virat Kohli : मुंबईच्या रस्त्यांवर स्कुटीवर फिरताना दिसले विरुष्का; ‘या’ कारणामुळे होतोय चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) हा सध्या क्रिकेटमधून (Cricket) मिळालेल्या विश्रांतीचा चांगलाच आनंद घेत आहे. शनिवारी विराट कोहली आपली पत्नी अनुष्का शर्मासोबत (Anushka Sharma) मुंबईत स्कूटीवरून प्रवास करताना दिसला.
मुंबई : टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) हा सध्या क्रिकेटमधून (Cricket) मिळालेल्या विश्रांतीचा चांगलाच आनंद घेत आहे. शनिवारी विराट कोहली आपली पत्नी अनुष्का शर्मासोबत (Anushka Sharma) मुंबईत स्कूटीवरून प्रवास करताना दिसला. या प्रवासादरम्यान दोघांनीही वाहतूक नियमांचे काटेकोर पालन केले. दोघांनीही प्रवासादरम्यान हेल्मेट घातले होते. या प्रवासाचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये विराट कोहली गाडी चालवत आहे आणि अनुष्का शर्मा मागे बसली आहे. दोघांनी काळ्या रंगाचे हेल्मेट घातले आहे.या व्हिडीओवर लाईक आणि कमेटंचा पाऊस पडत आहे. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी प्रवासादरम्यान सर्व वाहतूक नियमांचे पालन केल्याने तसेच दोघांनीही हेल्मेट घातल्याने त्यांच्या चाहत्यांकडून सध्या अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचे जोरदार कौतुक होत आहे.
चाहत्यांकडून कैतुकाचा वर्षाव
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये विराट कोहली आणि अनुष्का शर्मा या दोघांनी पण काळ्या रंगाचे हल्मेट घातले आहे. विराट कोहली स्कुटी चालवत आहे तर अनुष्का शर्मा ही विराटच्या मागे बसली आहे. या प्रवासात अनुष्का शर्मा ही पूर्णपणे ब्लॅक आउटफिटमध्ये दिसून येत आहे. तर विराट कोहलीने हिरव्या कलरचा शर्ट घातला आहे.दोघांनी वहातुकीचे सर्व नियम पाळत स्कुटीवरून प्रवासाचा आनंद घेतला. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असून, प्रवासादरम्यान त्यांनी वहातुकीच्या नियमांचे पालन केल्याने चाहत्यांकडून विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
2019 मध्ये शेवटचे आंतरराष्ट्रीय शतक
विराट कोहली हा भारताचा स्टार फलंदाज आहे. मात्र सध्या तरी त्याची बॅट शांत असल्याची दिसून येत आहे. त्याला गेल्या दोन वर्षांमध्ये लैकिकाला साजेशी अशी खेळी करण्यात अपयश आले आहे. कोहलीने आपले शेवटचे आंतरराष्ट्रीय शतक 23 नोव्हेंबर 2019 केले होते. त्याने 23 नोव्हेंबर 2019 रोजी बंगलादेशविरोधात टेस्ट मॅचमध्ये 136 धावा फटकवल्या होत्या. हे कोहलीचे 70 वे शतक होते. मात्र सध्या कोहलीची बॅट शांत असल्याची दिसून येत आहे.