Team India Coach : बीसीसीआयचं ठरलं! राहुल द्रविडनंतर ‘हा’ दिग्गज होणार टीम इंडियाचा कोच
राहुल द्रविडचा (Rahul Dravid) करार ऑक्टोबर-नोव्हेंबर 2023 दरम्यान वनडे वर्ल्ड कपनंतर संपणार आहे. मात्र त्याआधीच बीसीसीआयने (Bcci) नवा कोच शोधला आहे.
Indian Cricket Team Coach : ‘द वॉल’ अर्थात राहुल द्रविड (Rahul Dravid) सध्या टीम इंडियाचे हेड कोच (Team India Head Coach) आहे. मात्र द्रविडनंतर टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कोण असणार असा सवाल आतापासून उपस्थित केला जात आहे. टीम इंडियाचा पुढचा कोच कोण असणार याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. द्रविडचा करार ऑक्टोबर-नोव्हेंबर 2023 दरम्यान वनडे वर्ल्ड कपनंतर संपणार आहे. मात्र त्याआधीच बीसीसीआयने (Bcci) नवा कोच शोधला आहे. (vvs laxman may be team india next head coach after rahul dravid)
द्रविडनंतर पुढचा कोच कोण?
एका मीडिया रिपोर्टनुसार, द्रविडनंतर व्हीव्हीएस लक्ष्मण टीम इंडियाचा कोच असणार आहे. सूत्रांनुसार, बीसीसीआय द्रविडला हेड कोचपदी कायम ठेवण्याबाबत इच्छूक नसल्यास व्हीव्हीएस लक्ष्मणला हेड कोच केलं जाऊ शकतं.
द्रविडच्या अनुपस्थितीत लक्ष्मणला टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्त करण्यात आलं आहे. लक्ष्मण जून 2022 मध्ये आयर्लंड विरुद्धच्या मालिकेसाठी, इंग्लंड विरुद्धच्या टी 20 सीरिज आणि झिंबाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियासोबत होता. द्रविड कोव्हीड पॉझिटिव्ह असतानाही लक्ष्मण यूएमध्ये टी 20 आशिया कप 2022 साठी टीम इंडियासोबत होते. त्यानंतर लक्ष्मण हेड कोच म्हणून न्यूझीलंड दौऱ्यावर गेलं होता.
एनसीएत (National Cricket Academy) क्रिकेटर तयार करण्यासोबतच लक्ष्मण 2022 च्या अंडर 19 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियासोबत होता. तसेच वेस्टइंडिजमध्ये युवा टीमसोबत महत्त्वाची भूमिका बजावली होती. टीममध्ये स्पिलिट कोचिंगच्या शक्यतेबाबत बीसीसीआय अजून तरी इच्छूक नसल्याचं वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं.