Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोबाईलवर फ्रिमध्ये पाहा IPL 2025 मॅच, Jio, Airtel, Vi वर कसा पाहाल थरार

आयपीएल 2025 च्या 20-20 फॉरमॅटच्या क्रिकेट मॅचेसचा हाय व्होल्टेस ड्रामा पुढील 90 दिवस तुमच्या दिवाणखाण्यात टीव्हीवर पाहाता येणार आहे. परंतू ज्यांना कामानिमित्त प्रवासात किंवा इतर ठिकाणी मोबाईलवर हे क्रिकेट सामने पाहायचे असतील तर त्यांच्यासाठी हे रिचार्ज प्लान उपयोगी ठरतील.

मोबाईलवर फ्रिमध्ये पाहा IPL 2025 मॅच, Jio, Airtel, Vi वर कसा पाहाल थरार
Follow us
| Updated on: Mar 22, 2025 | 4:29 PM

IPL 2025 Matches Live: आयपीएल 2025 चा थरार आज सायंकाळपासून ( 22 मार्च 2025 )सुरु होत आहे.  ट्रॉफी जिंकण्यासाठी एकूण 10 टीम भारतातील विविध शहरात मॅच खेळणार आहेत. आयपीएल 2025 चे लाईव्ह प्रसारण स्‍टार स्‍पोर्ट्स नेटवर्कवर होणार आहे. ज्या प्रेक्षकांना मोबाईल आणि टीव्हीवर ऑनलाईन मॅच पाहायच्या आहेत त्यांना जिओ हॉटस्टारवर मॅच पाहाता येणार आहे. तर जिओ, एअरटेल आणि व्होडा-आयडिया कोणते रिचार्ज प्लान आहेत. ज्यात जिओ हॉटस्टारचे सब्सक्रिप्शन दिले आहे ते पाहूयात….

Jio चे जिओ हॉटस्‍टारचे प्रीपेड रिचार्ज प्लान

जिओने आयपीएल सुरु होण्याआधीच आपल्या ग्राहकांनी एक शानदार ऑफर आणली आहे.जर कोणताही ग्राहक 299 रुपयांचा वा त्याहून अधिक किंमतीचा नवीन जिओ सिम विकत घेत असेल किंवा सध्याच्या मोबाईल क्रमांकावर 299  रुपयांचा रिचार्ज करत असेल तर त्याला संपूर्ण सिझन मोफत पाहायला मिळणार आहे. ही सुविधा जिओ हॉटस्टार ऐपद्वारे उपलब्ध होणार आहे. अशा पद्धतीने ग्राहकांना कोणताही अतिरिक्त खर्च न करता सर्व मॅच पाहायला मिळणार आहे.

या सोबत ग्राहकांना 4K क्वालिटीचा व्हिडीओ स्ट्रीमिंगचे सब्सक्रिप्शन देखील दिले जाणार आहे. ज्यामुळे उत्कृष्ट क्वालिटीत खेळ पाहण्याचा आनंद घेता येणार आहे. हे सब्सक्रिप्शन ९० दिवसांपर्यंत व्हॅलिड असणार आहे. ग्राहकांना दीर्घकाळ याचा लाभ मिळणार आहे. ही ऑफर ३१ मार्च पर्यंत लागू असणार आहे.

हे सुद्धा वाचा

Airtel च्या कोणत्या रिचार्जवर जिओ हॉटस्‍टार

एयरटेलच्या प्रीपेड रिचार्जमध्ये जिओहॉटस्टारचे सब्सक्रिप्शन मिळत नाही. परंतू काही खास प्लान्स मध्ये डिजनी प्लस हॉटस्टारचा लाभ घेता येतो. अलिकडेच डिजनी प्लस हॉटस्टार आणि जिओ सिनेमा यांच्या मर्जरमुळे जिओहॉटस्टार नावाचा नवा प्लॅटफॉर्म तयार झाला आहे. या प्लान्स सोबत युजर्स आयपीएल 2025 चा फ्रिमध्ये आनंद घेऊ शकतात.

3999 रुपये: 365 दिवसाची व्हॅलिडिटी

549 रुपये: 28 दिवसाची व्हॅलिडिटी

1029 रुपये: 84 दिवसाची व्हॅलिडिटी

398 रुपये: 28 दिवसाची व्हॅलिडिटी

या रिचार्जसोबत डिजनी + हॉटस्टार सब्सक्रिप्शन मिळते, ज्यामुळे एअरटेल यूजर्स आपल्या मोबाईलवर आयपीएलचे क्रिकेट सामने पाहू शकतात.

Vi च्या जिओहॉटस्‍टारसाठी प्रिपेड रिचार्ज

व्होडाफोन-आयडिया (VI) आपल्या तीन प्रमुख प्रिपेड रिचार्ज प्लान्सवर जिओहॉटस्टारचे सब्सक्रिप्शन ऑफर करत आहे

469 रुपये: 28 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह जिओहॉटस्टार सब्सक्रिप्शन

994 रुपये: 84 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह जिओहॉटस्टार सब्सक्रिप्शन

3699 रुपये: 365 दिवसांची व्हॅलिडिटी (वार्षिक) जिओहॉटस्टार सब्सक्रिप्शन

या प्लान्स सोबत तुम्ही जिओहॉटस्टारवर प्रिमियम कंटेंट, उदाहरणार्थ IPL 2025, मोफत पाहू शकता. तसेच हे रिचार्ज डेटा, कॉल आणि SMS बेनिफिट्स देखील देतात. लेटेस्ट माहितीसाठी आणि ऑफर्ससाठी VIच्या वेबसाईट वा एपवर देखील चेक करु शकता.

साहब के बारे में क्या बोला तूने, शिवसैनिकाची कामराला धमकी,ऑडिओ व्हायरल
साहब के बारे में क्या बोला तूने, शिवसैनिकाची कामराला धमकी,ऑडिओ व्हायरल.
कोरटकरच्या सुनावणी दरम्यान कोर्टात काय झालं? इनसाईड स्टोरी
कोरटकरच्या सुनावणी दरम्यान कोर्टात काय झालं? इनसाईड स्टोरी.
हातात कोल्हापूरी अन् चिल्लर, कोरटकर विरोधात शेकडो शिवप्रेमी आक्रमक
हातात कोल्हापूरी अन् चिल्लर, कोरटकर विरोधात शेकडो शिवप्रेमी आक्रमक.
सेना-भाजप युतीवरून राऊतांनी घेतली फडणवीसा बाजू
सेना-भाजप युतीवरून राऊतांनी घेतली फडणवीसा बाजू.
संजय राऊत अन् कुणाल कामरा एकाच बापाचे..., शिवसेना आमदाराचा हल्लाबोल
संजय राऊत अन् कुणाल कामरा एकाच बापाचे..., शिवसेना आमदाराचा हल्लाबोल.
कार्यकर्त्यांची रेलचेल अन् संभाषणासाठी वापरायला पोलिसांचे मोबाईल..
कार्यकर्त्यांची रेलचेल अन् संभाषणासाठी वापरायला पोलिसांचे मोबाईल...
मी दुर्लक्ष केलं...कामराने उलडवलेल्या खिल्लीनंतर शिंदे स्पष्टच म्हणाले
मी दुर्लक्ष केलं...कामराने उलडवलेल्या खिल्लीनंतर शिंदे स्पष्टच म्हणाले.
कामराची माफी नाहीच...शिवसैनिकांच्या आक्रमक भूमिकेनंतर पहिलं ट्वीट काय?
कामराची माफी नाहीच...शिवसैनिकांच्या आक्रमक भूमिकेनंतर पहिलं ट्वीट काय?.
शिव्या देतो माझ्या छातीला..,माजी नगरसेवकाला महिला कार्यकर्त्याकडून चोप
शिव्या देतो माझ्या छातीला..,माजी नगरसेवकाला महिला कार्यकर्त्याकडून चोप.
धारावीत ब्लास्ट, 10 हून अधिक सिलिंडरचा भीषण स्फोट, क्षणार्धात भस्मसात
धारावीत ब्लास्ट, 10 हून अधिक सिलिंडरचा भीषण स्फोट, क्षणार्धात भस्मसात.