AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sarfaraz Khan ला शतकानंतर कोच अमोल मजूमदार यांनी दिला खास सम्मान, आपली हॅट काढून सलामी दिली VIDEO

टीम इंडियात निवड न झाल्यामुळे त्याच्या मनात किती खदखद आहे, ते यातून दिसून आलं. शतक झळकवल्यानंतर सर्फराजन खानने सिद्धू मुसेवालाच्या स्टाइलमध्ये रिएक्ट केलं.

Sarfaraz Khan ला शतकानंतर कोच अमोल मजूमदार यांनी दिला खास सम्मान, आपली हॅट काढून सलामी दिली VIDEO
Sarfaraz khanImage Credit source: Screengrab
| Updated on: Jan 18, 2023 | 11:35 AM
Share

Sarfaraz Khan Ranji Trophy: मुंबईचा टॅलेंटेड बॅट्समन सर्फराज खानची ऑस्ट्रेलिया विरुद्ध टेस्ट सीरीजसाठी टीम इंडियात निवड झाली नाही. पण म्हणून त्याच्या परफॉर्मन्सवर काहीही परिणाम झालेला नाही. रणजी ट्रॉफीच्या ग्रुप बी च्या सामन्यात मंगळवारी सर्फराजने दिल्ली विरुद्ध शतक ठोकलं. मुंबईच्या या युवा प्लेयरच रणजी ट्रॉफीच्या या सीजनमधील तिसरं शतक आहे. सर्फराज खानने पुन्हा एकदा आपल्या परफॉर्मन्सने निवड समितीच लक्ष वेधून घेतलय. मुंबईच्या टीमने दिल्ली विरुद्ध पहिल्या इनिंगमध्ये 293 धावा केल्या. सर्फराज खानच्या 125 धावा हे मुंबईच्या इनिंगच वैशिष्टय ठरलं.

अमोल मजुमदार यांनी दिलेला सन्मान पाहण्यासारखा

सर्फराजने शतक झळकवल्यानंतर फुल जोशात सेलिब्रेशन केलं. टीम इंडियात निवड न झाल्यामुळे त्याच्या मनात किती खदखद आहे, ते यातून दिसून आलं. शतक झळकवल्यानंतर सर्फराजन खानने सिद्धू मुसेवालाच्या स्टाइलमध्ये रिएक्ट केलं. दुसऱ्याबाजूला मुंबई टीमचे कोच अमोल मजूमदार यांनी सर्फराजला जो सन्मान दिला, ते पाहण्यासारख होतं.

या सन्मानाची भरपूर चर्चा

सर्फराजने शतक झळकवताच संपूर्ण ड्रेसिंग रुममध्ये आनंदाची लाट पसरली. टीमचे कोच अमोल मजूमदार आपल्या सीटवरुन उठले. त्यांनी आपली टोपी काढून सर्फराजला आपल्या कृतीमधून सन्मान दिला. सर्फराजच्या कोचनी त्याला हा सन्मान देऊन येणाऱ्या दिवसात हा बॅट्समन नाव कमावणार हे जगाला दाखवून दिलं. मजूमदार यांनी सर्फराजला जो सन्मान दिला, त्याची भरपूर चर्चा आहे. सिलेक्टर काय म्हणाले?

टीममध्ये निवड न झाल्यान सर्फराज खानने दु:ख व्यक्त केलं. तुला लवकरच चांगले दिवस येतील, असं सिलेक्टर्सनी आपल्याला सांगितलं होतं. पण चांगल खेळूनही टीममध्ये स्थान मिळालं नाही, अशी खंत सर्फराजने बोलून दाखवली. मुख्य सिलेक्टर चेतन शर्मा यांनी मला सांगितलं होतं की, थोडी वाट पाहा, तुला लवकरच संधी मिळेल. ऑस्ट्रेलिया विरुद्ध टेस्ट सीरीजसाठी निवड झाली नाही. त्याबद्दल त्याने नाराजी प्रगट केली. सर्फराज खानच्या जागी सूर्यकुमार यादवला टीममध्ये स्थान मिळालं.

निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?
निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?.
बीडमध्ये दादांना धक्का तर भाजपचं वर्चस्व, 2 नगरसेवकपदाचे उमेदवार विजयी
बीडमध्ये दादांना धक्का तर भाजपचं वर्चस्व, 2 नगरसेवकपदाचे उमेदवार विजयी.
संजय गायकवाड यांची पत्नी आघाडीवर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर
संजय गायकवाड यांची पत्नी आघाडीवर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर.
भाजपला मोठा धक्का, फुलंब्रीमध्ये उद्धव ठाकरे यांची सेना आघाडीवर
भाजपला मोठा धक्का, फुलंब्रीमध्ये उद्धव ठाकरे यांची सेना आघाडीवर.
साताऱ्यातील मतमोजणीत दोन्ही राजेंना धक्का तर 3 अपक्ष आघाडीवर
साताऱ्यातील मतमोजणीत दोन्ही राजेंना धक्का तर 3 अपक्ष आघाडीवर.
मतमोजणीत महायुती आघाडीवर, भाजप नंबर 1, 100 चा आकडा पार
मतमोजणीत महायुती आघाडीवर, भाजप नंबर 1, 100 चा आकडा पार.
बारामतीत अजित पवार vs शरद पवार संघर्ष, दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला
बारामतीत अजित पवार vs शरद पवार संघर्ष, दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला.
राजगुरुनगरमध्ये वळसे-पाटील अन् अमोल कोल्हेंची प्रतिष्ठा पणाला
राजगुरुनगरमध्ये वळसे-पाटील अन् अमोल कोल्हेंची प्रतिष्ठा पणाला.
कणकवलीत राणे बंधूंमध्ये चुरस, कोण मारणार बाजी? निकालाची प्रतीक्षा
कणकवलीत राणे बंधूंमध्ये चुरस, कोण मारणार बाजी? निकालाची प्रतीक्षा.
नादच खुळा...निकालाआधी कोल्हापुरात विजयाचे बॅनर, कागलमध्ये कुणाची चर्चा
नादच खुळा...निकालाआधी कोल्हापुरात विजयाचे बॅनर, कागलमध्ये कुणाची चर्चा.