IND vs SL: स्टेडियममधून बाहेर पडताना विराटची मन जिंकून घेणारी कृती, कोण आहे धर्मवीर पाल? पहा VIDEO
IND vs SL: मागच्या काही दिवसांपासून विराट कोहलीची बरीच चर्चा होती. कारण मोहालीत विराट (Virat kohli) आपल्या क्रिकेट करीयरमधला 100 वा कसोटी सामना खेळला.
चंदीगड: मागच्या काही दिवसांपासून विराट कोहलीची बरीच चर्चा होती. कारण मोहालीत विराट (Virat kohli) आपल्या क्रिकेट करीयरमधला 100 वा कसोटी सामना खेळला. BCCI ने अगदी अखेरच्या क्षणी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये उपस्थित रहाण्याची परवानगी दिली. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांनाही विराटच्या 100 व्या कसोटीच्या निमित्ताने काही अविस्मरणीय क्षण अनुभवता आले. विराटने या कसोटीत बॅटने फारशी चमक दाखवली नाही. विराटने पहिल्या डावात फक्त 45 धावांची खेळी केली. भारताने श्रीलंकेविरुद्धचा (India vs Srilanka test) हा कसोटी सामना डावाने जिंकला. त्यामुळे दुसऱ्याडावात विराटला फलंदाजीची संधीच मिळाली नाही. सबकुछ रवींद्र जाडेजा असंच या कसोटीचं स्वरुप होतं. कारण त्याने पहिल्या डावात नाबाद 175 धावांची खेळी केली. त्याशिवाय दोन्ही डावात मिळून नऊ विकेट घेतल्या.
क्रिकेट चाहतेही चांगलेच जोशात आले
विराटला या कसोटीत फारशी चमक दाखवला आली नाही. पण त्याने त्याच्या 100 व्या कसोटी सामान्यात प्रेक्षकांच खूप मनोरंजन केलं. मैदानावर असताना विराटने टीमचा उत्साह वाढवण्यासाठी प्रेक्षकांना चांगलचं प्रोत्साहीत केलं. त्यामुळे क्रिकेट चाहतेही चांगलेच जोशात आले होते. मैदानावर प्रेक्षकांना आनंद दिल्यानंतर मैदानाबाहेरही विराटने आपल्या कृतीने सर्वांच मन जिंकून घेतलं. विराटने सामना संपल्यानंतर भारताच्या अनऑफिशिअल 12 व्या खेळाडूला स्वत:ची राष्ट्रीय जर्सी भेट म्हणून दिली.
हा अनऑफिशिअल 12 वा खेळाडू कोण आहे?
धर्मवीर पाल हा क्रिकेटचा मोठा चाहता आहे. भारताच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाबद्दल त्याला प्रचंड प्रेम आणि आपुलकी आहे. धर्मवारी स्वत: दिव्यांग आहे. त्याला पोलिओची बाधा झाली होती. पण असं असूनही धर्मवीरचं दिव्यांगपण कधीही त्याच्या क्रिकेटप्रेमाच्या आड येत नाही. सुधीर सारखाच भारतीय क्रिकेट संघाला पाठिंबा देण्यासाठी, त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी तो नेहमी स्टेडियमवर उपस्थित असतो. त्यामुळेच त्याला भारतीय क्रिकेट संघाचा अनऑफिशिअल 12 वा खेळाडू समजतात. धर्मवीर टीम इंडियातील अनेक खेळाडूंना ओळखतो. त्यांना तो भेटला सुद्धा आहे.
धर्मवीर स्वत: क्रिकेट खेळतो. तो मध्य प्रदेशचा आहे. मध्य प्रदेशच्या दिव्यांग खेळाडूंच्या क्रिकेट टीमचा तो कॅप्टन आहे. अखिल भारतीय क्रिकेट संघटनेकडून दिव्यांग क्रिकेटपटूंसाठी स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्यामध्ये धर्मवीर मध्य प्रदेशचे प्रतिनिधीत्व करतो. क्रिकेट माझ्या जगण्याचं कारण आहे, असं तो स्वत: सांगतो.
रविवारी श्रीलंकेवर 222 धावांनी विजय मिळवल्यानंतर टीम इंडिया स्टेडिममधून निघत होती. त्यावेळी बसच्या दिशेने जात असताना विरटाने धर्मवीरला पाहिलं. त्यावेळी विराटने स्वत:ची टीम इंडियाची जर्सी धर्मवीरला भेट म्हणून दिली. विराटने आपल्या या कृतीने सर्वांचच मन जिंकून घेतलं.