IND vs NZ : “आम्ही दाखवून दिलं आहे की, भारताला..”, न्यूझीलंडचा कर्णधार टीम साउदीने डिवचलं

न्यूझीलंडने भारतात चमत्कारीक कामगिरी केली आहे. भारताला तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 ने पराभूत करत मालिका विजय मिळवला आहे. आता तिसरा कसोटी सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यापूर्वी न्यूझीलंडचा कर्णधार टीम साउदीने इतर संघांना उदाहरण देत भारताला डिवचलं आहे.

IND vs NZ : आम्ही दाखवून दिलं आहे की, भारताला.., न्यूझीलंडचा कर्णधार टीम साउदीने डिवचलं
Follow us
| Updated on: Oct 29, 2024 | 7:48 PM

न्यूझीलंडने भारताला तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 ने नमवलं आहे. इतकंच काय तर भारताचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 अंतिम फेरीचं गणितही फिस्कटून टाकलं आहे. त्यामुळे आता तिसऱ्या सामन्यात भारताला काहीही करून विजय मिळवावा लागणार आहे. नाही तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत खऱ्या अर्थाने कसोटी लागणार आहे. भारताने यापूर्वी दोनदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. पण दोन्ही वेळेस पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. पहिल्या पर्वात न्यूझीलंडने पराभूत केलं होतं. तर दुसऱ्या पर्वात ऑस्ट्रेलियाने दारूण पराभव करत जेतेपदावर नाव कोरलं होतं. असं असताना तिसऱ्यांदा भारतीय संघ अंतिम फेरी गाठेल की नाही याबाबत आता सांगणं कठीण आहे. असं असताना न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी कर्णधार टीम साउदीचं वक्तव्य समोर आलं आहे. भारताला भारतात पराभूत करणं किती कठीण होतं? असा प्रश्न विचारल्यानंतर त्याने या मालिकेचं उदाहरण देत डिवचण्याचा प्रयत्न केला.,

“मला वाटते की तुम्ही मागच्या 12 वर्षात मागे वळून पाहाल तर अशी कामगिरी कोणी केलेली नाही. भारताने सलग 18 मालिका भारतात जिंकल्या आहेत. त्यामुळे भारतात भारताला पराभूत करणं आव्हान असतं. माझ्या दृष्टीकोनातून आणि मी गेल्या अनेक वर्षांमध्ये खेळलेले क्रिकेट पाहिल्यास, मला वाटते की भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन ठिकाणांचा दौरा करणे सर्वात कठीण आहे. दोन्ही परिस्थिती, संघाची गुणवत्ता आणि ते घरच्या मैदानावर किती चांगले आहेत, या दोन्हीमुळे दौरा करणे कठीण होते.पण आता आम्ही ते करून दाखवलं आहे. मला वाटते की हे जगभरातील इतर संघांना दाखवून दिलं आहे की भारतात भारताला पराभूत करणे शक्य आहे.”, असं न्यूझीलंडचा कर्णधार टीम साउदीने क्रिकबझशी बोलताना सांगितलं.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तिसरा कसोटी सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. 1 नोव्हेंबरपासून या सामन्याला सुरुवात होणार आहे. हा सामना जिंकून भारताला व्हाईट वॉश देण्याचा न्यूझीलंडचा प्रयत्न असेल. त्याचबरोबर तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून न्यूझीलंडचं अंतिम फेरीचं गणित आणखी सोपं होणार आहे. सध्या गुणातलिकेत न्यूझीलंडचा संघ चौथ्या स्थानावर आहे. तिसऱ्या सामन्यातील विजयानंतर विजयी टक्केवारीत वाढ होईल आणि तिसऱ्या स्थानावर पोहोचू शकते.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.