‘पुढच्या वेळी अर्जुन तेंडुलकरला सोडणार नाय’; गुजरात टायटन्सच्या ट्विटची चर्चा

लिलावाच्या दुसऱ्या दिवशी (रविवारी) रात्री उशिरा अर्जुनच्या नावावर बोली लावण्यात आली. मात्र तोपर्यंत ट्वीटरवर आणि इतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं होतं. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) अर्जुन तेंडुलकरला आपल्यासोबत ठेवणार की नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात होतं.

'पुढच्या वेळी अर्जुन तेंडुलकरला सोडणार नाय'; गुजरात टायटन्सच्या ट्विटची चर्चा
Arjun Tendulkar (PC : Instagram)
Follow us
| Updated on: Feb 14, 2022 | 10:42 AM

मुंबई : जगभरातली सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग म्हणजे आयपीएल (Indian Premier League). गेल्या दोन दिवसांपासून बंगळुरुमध्ये (Banglore) या स्पर्धेसाठी खेळाडूंचा लिलाव (TATA IPL 2022 Mega Auction) सोहळा पार पडला. एकूण 590 खेळाडूंची या मेगा ऑक्शनसाठी निवड झाली होती. त्यातल्या 203 खेळाडूंची फ्रेंचायजींनी खरेदी केली. यंदा आयपीएलमध्ये आठ नाही, तर 10 संघ (Teams) मैदानावर खेळताना दिसणार आहेत. सर्वच फ्रेंचायझींना 25 खेळाडू खरेदी करता येणार होते आणि त्यासाठी त्यांच्याकडे पर्समध्ये 90 कोटी रुपये होते. सर्व फ्रेंचायझींनी आपला कोटा पूर्ण केला आहे. जगभरातले क्रिकेटपटू आपल्या संघाकडून खेळावे यासाठी कोट्यवधी रुपये मोजले. दरम्यान, अनेकांचं लक्ष दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरवर (Arjun Tendulkar) होतं. यावर्षीसुद्धा मुंबईने अर्जुनला संघात घ्यायचं ठरवलं होतं. परंतु आणखी एका संघाने अर्जुनवर बोली लावली. तो संघ म्हणजे गुजरात टायटन्स.

लिलावाच्या दुसऱ्या दिवशी (रविवारी) रात्री उशिरा अर्जुनच्या नावावर बोली लावण्यात आली. मात्र तोपर्यंत ट्वीटरवर आणि इतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं होतं. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) अर्जुन तेंडुलकरला आपल्यासोबत ठेवणार की नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात होतं. गेल्याच वर्षी मुंबई इंडियन्सनं अर्जुन तेंडुलकरला आपल्या चमूत सामील करुन घेतलं होतं. त्यानंतर अर्जुन तेंडुलकरवर 20 लाखाची बेस प्राईज ठेवत त्याचा लिलाव केला गेला. यावेळी अर्जुन तेंडुलवरवर कितीची बोली लागते, याकडे सगळ्यांची नजर लागली होती. सचिन तेंडुलकरचा मुलगा (Son of Sachin Tendulkar) असलेल्या अर्जुनला मुंबई आपल्यासोबत ठेवणार काही नाही, याचीच जास्त चर्चा रंगली असतानाच मुंबईनं अर्जुनला 30 लाख रुपयांच्या बोलीवर संघात परत घेतलं.

अर्जुन तेंडुलकरची बेस प्राईस 20 लाख रुपये इतकी ठेवण्यात आली होती. त्यामुळे तो सोल्ड होतो की अनसोल्ड राहतो, याकडे अनेक जाणकारांची बारीक नजर होती. मुंबईसोबतच गुजरानंही अर्जुनसाठी बोली लावली होती. मात्र अखेर मुंबई इंडियन्सनं 30 लाखात त्याला विकत घेतलं आहे. गेल्या वर्षी दुखापतीमुळे अर्जुनला मुंबई इंडियन्सकडून एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नव्हती.

अर्जुनसाठी मुंबई आणि गुजरातमध्ये बिडींग वॉर

अर्जुनच्या नावाचा पुकारा झाल्यानंतर मुंबईने 20 लाखांची बोली लावली. तेवढ्यात गुजरातने 25 लाखांच्या बोलीचा पुकारा केला. त्यानंतर मुंबई इंडियन्स संघाचे मालक आकाश अंबानी गुजरातच्या टेबलकडे पाहून काहीतरी बोलताना दिसले आणि त्यानंतर त्यांनी 30 लाखांच्या बोलीचा पुकारा केला. त्यानंतर गुजरातने बोली लावली नाही. त्यामुळे अर्जुन आता मुंबईकडून खेळणार आहे.

दरम्यान, गुजरात टायटन्सने एक ट्विट करुन मुंबई इंडियन्सला इशारा दिला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, “अर्जुन पे निशाना था (आमचा निशाणा अर्जुनवर होता) आम्ही पुढच्या वेळी त्याला असं सोडणार नाही. आमच्या नेहराजींना (गुजरात टायटन्सचे प्रशिक्षक आणि भारताचा माजी जलदगती गोलंदाज आशिष नेहरा) डावखुरे जलदगती गोलंदाज खूप आवडतात.”

इतर बातम्या

खेळाडूंची किंमत वाढवतो, पण घेत तर नाही! कोणंय हा, जो खाली करतोय प्रतिस्पर्ध्यांची कोटींची पर्स?

DC IPL 2022 Auction: ‘त्या’ माणसाने किंमत वाढवून दुसऱ्यांची पर्स रिकामी केली पण स्वत: कमी बजेटमध्ये बांधला दिल्लीचा उत्तम संघ

अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.