Icc World Cup 2023 | वनडे वर्ल्ड कपसाठी टीम जाहीर, ‘या’ खेळाडूंना संधी
क्रिकेट विश्वातून या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. आगामी आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 साठी टीम जाहीर करण्यात आली आहे. पाहा कुणाला संधी मिळाली.
मुंबई | आगामी एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेच्या दृष्टीकोनातून सर्वच संघांनी 2023 च्या सुरुवातीपासूनच सुरुवात केली आहे. या एकदिवसीय वर्ल्ड कपच्या यजमानपदाचा मान हा भारताकडे आहे. भारताला 2011 नंतर पहिल्यांदाच आयसीसी स्पर्धेच्या आयोजनाचा मान मिळाला आहे. ही बहुप्रतिक्षित स्पर्धेचं आयोजन हे ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान करण्यात येणार आहे. टीम इंडियाने अखेरचा वर्ल्ड कप हा 2011 सालीच महेंद्रसिंह धोनी याच्या नेतृत्वात जिंकला होता. त्यानंतर 2013 मध्ये आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी जिंकली होती. मात्र तेव्हापासून टीम इंडियाला एकदाही आयसीसीच्या कोणत्याही स्पर्धेत विजय मिळवता आलेला नाही.
सध्या सर्व देशाचे क्रिकेटर हे आयपीएल 16 व्या मोसमात खेळत आहेत. या स्पर्धेत प्लेऑफसाठी चुरस पाहायला मिळतेय. अशातच आता मोठी बातमी समोर आली आहे. वर्ल्ड कपसाठी टीमची घोषणा करण्यात आली आहे. एकूण 15 सदस्यीय संघ जाहीर करण्यात आलाय. या 15 पैकी 7 खेळाडू हे आयपीएलचा भाग आहेत.
वेस्टइंडिज क्रिकेट बोर्डाने वर्ल्ड कप क्वालिफायर सामन्यांसाठी संघ जाहीर केला आहे. विंडिज टीम झिंबाब्वेमध्ये होणाऱ्या क्लालिफायर सामन्यातही खेळणार आहेत. विंडिज क्रिकेट टीमला वर्ल्ड कपमध्ये खेळण्यासाठी पात्र होण्यासाठी टॉप 2 मध्ये येण्याची गरज आहे, अन्यथा विंडिजचं वर्ल्ड कप खेळण्याचं स्वप्न अधुरं राहिलं. या क्वालिफायर सामन्याचं आयोजन हे 18 जूनपासून करण्यात आलं आहे. यामध्ये एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत.
अशी आहे विंडिज टीम
? BREAKING NEWS? CWI announces the squad for the ICC Cricket World Cup Qualifiers in Zimbabwe.
Read More⬇️https://t.co/bjgciuW1F5
— Windies Cricket (@windiescricket) May 11, 2023
कोणत्या खेळाडूंना मिळाली संधी?
विडिंज क्रिकेट बोर्डाने शाई होप याच्याकडे संघाची धुरा सोपवली आहे. तर रोवमॅन पॉवेल हा उपकर्णधार असणार आहे. 15 खेळाडूंपैकी 7 खेळाडू हे आयपीएलचा भाग आहेत.
अशी आहे विंडिज टीम| शाई होप (कर्णधार), रोवमॅन पॉवेल (उपकर्णधार), शमर ब्रूक्स, यानिक कारिया, कीसी कार्टी, रोस्टन चेज, जेसन होल्डर, अकील होसेन, अल्जारी जोसेफ, ब्रँडन किंग, कायल मेयर्स, गुडाकेश मोती, कीमो पॉल, निकोलस पूरन आणि रोमारियो शेफर्ड.
दरम्यान विडिंज क्रिकेट बोर्डाने यासह यूएई विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठीही संघ जाहीर केला आहे. एकूण 3 सामन्यांची ही मालिका असणार आहे. या मालिकेला 5 जूनपासून सुरुवात होणार आहे. वर्ल्ड कप क्वालिफायर सामन्यांआधी ही मालिका पार पडणार आहे.
यूएई विरुद्धच्या वनडे सीरिजसाठी विंडिज टीम | शाई होप (कॅप्टन), ब्रँडन किंग (उपकर्णधार), एलिक अथानाजे, शमरह ब्रूक्स, यानिक कारिया, कीसी कार्टी, रोस्टन चेज, डोमिनिक ड्रेक्स, केवम हॉज, अकीम जॉर्डन, गुडाकेश मोती, कीमो पॉल, रेमन रीफर, ओडियन स्मिथ आणि डेवोन थॉमस.