Yashasvi Jaiswal : यशस्वी जयस्वाल याला सेहवाग, गांगुली यांच्या मानाच्या यादीत एन्ट्री करण्याची संधी? एक पाऊल दूर!
दुसऱ्या दिवशी जयस्वालला मानाच्या पंक्तीत जागा मिळणार आहेत. यामध्ये वीरेंद्र सेहवाग, सौरव गांगुली, सुरेश रैनासारखे खेळाडू आहेत. हा विक्रम रचण्यापासून जयस्वाल फक्त एक पाऊल दूर आहे.
मुंबई : वेस्ट आणि भारतामध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटीमध्ये टीम इंडियाचा स्टार युवा खेळाडू यशस्वी जयस्वाल याने जबरदस्त सलामी दिली आहे. विंडिजमध्ये सुरू असलेल्या कसोटीमध्ये टीम इंडियाने पकड मिळवली आहे. विंडिजला 150 धावांवर गुंडाळल्यावर रोहित शर्मा नाबाद 30 धावा आणि यशस्वी जयस्वाल नाबाद 40 धावांवर खेळत आहेत. मात्र दुसऱ्या दिवशी जयस्वालला मानाच्या पंक्तीत जागा मिळणार आहेत. यामध्ये वीरेंद्र सेहवाग, सौरव गांगुली, सुरेश रैनासारखे खेळाडू आहेत. मात्र यासाठी त्याला आणखी 60 धावा करायच्या आहेत.
परदेशात आपल्या पहिल्या कसोटी सामन्यामध्ये शतक करणारे मोजकेच खेळाडू आहेत. ज्यांनी आपल्या पहिल्या सामन्यात शतक ठोकलं आहे. यामध्ये दिग्गजांचा समावेश असून सौरव गांगुली, सुरिंदर अमरनाथ, सुरेश रैना, अब्बास अली बेग, वीरेंद्र सेहवाग आणि प्रवीण अमरे हे खेळाडू आहेत. यामधील वीरेंद्र सेहवागने 2001 मध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये हा विक्रम केला होता, सौरव गांगुलीने 1996 मध्ये लॉर्ड्सवर, सुरेश रैनाने 2010 मध्ये कोलंबोमध्ये हा पदार्पण सामन्यात शतक केलं होतं.
यशस्वी जयस्वाल याने 73 चेंडूत 40 धावा केल्या आहेत यामध्ये त्याने 6 चौकार मारले आहेत. दुसऱ्या दिवशी डावाची सुरूवात सावध करून नंतर धावा करण्याची त्याला संधी आहे. जर त्याने ही कामगिरी केली तर यशस्वीची टीम इंडियामधील जागा पक्की होण्याची दाट शक्यता आहे.
वेस्ट इंडिज प्लेइंग इलेव्हन | क्रेग ब्रेथवेट (कर्णधार), टॅगेनरिन चंद्रपॉल, रेमॉन रेफर, जर्मिन ब्लॅकवूड, एलिक एथानझे, जोशुआ डासिल्वा, जेसन होल्डर, रहकीम कॉर्नवॉल, अल्झारी जोसेफ, केमर रोच आणि जोमे वॉरिकन.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार) , यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, रविंद्र जडेजा, इशान किशन, आर अश्विन, शार्दुल ठाकुर, जयदेव उनाडकट आणि मोहम्मद सिराज.