…जेव्हा देवानंदनं इम्रान खानला बॉलिवूडची ऑफर दिली!

पाकिस्तानचे विद्यमान पंतप्रधान आणि माजी अष्टपैलू क्रिकेटपटू इम्रान खानची (Imran Khan) गणना जगातील सर्वकालीन महान अष्टपैलू खेळाडूंमध्ये केली जाते. त्याच्या नेतृत्वाखालीच 1992 मध्ये पाकिस्तानने (Pakistan Cricket Team) पहिला एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. इम्रान खान केवळ त्याच्या क्रिकेटमुळे चर्चेत राहिला नाही. त्याच्या प्लेबॉय इमेजमुळेही तो चर्चेचा विषय असायचा.

...जेव्हा देवानंदनं इम्रान खानला बॉलिवूडची ऑफर दिली!
Imran Khan Image Credit source: (File Pic)
Follow us
| Updated on: Feb 24, 2022 | 10:15 AM

मुंबई : पाकिस्तानचे विद्यमान पंतप्रधान आणि माजी अष्टपैलू क्रिकेटपटू इम्रान खानची (Imran Khan) गणना जगातील सर्वकालीन महान अष्टपैलू खेळाडूंमध्ये केली जाते. त्याच्या नेतृत्वाखालीच 1992 मध्ये पाकिस्तानने (Pakistan Cricket Team) पहिला एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. इम्रान खान केवळ त्याच्या क्रिकेटमुळे चर्चेत राहिला नाही. त्याच्या प्लेबॉय इमेजमुळेही तो चर्चेचा विषय असायचा. त्याचे अनेक महिलांशी संबंध होते आणि त्याने याची उघड कबुलीदेखील दिली आहे. इम्रानची गणना जगातील हँडसम क्रिकेटर्समध्ये केली जात होती आणि त्यामुळेच त्याला एका मोठ्या भारतीय अभिनेत्याने चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली होती. आज आमच्या ओल्ड इज गोल्ड (Old is Gold) या खास सिरीजमध्ये आम्ही याच कथेबद्दल सागणार आहोत.

या सिरीजमध्ये आम्ही तुमच्यासाठी जुन्या मुलाखतींमधील रंजक किस्से घेऊन आलो आहोत. असाच एक किस्सा इम्रान खानच्या जीवनाचा आहे, जो त्याने 2006 मध्ये NDTV वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात सांगितला होता.

एनडीटीव्हीच्या शोमध्ये अँकर आणि ज्येष्ठ पत्रकार प्रणव रॉय यांनी इम्रानला विचारले की, तू बॉलिवूडमध्ये का येत नाहीस? याला उत्तर देताना इम्रान म्हणाला की, भारतातील एका मोठ्या अभिनेत्याने मला चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली होती यावर तुमचा विश्वास बसणार नाही. यासाठी तो माझ्याकडे इंग्लंडमध्येही आला होता. इम्रानने हे सांगितल्यानंतर प्रेक्षकांनी त्याला त्या अभिनेत्याचे नाव विचारले, त्यावर इम्रान म्हणाला, “मी त्याचे नाव सांगणार नाही.”

त्यानंतर प्रणव रॉय यांनी इम्रानला त्याचे नाव सांगण्याचा आग्रह धरला, इम्रान म्हणाला, त्याचे नाव देवानंद होते. पण माझ्यासाठी हे आश्चर्यकारक होते. कारण मी एक क्रिकेटपटू आहे. मला अभिनय अजिबात येत नाही, त्यामुळे मी अभिनेता कसा होऊ शकतो.

इस्माइल मर्चंटनेदेखील ऑफर दिली होती

केवळ देवानंदच नव्हे तर इस्माइल मर्चंटनेदेखील इम्रानला चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली होती. इम्रानने त्यालादेखील नकार दिला. इम्रान म्हणाला की, इस्माइल मर्चंटनेदेखील मला त्याच्या चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली होती. तेव्हा मला अजूनच आश्चर्य वाटलं, कारण मला हाच प्रश्न होता की, मी कसा काय अभिनेता होऊ शकतो. मी कधी शाळेतल्या नाटकातदेखील काम केलं नव्हतं, त्यामुळे चित्रपटाचा विषय तर खूपच लांब आहे.

इम्रानची कारकीर्द

इम्रान खान पाकिस्तानसाठी 88 कसोटी सामने खेळला आहे आणि त्यात त्याने 3807 धावांसह 362 बळी घेतले आहेत. याशिवाय त्याने पाकिस्तानकडून एकदिवसीय सामन्यांमध्ये 175 सामने खेळले असून त्यात 3709 धावा आणि 182 विकेट्स त्याच्या नावावर आहेत.

इतर बातम्या

IND vs SL : ‘हिटमॅन’ शर्माकडे तीन विश्वविक्रमांची संधी, विराट, धवन, गप्टिलला मागे टाकणार?

ना रोहित, ना युवराज, IND vs SL T20 मधला सिक्सर किंग कोण? पाहा हिटिंग मास्टर्सची लिस्ट

IND vs SL : दीपक चाहरपाठोपाठ विस्फोटक फलंदाज संघाबाहेर, टीम इंडिया अडचणीत

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.