AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LLC 2024 : लीजेंड्स लीग स्पर्धा कुठे आणि कशी पाहता येणार? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर

लीजेंड्स लीग स्पर्धेची संपूर्ण तयारी झाली असून वेळापत्रकही समोर आलं आहे. या स्पर्धेत एकूण सामने पार पडणार आहेत. प्रत्येक संघ दोन वेळा आमनेसामने येणार आहेत. पहिला सामना 20 सप्टेंबरला होणार आहे.

LLC 2024 : लीजेंड्स लीग स्पर्धा कुठे आणि कशी पाहता येणार? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर
| Updated on: Sep 17, 2024 | 7:32 PM
Share

लीजेंड्स लीग स्पर्धेचा थरार 20 सप्टेंबरपासून अनुभवता येणार आहे. स्पर्धेसाठी ख्रिस गेल, सुरेश रैना, शिखर धवन, दिनेश कार्तिक, हरभजनसारख्या दिग्गज खेळाडूंनी कंबर कसली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये या खेळाडूंनी आपल्या खेळाची छाप सोडली आहे. त्यामुळे या स्पर्धेकडे पाहण्याचा दृष्टीकोनही बदलला आहे. लीजेंड्स लीग स्पर्धेचं हे तिसरं पर्व असून पहिल्या पर्वात इंडिया कॅपिटल्सने बाजी मारली होती. तर दुसऱ्या पर्वात मणिपल टायगर्सने जेतेपदावर नाव कोरलं होतं.  तिसऱ्या पर्वात कोण बाजी मारतो याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पहिलाच सामना कोणार्क सूर्या ओडिशा आणि मणिपाल टायगर्स यांच्या होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7 वाजता सुरु होईल.

लीजेंड्स लीग क्रिकेट (LLC) पूर्ण वेळापत्रक

20 सप्टेंबर 2024: कोणार्क सूर्या ओडिशा विरुद्ध मणिपाल टायगर्स 21 सप्टेंबर 2024: इंडिया कॅपिटल्स विरुद्ध हैदराबाद टीम 22 सप्टेंबर 2024: अर्बनायझर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात जायंट्स 23 सप्टेंबर 2024: साउथर्न सुपरस्टार्स विरुद्ध गुजरात जायंट्स 25 सप्टेंबर 2024: इंडिया कॅपिटल्स विरुद्ध साउथर्न सुपरस्टार्स 26 सप्टेंबर 2024: साउथर्न सुपरस्टार्स विरुद्ध गुजरात जायंट्स 27 सप्टेंबर 2024: कोणार्क सूर्या ओडिशा विरुद्ध मणिपाल टायगर्स 28 सप्टेंबर 2024: अर्बनायझर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात जायंट्स 29 सप्टेंबर 2024: इंडिया कॅपिटल्स विरुद्ध कोणार्क सूर्या ओडिशा 30 सप्टेंबर 2024: इंडिया कॅपिटल्स विरुद्ध मणिपाल टायगर्स 1 ऑक्टोबर 2024: मणिपाल टायगर्स विरुद्ध साउथर्न सुपरस्टार्स 2 ऑक्टोबर 2024:कोणार्क सूर्या ओडिशा विरुद्ध साउथर्न सुपरस्टार्स 3 ऑक्टोबर 2024: मणिपाल टायगर्स विरुद्ध अर्बनायझर्स हैदराबाद 4 ऑक्टोबर 2024: इंडिया कॅपिटल्स विरुद्ध कोणार्क सूर्या ओडिशा 5 ऑक्टोबर 2024: अर्बनायझर्स हैदराबाद विरुद्ध साउथर्न सुपरस्टार 5 ऑक्टोबर 2024: मणिपाल टायगर्स विरुद्ध गुजरात जायंट्स 6 ऑक्टोबर 2024: कोणार्क सूर्या ओडिशा विरुद्ध अर्बनायझर्स हैदराबाद 7 ऑक्टोबर 2024: इंडिया कॅपिटल्स विरुद्ध गुजरात जायंट्स 9 ऑक्टोबर 2024: अर्बनायझर्स हैदराबाद विरुद्ध साउथर्न सुपरस्टार 10 ऑक्टोबर 2024: इंडिया कॅपिटल्स विरुद्ध मणिपाल टायगर्स 11 ऑक्टोबर 2024:कोणार्क सूर्या ओडिशा विरुद्ध गुजरात जायंट्स

12 ऑक्टोबर 2024: प्लेऑफ 1 13 ऑक्टोबर 2024: एलिमिनेटर 14 ऑक्टोबर 2024 : प्लेऑफ 2 16 ऑक्टोबर 2024 : फायनल

लीजेंड्स लीग स्पर्धा 2024 स्पर्धा टीव्हीवर कुठे पाहता येईल?

लीजेंड्स लीग स्पर्धा 2024 स्पर्धा स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर लाइव्ह पाहता येईल.

लीजेंड्स लीग स्पर्धा 2024 स्पर्धा लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येईल?

लीजेंड्स लीग स्पर्धा 2024 स्पर्धेची लाइव्ह स्ट्रीमिंग फॅनकोड ॲप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल.

मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.