AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Olympics 2024 : पॅरिस ऑलम्पिक स्पर्धा भारतात कुठे पाहता येणार? या ॲपवर फ्रीमध्ये लाईव्ह स्ट्रीमिंग

चार वर्षानंतर पुन्हा एकदा ऑलिम्पिक स्पर्धांचा थरार क्रीडारसिकांना अनुभवता येणार आहे. ओलम्पिक स्पर्धांसाठी आता फार काही दिवस शिल्लक नाही. ओलम्पिक स्पर्धेचं हे 33वं पर्व असून 26 जुलैपासून 11 ऑगस्टपर्यंत ही स्पर्धा चालणार आहे. ही स्पर्धा पॅरिसमध्ये आयोजित करण्यात आली आहे. यावेळी ऑलम्पिकमध्ये 32 खेळांचा समावेश आहे.

Olympics 2024 : पॅरिस ऑलम्पिक स्पर्धा भारतात कुठे पाहता येणार? या ॲपवर फ्रीमध्ये लाईव्ह स्ट्रीमिंग
| Updated on: Jul 16, 2024 | 8:27 PM
Share

ऑलम्पिक 2024 स्पर्धेचं 33वं पर्व पॅरिसमध्ये आयोजित करण्यात आलं आहे. जगभरातील दहा हजाराहून अधिक स्पर्धक भाग घेणार आहेत. भारताच्या दलात 113 स्पर्धक सहभागी आहेत. पॅरिस ऑलम्पिकमध्ये 32 खेळांच्या 329 स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.तीरंदाजी, एथलेटिक्स, बॅडमिंटन, बॉक्सिंग, इक्वेस्ट्रियन, गोल्फ, हॉकी, शूटिंग, सेलिंग, टेबल टेनिस, टेनिस, कुस्ती, वेटलिफ्टिंग, स्विमिंग, रोव्हिंग, ज्युडो या खेळात भारतीय खेळाडू सहभागी आहे. भारताकडून नीरज चोप्रा, मीराबाई चानू आणि निखत जरीन यांच्याकडून पदकाची अपेक्षा आहे. पॅरिस ऑलम्पिक स्पर्धा 26 जुलैपासून 11 ऑगस्टपर्यंत आहे. भारतीय वेळेनुसार पॅरिसमधील वेळ ही 3 तास 30 मिनिटं मागे आहेत. ऑलम्पिक स्पर्धा अधिकृतरित्या 26 जुलैपासून सुरु होणार आहे. तर फुटबॉल आणि रग्बी सेवन्सचे सामने 24 जुलैपासून भारतीय वेळेनुसार संध्याकळी 6.30 वाजता सुरु होतील. दुसरीकडे, ऑलम्पिक समारोप कार्यक्रमात बदल होऊ शकतो. भारतीय ऑलम्पिक पथकाचं अभियाना 25 जुलैपासून सुरु होईल. तीरंदाजी फेरीने सुरुवात होईल. तर पहिला पदक कार्यक्रम 27 जुलैला 10 मीट एअर रायफल स्पर्धेपासून होईल.

पॅरिस ऑलम्पिक स्पर्धेत हे खेळ नसणार

टोक्यो ऑलम्पिक 2020 स्पर्धेत समितीने कराटे, बेसबॉल आणि सॉफ्टबॉल सहभागी केले होते. पण पॅरिस ऑलम्पिकमध्ये हे खेळ नसतील.ऑलंपिकमध्ये पहिल्यांदाच स्केटबोर्डिंग, स्पोर्ट क्लायम्बिंग, सर्फिंग आणि ब्रेकिंग अपारंपरिक खेळांचा समावेश झाला आहे. ब्रेकिंगला डान्सिंग असं संबोधलं जातं. हा खेळ पहिल्यांदाच खेळला जाणार आहे. पॅरिसमध्ये यापूर्वी दोन ऑलंम्पिक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. 1900 आणि 1924 मध्ये स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. पॅरिस हा लंडन तिसऱ्यांदा यजमानपद भूषविणार आहे. यापूर्वी टोक्यो ऑलंम्पिकमध्ये भारताच्या झोळीत एकूण 7 पदकं आली होती. या स्पर्धेत भारताकडून अपेक्षा वाढल्या आहेत.

ऑलम्पिक स्पर्धा कुठे पाहता येणार?

भारतीयांना ऑलिम्पिक स्पर्धा स्पोर्ट्स 18 चॅनेलवर पाहता येईल. तसेच जिओ सिनेमा अॅपवर ही स्पर्धा फ्रीमध्ये पाहू शकता. जिओ सिनेमाने ऑलम्पिक 2024 स्पर्धा फ्रीमध्ये दाखवण्याची घोषणा केली आहे. या व्यतिरिक्त क्रीडारसिक दूरदर्शन्चाय स्पोर्ट्स चॅनेलवर सामने पाहू शकता.

तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण
तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण.
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद.
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान.
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर.
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग.
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका.
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!.
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद.
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप.
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ.