AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022, GT vs MI, Purple cap : पर्पल कॅपच्या यादीत कोणता खेळाडू आघाडीवर? तुमचा आवडता खेळाडू नेमका कुठे? जाणून घ्या

सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅपने सन्मानित केलं जातं.. कालच्या सामन्यानंतर पर्पल कॅपच्या टेबलमधील बदल पाहुया...

IPL 2022, GT vs MI, Purple cap : पर्पल कॅपच्या यादीत कोणता खेळाडू आघाडीवर? तुमचा आवडता खेळाडू नेमका कुठे? जाणून घ्या
युझवेंद्र चहलकडे पर्पल कॅप कायमImage Credit source: tv9
| Updated on: May 07, 2022 | 10:07 AM
Share

मुंबई : दरवर्षी आयपीएल (IPL 2022) स्पर्धा सुरु झाल्यानंतर ऑरेंज आणि पर्पल कॅपकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष असतं. आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये कालच्या सामन्यात  मुंबई इंडियन्सने (MI) गुजरात टायटन्सचा (GT) पाच धावांनी पराभव केला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने 20 षटकांत 6 गडी गमावून 177 धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातचा संघ 20 षटकांत 5 गड्यांच्या मोबदल्यात 172 धावाच करू शकला. गुणतालिकेत अव्वल असलेल्या गुजरातसाठी हा पराभव आश्चर्यचकित करणारा ठरलाय. कारण 12व्या षटकापर्यंत संघाने 106 धावांत एकही विकेट गमावली नव्हती. त्यानंतर संघाची दमछाक झाली. अखेरच्या षटकात गुजरातला विजयासाठी नऊ धावांची गरज होती. मात्र, संघाला केवळ तीन धावा करता आल्या. शेवटच्या षटकात डॅनियल सॅम्सने अप्रतिम गोलंदाजी केली. तर त्याच्यासमोर डेव्हिड मिलर आणि राहुल टिओटिया होते. 20व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर एक धाव आली. दुसऱ्या चेंडूवर एकही रन नाही. तिसऱ्या चेंडूवर दोन धावा घेतल्यानं तेवातिया धावबाद झाला. राशिद खाननं चौथ्या चेंडूवर एक धाव घेतली. पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर सॅम्सने मिलरला एकही धाव काढू दिली नाही. अशा प्रकारे मुंबई जिंकली. दरम्यान, कालच्या सामन्यानंतर पर्पल कॅपच्या टेबलमध्ये काय बदल झालाय, पाहुया…

पर्पल कॅपचा मानकरी कोण?

आयपीएलच्या पर्पल कॅपच्या टेबलमधील टॉप फाईव्ह स्पर्धक पाहिल्यास पहिल्या स्थानी युझवेंद्र चहल आहे. याने आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये आतापर्यंत 19 विकेट घेतल्या आहेत. त्यानंतर कुलदीप यादव दुसऱ्या स्थानी आहे. त्याने 18 विकेट घेतल्या आहेत. तिसऱ्या स्थानी कगिसो रबाडा आहे. त्याने सतरा विकेट घेतल्या आहेत. चौथ्या स्थानी टी नटराजन आहे. त्याने देखील सतरा विकेट घेतल्या आहेत. तर पाचव्या स्थानी वानिंदू आहे. याने पंधरा विकेट आयपीएलच्या या सीजनमध्ये घेतल्या आहेत.

कोणाला दिली जाते ऑरेंज कॅप

दरवर्षी आयपीएल स्पर्धा सुरु झाल्यानंतर ऑरेंज आणि पर्पल कॅपकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष असतं. कारण आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप दिली जाते, तर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅपने सन्मानित केलं जातं. स्पर्धा सुरु असताना ऑरेंज आणि पर्पल कॅपचे मानकरी सतत बदलत असतात.

रोहित भाऊ जोरात, षटकारांचाच केला विक्रम

कर्णधार रोहित शर्मा काल चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता. त्यानं इशान किशनसोबत 74 धावांची सलामीची भागीदारी केली. मात्र, रोहितचं अर्धशतक हुकलं. रोहित 28 चेंडूंत 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं 43 धावा करून बाद झाला. रोहित शर्मानं सामन्यात सलामीला येत आक्रमक खेळी केली. त्याने पाच चौकार आणि दोन षटकार लगावत 28 चेंडूंमध्ये 43 धावा केल्या. त्याच्या या धावसंख्येचा मुंबईला चांगलाच फायदा देखील झाला. रोहितने आजच्या सामन्यात एकूण दोन षटकार लगावले आहे. हे षटकार लगावताच त्याने एकट्या मुंबई संघाकडून खेळताना 200 षटकार लगावण्याचा विक्रम केलाय. मुंबईकडून खेळताना त्याच्या नावावर आता 201 षटकार आहेत.

3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.