Abhinav Manohar : चप्पलविक्रेत्याचा मुलगा ते गुजरातचा विश्वासू फलंदाज, कोण आहे अभिनव मनोहर?

IPL 2022, GT vs RR, Abhinav Manohar: इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) 24 व्या सामन्यात गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) राजस्थानवर 37 धावांनी शानदार विजय मिळवला. या सामन्यात गुजरातने राजस्थानला विजयासाठी 193 धावांचे लक्ष्य दिले होते. पण राजस्थानला निर्धारीत 20 षटकात नऊ बाद 155 धावापर्यंतच मजल मारली. गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्या या विजयाचा हिरो ठरला. मात्र या […]

Abhinav Manohar : चप्पलविक्रेत्याचा मुलगा ते गुजरातचा विश्वासू फलंदाज, कोण आहे अभिनव मनोहर?
Abhinav Manohar - Hardik PandyaImage Credit source: IPL
Follow us
| Updated on: Apr 15, 2022 | 5:20 PM

IPL 2022, GT vs RR, Abhinav Manohar: इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) 24 व्या सामन्यात गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) राजस्थानवर 37 धावांनी शानदार विजय मिळवला. या सामन्यात गुजरातने राजस्थानला विजयासाठी 193 धावांचे लक्ष्य दिले होते. पण राजस्थानला निर्धारीत 20 षटकात नऊ बाद 155 धावापर्यंतच मजल मारली. गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्या या विजयाचा हिरो ठरला. मात्र या सामन्यात तसेच गुजरातच्या याआधीच्या सामन्यांमधून एका खेळाडूने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. तो खेळाडू म्हणजे अभिनव मनोहर (Abhinav Manohar). राजस्थान रॉयल्सविरुद्ध अभिनव मनोहरने 28 चेंडूत 43 धावांची खेळी केली. ज्यात चार चौकार आणि दोन उत्तूंग षटकारांचा समावेश होता. त्याने कर्णधार हार्दिक पंड्यासोबत मोठी भागीदारी केली. अभिनव मनोहर चांगली फलंदाजी करत होता, पण त्याला आपले अर्धशतक पूर्ण करता आले नाही. युझवेंद्र चहलने त्याला बाद केले.

लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध गुजरातला विजयासाठी शेवटच्या षटकात 11 धावांची गरज होती. तेव्हा अभिनवने उत्तम खेळी केली. या सामन्यात त्याने 15 धावा केल्या होत्या. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध त्याने 21 चेंडूत 35 धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 1 धाव आणि पंजाब किंग्जविरुद्ध त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही. IPL 2022 मध्ये अभिनव मनोहर आपल्या खेळाने सर्वांची मने जिंकत आहे. तो गुजरातच्या फलंदाजीतील एक मजबूत दुवा बनला आहे.

महालिलावात झाला मालामाल

अभिनव मधल्या फळीत आक्रमक फलंदाजीसह लेग ब्रेक गोलंदाजीदेखील करतो. अभिनव देशांतर्गत क्रिकेटमध्ये कर्नाटककडून खेळतो. या खेळाडूने आयपीएल 2022 मध्ये राजस्थान रॉयल्ससाठी टेस्ट दिली होती. लिलावात त्याची बेस प्राईस 20 लाख रुपये ठेवली, परंतु गुजरात टायटन्सने या खेळाडूला 2 कोटी 60 लाख रुपयांच्या बोलीवर खरेदी केले. अभिनव लिलावात 13 पट जास्त किमतीत विकला गेला.

वडिलांचं फूटवेरअचं दुकान

अभिनव मनोहर मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेला आहे. अभिनवचे वडील बंगळुरूमध्ये फुटवेअरचे दुकान (पादत्राणांचे दुकान) चालवत होते, ज्यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालायचा. अभिनवला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड आहे. अनेक अडचणींवर मात करत त्याने क्रिकेटचे धडे घेतले. अभिनव 27 वर्षांचा आहे. तो मूळचा कर्नाटकमधील बँगलोरचा आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीद्वारे त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये पाऊल ठेवलं. या स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर त्याला आयपीएलमध्ये सधी मिळाली.

इतर बातम्या

IPL 2022 Orange Cap : हार्दिक पांड्या जॉस बटलरमध्ये ऑरेंज कॅपसाठी चुरस, पांड्या काही धावांनी पिछाडीवर

Purple Cap 2022 : पर्पल कॅप युजवेंद्र चहलकडे, जाणून घ्या कोणते खेळाडू आहेत टॉप 10 मध्ये

IPL 2022, SRH vs KKR : आज कोलकाता विरुद्ध हैदराबाद सनराइजर्स सामना, कोलकाता दुसरं स्थान कायम राखणार?

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.