AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Who is Maa? पत्रकार परिषदेदरम्यान फोन वाजला आणि जस्टीन लँगरने प्रश्न करताच हास्यकल्लोळ, Watch Video

आयपीएल 2025 स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्सची गाडी पुन्हा एकदा विजयाच्या ट्रॅकवर परतली आहे. 27 कोटींचा ऋषभ पंत चारही सामन्यात फेल गेला असला तरी इतर खेळाडू चांगलं प्रदर्शन करत आहे. या विजयानंतर जस्टीन लँगर खूप खूश होता. पत्रकार परिषद सुरु असताना एक फोन वाजला आणि त्याने प्रश्न विचारताच हास्यकल्लोळ उडाला.

Who is Maa? पत्रकार परिषदेदरम्यान फोन वाजला आणि जस्टीन लँगरने प्रश्न करताच हास्यकल्लोळ, Watch Video
Image Credit source: video grab
| Updated on: Apr 05, 2025 | 4:49 PM
Share

आयपीएल 2025 स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्सने बलाढ्य असा मुंबई इंडियन्सचा 12 धावांनी पराभव केला. मुंबई इंडियन्स विरुद्ध आतापर्यंत एकूण सामने खेळले आहेत. त्यापैकी सहा सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने विजय मिळवला आहे. मुंबई इंडियन्सला पराभूत केल्याने लखनौ सुपर जायंट्सला गुणतालिकेत जबरदस्त फायदा झाला असून सहाव्या स्थानी विराजमान आहे. खरं तर 18व्या षटकापर्यंत हा सामना मुंबई इंडियन्सच्या पारड्यात झुकलेला होता. पण शार्दुल ठाकुर आणि आवेश खानने सामना खेचून आणला. या विजयानंतर लखनौ सुपर जायंट्सचा मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर खूश होता. याची प्रचिती पत्रकार परिषदेत आली. पत्रकार परिषदेत एक फोन वाडला आणि त्याने मजेशीर अंदाजात उत्तर दिलं. लँगर लखनौ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज मयंक यादवच्या फिटनेसवर विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देत होता. तेव्हा डेस्कवर ठेवलेल्या एका रिपोर्टरचा फोन वाजला.

जस्टीन लँगरचं उत्तर देताना लक्ष त्या फोनकडे गेलं. तेव्हा त्याने विचारल की, ‘माँ कोण आहे?’ (Who is Maa) कोणाची माँ फोन करत आहे? तुम्हाला असं वाटतं का मी त्यांना उत्तर देऊ? हॅलो, माँ.. आता 12 वाजून 8 मिनिटं झाली आहेत. मी एका पत्रकार परिषदेत आहे.’ लँगरचा असा अंदाज पाहून पत्रकार परिषदेतील प्रत्येक जण हसू लागला. तुम्हीही हा व्हिडीओ पाहिल्यानंतर हसाल हे मात्र नक्की

दरम्यान, लखनौ सुपर जायंट्सचे मुख्य प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी वेगवान गोलंदाज मयंक यादवबाबत महत्त्वाची अपडेट दिली. त्याने दिलेल्या माहितीनुसार, वेगवान गोलंदाज 90-95 टक्के फिट आहे. यापूर्वीच्या सामन्यात पंजाब किंग्सने लखनौ सुपर जायंट्सला पराभूत केलं होतं. त्यामुळे बरीच टीका झाली होती. पण मुंबई इंडियन्सला पराभूत करत विरोधकांना शांत केलं आहे. आता लखनौ सुपर जायंट्स 8 एप्रिलला कोलकाता नाईट रायडर्सशी सामना करणार आहे. हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डनवर होणार आहे. यापूर्वी हा सामना 6 एप्रिलला होणार होता. पण रामनवमीमुळे 8 एप्रिलला ढकलण्यात आला आहे.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.