AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rinku Singh : IPL 2023 मध्ये 5 चेंडूत 5 SIX मारुन मॅच फिरवणाऱ्या 9 वी पास मुलाची गोष्ट

Rinku Singh IPL 2023 : रिंकूचे वडिल घरोघरी सिलेंडर पोहोचवायच काम करायचे. दिल्लीत एका स्पर्धेत त्याला मॅन ऑफ द सीरीज म्हणून बाइक मिळाली होती. ती त्याने आपल्या वडिलांना देऊन टाकली.

Rinku Singh : IPL 2023 मध्ये 5 चेंडूत 5 SIX मारुन मॅच फिरवणाऱ्या 9 वी पास मुलाची गोष्ट
Rinku singhImage Credit source: IPL
Follow us
| Updated on: Apr 10, 2023 | 8:13 AM

GT vs KKR IPL 2023 : कोलकाता नाइट रायडर्सच्या रिंकू सिंहने काल गुजरात टायटन्स विरुद्ध कमालीची बॅटिंग केली. त्याने लास्ट ओव्हरमध्ये सलग 5 चेंडूंवर 6,6,6,6,6 सिक्स मारले. त्याने KKR च्या हातून निसटलेला सामना त्यांना जिंकवून दिला. रिंकू सिंहची बॅटिंग पाहून भल्या-भल्यांना आश्चर्याचा धक्का बसला. तो अशी काही अचाट कामगिरी करेल, याची कोणालाही कल्पना नव्हती. गुजरात टायटन्सने केकेआरला विजयासाठी 205 धावांच टार्गेट दिलं होतं.

प्रत्युत्तरात केकेआरने 19 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 176 धावा केल्या होत्या. लास्ट ओव्हरमध्ये त्यांना विजयासाठी 29 धावांची आवश्यकता होती.

अशक्य ते शक्य केलं

गुजरातच्या गोटात सेलिब्रेशन सुरु झालं होतं. कारण 6 चेंडूत 29 धावा जवळपास अशक्य वाटत होतं. गुजरात टायटन्सचा यश दयाल लास्ट ओव्हर टाकत होता. पहिल्या बॉलवर सिंगल काढून उमेश यादवने रिंकू सिंहला स्ट्राइक दिली. त्यानंतर रिंकूने जे केलं, ते अद्भूत होतं. अशा चमत्काराची कोणीही अपेक्षा केली नव्हती. रिंकूने यशच्या 5 चेंडूंवर 5 सिक्स मारले. 6 वा चेंडू असता, तर त्या बॉलवरही सिक्स मारला असता.

संघर्षमय रिंकूचा प्रवास

रिंकू आज आयपीएलमध्ये यश मिळवत असला, तरी इथवर पोहोचण्यासाठी त्याला संघर्ष करावा लागलाय. त्याचे वडिल घरोघरी सिलेंडर पोहोचवण्याचे काम करायचे. 2 खोल्यांच्या घरात त्याचं बालपण गेलय. कुटुंबाचा आर्थिक डोलारा सांभाळण्यासाठी सफाई कर्मचाऱ्याच काम करण्याचा विचार त्याच्या मनात आला. पण त्या परिस्थितीतही त्याने खेळावर लक्ष केंद्रीत केला. उत्तर प्रदेशच्या अंडर 16, अंडर 19 आणि अंडर 23, सेंट्रल झोनमधून खेळताना तो रणजी पर्यंत पोहोचला. 2017 साली आयपीएलमध्ये एंट्री केली. 2018 मध्ये त्याने पंजाबसोडून कोलकाताची निवड केली.

बीसीसीआयने बंदी का घातली?

कोलकाताने रिंकू सिंहला 80 लाख रुपयांमध्ये विकत घेतलं होतं. त्यानंतर त्याच्या गाडीने वेग पकडला. 2019 मध्ये अचानक या वेगाला ब्रेक लागला. बीसीसीआयने त्याच्यावर 3 महिन्यांची बंदी घातली. 2019 मध्ये परवानगी घेतल्याशिवाय तो अबू धाबीला टी 20 टुर्नामेंट खेळण्यासाठी निघून गेला. त्यामुळे बीसीसीआयने त्याच्यावर बंदी घातली. आता रिंकू सिंह जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडतोय. पंजाब किंग्सने रिंकूला किती लाखांना विकत घेतलेल?

आयपीएल 2017 च्या लिलावाआधी रिंकू सिंहला पंजाब किंग्सने 10 लाख रुपयांमध्ये विकत घेतलं होतं. त्या सीजनमध्ये त्याला फक्त एक मॅच खेळण्याची संधी मिळाली. रिंकूला 2014 मध्ये उत्तर प्रदेशकडून लिस्ट ए आणि टी 20 मध्ये डेब्यूची संधी मिळाली. त्यानंतर दोन वर्षांनी त्याने पंजाब विरुद्ध फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पाऊल ठेवलं. दिल्लीत एका स्पर्धेत त्याला मॅन ऑफ द सीरीज म्हणून बाइक मिळाली होती. ती त्याने आपल्या वडिलांना देऊन टाकली.रिंकू सिंहच शिक्षण फार झालेलं नाहीय. 9 वी पर्यंत त्याचं शिक्षण झालं आहे.

मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'
मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'.
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?.
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?.
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?.
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती.
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर.
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्...
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्....
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून...
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून....
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने.
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी.