chetan sharma : Virat Kohli ला कॅप्टनशिपवरुन हटवण्यात कोणाचा महत्त्वाचा रोल? स्टिंग ऑपरेशनमधून खुलासा

chetan sharma : क्रिकेटचे विश्लेषक आणि क्रिकेट चाहत्यांना नक्कीच यामुळे धक्का बसेल. फक्त भारतीय क्रिकेटच नाही, जागतिक क्रिकेटमध्ये या स्टिंग ऑपरेशनचे हादरे जाणवतील. चेतन शर्मा हे क्रिकेट विश्वातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आहेत.

chetan sharma : Virat Kohli ला कॅप्टनशिपवरुन हटवण्यात कोणाचा महत्त्वाचा रोल? स्टिंग ऑपरेशनमधून खुलासा
virat kohli
Follow us
| Updated on: Feb 15, 2023 | 8:26 AM

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संदर्भात अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत. बीसीसीआयच्या सिलेक्शन कमिटीचे प्रमुख चेतन शर्मा यांचं एक स्टिंग ऑपरेशन करण्यात आलं. त्यातून हैराण करुन टाकणाऱ्या काही गोष्टी समोर आल्या आहेत. क्रिकेटचे विश्लेषक आणि क्रिकेट चाहत्यांना नक्कीच यामुळे धक्का बसेल. फक्त भारतीय क्रिकेटच नाही, जागतिक क्रिकेटमध्ये या स्टिंग ऑपरेशनचे हादरे जाणवतील. चेतन शर्मा हे क्रिकेट विश्वातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आहेत. ते आपल्या निर्णयाने एखाद्या खेळाडूच करिअर बनवू शकतात आणि एखाद्याच करिअर खराबही करु शकतात. त्यांनी मीडियाच्या कॅमेऱ्यासमोर क्रिकेट विश्वात खळबळ उडवून देणारे दावे केले आहेत.

गांगुली-विराट वादात काय घडलं?

क्रिकेटला जंटलमन्स गेम म्हटलं जातं. पण या खेळात पडद्यामागे बरच काही घडत असतं. त्यामुळे क्रिकेटला जंटलमन्स गेम म्हणता येणार नाही. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली आणि माजी कर्णधार विराट कोहली यांच्यातील वादासंदर्भात धक्कादायक खुलासा केलाय. कुठलीही पूर्वकल्पना न देता आपल्याला कॅप्टनशिपवरुन हटवण्यात आलं, असा आरोप विराट कोहलीने सौरव गांगुलीवर केला होता.

खुलासा पॉइंट्समधून समजून घ्या

विराट कोहलीला कॅप्टनशिपवरुन हटवण्यात कोणाचा महत्त्वाचा रोल होता? चेतन शर्मा यांनी या संदर्भात काही महत्त्वाचे खुलासे केले आहेत. चेतन शर्मांनी केलेला खुलासा पॉइंट्समधून समजून घ्या.

विराटला कोणी हटवलं?

विराट कोहलीला कॅप्टनशिपवरुन हटवण्याचा निर्णय सौरव गांगुलीने घेतला नव्हता.

कोणाचा इगो मोठा होता?

गांगुली आणि विराट कोहलीमध्ये वादाच सर्वात मोठं कारण होतं, विराटचा इगो.

तिसरी महत्त्वाची बाब

कोहलीला वाटायच की, गांगुलीमुळे त्याला कॅप्टनशिप गमवावी लागली.

कोणाचे आरोप खोटे?

विराट कोहलीने गांगुलीवर जे आरोप केले ते खोटे होते.

पाचवी बाब

विराट कोहलीने जाणूनबुजून गांगुलीवर आरोप केले. चेतन शर्माने हे सर्व खुलासे केलेत. गांगुलीने विराटला टीम इंडियाच्या कॅप्टनशिपवरुन हटवण्याचा निर्णय घेतला नाही, मग हा निर्णय कोणाचा होता? त्याच उत्तरही चेतन शर्माने दिलय.

चेतन शर्मा यांनी जे सांगितलं, त्याचं सार हेच आहे की, विराट कोहलीला मर्यादीत षटकाच्या क्रिकेटमध्ये कॅप्टनशिपवरुन हटवण्याचा निर्णय चेतन शर्मा यांचा होता. त्याचा गांगुलीशी काहीही संबंध नाही. विराटला कॅप्टनशिपवरुन हटवून रोहित शर्माला कॅप्टन बनवण्याचा निर्णय सिलेक्शन कमिटीचा होता.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.