MI vs CSK IPL 2022 Head to Head: रोहित शर्माची मुंबई मारणार बाजी की जडेजाची जादू चालणार? जाणून घ्या आतापर्यंतची आकडेवारी

इंडियन प्रीमियर लीगचे दोन सर्वात यशस्वी संघ म्हणजे चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) गुरुवारी नवी मुंबईतल्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर आमनेसामने येतील.

MI vs CSK IPL 2022 Head to Head: रोहित शर्माची मुंबई मारणार बाजी की जडेजाची जादू चालणार? जाणून घ्या आतापर्यंतची आकडेवारी
Mumbai Indians - Chennai Super KingsImage Credit source: IPL
Follow us
| Updated on: Apr 20, 2022 | 5:59 PM

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगचे दोन सर्वात यशस्वी संघ म्हणजे चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) गुरुवारी नवी मुंबईतल्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर आमनेसामने येतील. मुंबईने ही आयपीएल ट्रॉफी पाच वेळा उंचावली आहे, तर चेन्नईने चार वेळा ही स्पर्धा जिंकली आहे, परंतु या दोन संघांची आयपीएल-2022 (IPL 2022) मधील आतापर्यंतची कामगिरी चांगली झालेली नाही. मुंबईने सहा सामने खेळले आहेत आणि हे सर्व सामने गमावले आहेत तर चेन्नईने सहापैकी केवळ एकच सामना जिंकला आहे. दोन्ही संघ गुणतालिकेच्या तळाशी आहेत. चेन्नई नवव्या क्रमांकावर आहे, तर मुंबई दहाव्या क्रमांकावर आहे. गुणतालिकेत चेन्नईचे दोन गुण आहेत, तर मुंबईचे खाते अद्याप उघडलेले नाही. रोहित शर्माचा संघ सध्या दबावाखाली असून संघाचा क्रिकेट संचालक झहीर खाननेही हे मान्य केले आहे.

मुंबईसाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे कारण हा संघ चेन्नईविरुद्धचा सामना जिंकू शकला नाही तर ते स्पर्धेतून बाहेर पडतील. त्याचं प्लेऑफचं आव्हान संपुष्टात येईल. त्यामुळेच त्यांच्यासाठी हा सामना करा किंवा मरा असा असणार आहे. तसेच चेन्नईसाठीही विजय खूप महत्त्वाचा आहे. या सामन्यात दोन्ही संघ जीव ओतून खेळतील.

हेड टू हेड आकडेवारी

मुंबई आणि चेन्नई अनेकदा फायनल खेळले आहेत. दोन्ही संघांमधील एकूण सामन्यांची आकडेवारी पाहिली तर दोन्ही संघांनी आतापर्यंत एकूण 34 सामने खेळले आहेत. यापैकी चेन्नईने 14 सामने जिंकले आहेत. मुंबईने 20 सामन्यांमध्ये विजय मिळवले आहेत. यंदाच्या मोसमात दोन्ही संघांचा फॉर्म चांगला नाही आणि त्यामुळे सद्यस्थितीत उद्याच्या सामन्यात कोणाचं पाडं जड असेल हे सांगणं कठीण आहे. आकडेवारीत मात्र मुंबईचा संघ चेन्नईवर वरचढ दिसत आहे.

मागील पाच सामन्यात मुंबईचा वरचष्मा

गेल्या पाच सामन्यांची आकडेवारी पाहिली तर इथेही मुंबईचा वरचष्मा आहे. मुंबईने गेल्या पाचपैकी तीन सामने जिंकले आहेत, तर चेन्नईच्या संघाला केवळ दोनच सामने जिंकता आले आहेत. चेन्नईने 19 सप्टेंबर 2021 रोजी खेळलेला सामना जिंकला होता, तर 1 मे 2021 रोजी खेळवण्यात आलेला सामना मुंबईने जिंकला होता. 23 ऑक्टोबर 2020 लाही मुंबई जिंकली. 19 सप्टेंबर 2020 रोजी झालेल्या सामन्यात चेन्नईने मुंबईचा पराभव केला. 12 मे 2019 रोजी मुंबई जिंकली होती.

इतर बातम्या

IPL 2022, LSG vs RCB , Purple Cap : बँगलोरचा लखनौवर मोठा विजय, पर्पल कॅपच्या टेबलमध्ये कोण अव्वल?

IPL 2022, LSG vs RCB, Orange Cap : बँगलोरचा लखनौवर ‘रॉयल’ विजय, ऑरेंज कॅपच्या टेबलमध्ये कोण अव्वल?

LSG vs RCB IPL 2022: रवीना टंडनच्या अदांनी केलं घायाळ, KGF 2 ची टीम डी.वाय.पाटील स्टेडियममध्ये

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.