AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘नेहमी हिंदूच का? स्थानिक काश्मिरी का नाहीत?’ पाकिस्तानी क्रिकेटपटू दानिश कनेरियाने व्यक्त केला संताप

जम्मू काश्मीरच्या पहलगाम हल्ल्याने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. कारण 28 निष्पाप नागरिकांना धर्म विचारून गोळ्या घातल्या आहेत. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरियाने या घटनेचा निषेध केला आणि स्थानिकांच्या पाठिंब्याशिवाय असे हल्ले शक्य नसल्याचा आरोप केला आहे.

'नेहमी हिंदूच का? स्थानिक काश्मिरी का नाहीत?' पाकिस्तानी क्रिकेटपटू दानिश कनेरियाने व्यक्त केला संताप
पहलगाम हल्ल्यावर दानिश कनेरियाची प्रतिक्रियाImage Credit source: TV9 Network
| Updated on: Apr 23, 2025 | 8:33 PM
Share

जम्मू काश्मीरला नंदनवन संबोधलं जातं. आयुष्यात एकदातरी या निसर्गरम्य ठिकाणी जाण्याची इच्छा असते. मात्र हेच नंदनवन मृत्यूचं दार झालं आहे. दहशतवादी हल्ला कधी होईल आणि जीवाला मुकावं लागेल सांगता येत नाही. दहशतवाद्यांनी नरकात रुपांतर केलं आहे. 22 एप्रिलला असाच भ्याड हल्ला पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केला आणि 28 निष्पाप नागरिकांचा बळी घेतला. यानंतर सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहेत. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरिया यानेही या भ्याड हल्ल्याचा निषेध केला आहे. हल्ला स्थानिक लोकांच्या पाठिंब्याशिवाय होऊ शकत नाही, असा आरोपही दानिश कनेरियाने केला आहे. दहशतवादी हल्ल्यांविरुद्ध माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू दानिश कनेरियाने आपलं रोखठोक म्हणणं मांडलं आहे.

“या दहशतवादी हल्ल्यांचे बळी स्थानिक काश्मिरी का नाहीत?” दहशतवादी स्थानिक काश्मिरींना कधीही लक्ष्य न करता वारंवार हिंदूंवर का हल्ले करतात? मग ते काश्मिरी पंडित असोत की संपूर्ण भारतातील हिंदू पर्यटक? कारण दहशतवाद कितीही लपलेला असला तरी तो एकाच विचारसरणीचे पालन करतो. संपूर्ण जग त्याची किंमत मोजत आहे,” असे कनेरियाने त्याच्या ‘एक्स’ सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केले आहे.

दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांच्या धर्माबद्दल विचारलं आणि ते हिंदू असल्याचे कळल्यानंतर गोळ्या घालून त्यांची हत्या केल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे.या भ्याड हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू झाला आहे. हे पर्यटक काश्मीरमध्ये सहलीसाठी आले होते. स्थानिकांच्या मदतीशिवाय अशा घडू शकत नाही अशा एका पोस्टला त्याने थेट उत्तर दिलं आहे. दानिश कानेरियाने या पोस्टला उत्तर देत म्हणाला की, अगदी बरोबर आहे.

पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद हाफीजनेही पहलगाम घटनेवर दुःख व्यक्त केले आणि त्याच्या एक्स अकाउंटवर लिहिले की, ‘मी दुःखी आहे, माझे हृदय दुखावलं आहे.’

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.