BCCI | मुंबईतलं बीसीसीआयचं ऑफिस खाली करण्यात येणार, कारण नक्की समजून घ्या

BCCI | बीसीसीआयच मुंबईतील ऑफिस बंद होणार आहे. बीसीसीआयच मुंबईतील क्रिकेट सेंटरच ऑफीस का बंद होतय? क्रिकेट विश्वातील एवढ्या श्रीमंत बोर्डाकडे स्वत:च ऑफिस नाही का?

BCCI | मुंबईतलं बीसीसीआयचं ऑफिस खाली करण्यात येणार, कारण नक्की समजून घ्या
BCCI headquarters at Wankhede StadiumImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Feb 24, 2023 | 10:36 AM

मुंबई : भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) हे क्रिकेट विश्वातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे. इंडियन प्रीमियर लीगचा 16 वा आणि वुमेन्स प्रीमियर लीगचा पहिला सीजन पुढच्या महिन्याात सुरु होणार आहे. त्याआधी बीसीसीआयच मुंबईतील ऑफिस बंद होणार आहे. बीसीसीआयच मुंबईतील क्रिकेट सेंटरच ऑफीस का बंद होतय? क्रिकेट विश्वातील एवढ्या श्रीमंत बोर्डाकडे स्वत:च ऑफिस नाही का? असे प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाले असतील. सध्या मुंबईच्या वानखेडे स्टेडियमला लागून एका चार मजली इमारतीमध्ये बीसीसीआयच ऑफिस आहे. 2006 पासून याच सेंटरमधून बीसीसीआयच कामकाज सुरु होतं.

आता बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांपासून सर्वानाच हे ऑफिस सोडावं लागणार आहे. असं करण्यासाठी बीसीसीआयला कोणी भाग पाडलेलं नाही. बीसीसीआयच ऑफिस बंद झाल्यानंतर कामकाज कसं चालेल हा प्रश्न आहे. त्यासाठी सुद्धा बीसीसीआयने व्यवस्था केली आहे.

ऑफिस रिकामी करण्याच कारण काय?

बीसीसीआय ऑफिस रिकाम करणार आहे, त्यामागे कारण आहे मेकओव्हर. बीसीसीआय मुंबईतील आपल्या हेड ऑफिसची नव्याने बांधणी करणार आहे. बीसीसीआय इमारतीची डिझाइन, स्ट्रक्चरमध्ये बदल केले जातील. नव्या ऑफिसमध्ये कॉन्फरन्स रुम आणि मीटिंग हॉल बनवण्यात येईल. वर्ल्ड कप आणि अन्य ट्रॉफी ठेवण्यासाठी व्यवस्था केली जाईल. मुंबईतील फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये बैठका

मुंबईतील चार मजली इमारतीमध्ये तीन मजले बीसीसीआयकडे आहेत. एका मजला मुंबई क्रिकेट असोशिएशनकडे आहे. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये भारतात वनडे वर्ल्ड कप 2023 होणार आहे. तो पर्यंत नवीन कार्यालय बांधून तयार करण्याची बीसीसीआयची योजना आहे. दुरुस्तीच्या काळात वरळी किंवा प्रभादेवीमध्ये जागा भाडयाने घेण्यात येईल. या दरम्यान बोर्डाच्या बैठका मुंबईतील फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये होतील. वर्ल्ड कपपर्यंत आपल्या श्रीमंती लौकीकाला साजेस ऑफिस बनवण्याची बीसीसीआयची योजना आहे.

मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.