AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वर्ल्डकप जिंकल्यानंतर सचिन तेंडुलकरला विराट कोहलीने का उचललं? विरेंद्र सेहवागने सांगितलं कारण

वनडे वर्ल्डकप जिंकून भारताला 12 वर्षे पूर्ण झाली आहेत. या वर्ल्डकपच्या आठवणी अजूनही ताज्या आहे. माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग याने त्या आठवणींना उजाळा देत काही खुलासे केले आहेत.

वर्ल्डकप जिंकल्यानंतर सचिन तेंडुलकरला विराट कोहलीने का उचललं? विरेंद्र सेहवागने सांगितलं कारण
विराट कोहलीच्या खांद्यावर सचिन तेंडुलकर कसा बसला ? विरेंद्र सेहवागने केला खुलासा Image Credit source: BCCI
| Updated on: Jun 28, 2023 | 9:35 PM
Share

मुंबई : वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेसाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. या स्पर्धेत जेतेपद मिळवण्यासाठी सर्वच संघ जोरदार तयारी करत आहे. विशेष करून जेतेपद मिळवण्यासाठी न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका प्रयत्नशील असेल. असं असताना या वर्ल्डकपसाठी भारतीय संघाला प्रमुख दावेदार मानलं जात आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने तर अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या दोन संघांची नावंही घोषित केली आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम फेरीचा सामना होईल असं भाकीत त्याने वर्तवलं आहे. दुसरीकडे, 2011 वर्ल्डकप जेतेपदाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. एक एक करून आपल्या भात्यातून सेहवाग मजेशीर किस्से काढत आहे. आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला खांद्यावर उचलण्याचा किस्सा सांगितला आहे.

काय म्हणाला विरेंद्र सेहवाग

वनडे वर्ल्डकप जेतेपदानंतर रनमशिन विराट कोहली याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला खांद्यावर उचललं होतं. यामागे नेमकं काय घडलं ते विरेंद्र सेहवाग याने सांगितलं. “आम्ही सचिन तेंडुलकरला खांद्यावर उचलण्यास नकार दिला होता. आम्ही खूपच म्हातारे होतो असं म्हणायला हरकत नाही. खांद्याची दुखापत होती. त्याचबरोबर धोनीला गुडघ्याचा इजा होती.”

“आम्ही सचिनला उचलण्याची जबाबदारी तरुण खेळाडूंवर सोपवली. त्यांना सांगितलं सचिनला उचला आणि मैदानात फिरवा. त्यामुळे विराट कोहलीची निवड झाली.”, असं विरेंद्र सेहवाग याने सांगितलं.

रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पुन्हा एकदा वनडे वर्ल्डकप जेतेपदासाठी मैदानात उतरणार आहे. वर्ल्डकप स्पर्धेतला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्या 8 ऑक्टोबरला पहिला सामना होणार आहे. वर्ल्डकप स्पर्धेसाठी टीम इंडिया 8400 किमी प्रवास करत 9 शहरात जाणार आहे. 34 दिवसात टीम इंडिया इतका प्रवास करणार आहे.

भारतीय संघाने उपांत्य आणि अंतिम फेरीत धडक मारली तर टीम इंडिया 42 दिवसात 11 सामन्यांसाठी 9700 किमीचा प्रवास करेल. भारताचं शेड्युल पाहता सामना रात्री 11 वाजता संपले.त्या सामन्यानंतर तिसऱ्या दिवशी भारतीय संघ विमान प्रवास करेल.

कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.