AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KL Rahul: घरात शुभकार्य असल्यामुळे केएल राहुल वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये खेळत नाहीय?

केएल राहुललाही त्या आठवणी नको असतील. नियमित कर्णधार म्हणून रोहित शर्मचाी ही पहिलीच मालिका आहे.

KL Rahul: घरात शुभकार्य असल्यामुळे केएल राहुल वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये खेळत नाहीय?
Athiya-Rahul Instagram
Follow us
| Updated on: Feb 04, 2022 | 4:00 PM

नवी दिल्ली: वेस्ट इंडिज विरुद्धच्या (INDvsWI) आगामी वनडे आणि टी-20 सीरीजसाठी बीसीसीआयने संघाची घोषणा केली, त्यावेळी BCCI ने रिलीज केलेल्या प्रसिद्धी पत्रकात एक ओळ होती, जी अनेकांच्या लक्षात आली नाही. पत्रकाच्या शेवटची एक नोट होती. त्यात उपकर्णधार केएल राहुल (KL Rahul) दुसऱ्यावनडे पासून संघासाठी उपलब्ध असेल, असं लिहिलं होतं. नुकत्याच संपलेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात केएल राहुलने वनडे संघाचं नेतृत्व केलं. पण त्याला यश मिळालं नाही. दक्षिण आफ्रिकेने 3-0 असा वनडे सीरीजमध्ये क्लीनस्वीप विजय मिळवला. पराभवाच्या त्या कटू आठवणी मागे सोडून येत्या रविवारपासून सुरु होणाऱ्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या वनडे मालिकेत नव्याने सुरुवात करण्याचा टीम इंडियाचा उद्देश असेल.

केएल राहुललाही त्या आठवणी नको असतील. नियमित कर्णधार म्हणून रोहित शर्मचाी ही पहिलीच मालिका आहे. कारण हँमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे रोहित शर्मा कसोटी पाठोपाठ वनडे मालिकेलाही मुकला होता. केएल राहुल पहिल्या वनडेमध्ये उपलब्ध नसल्यामुळेच बीसीसीआयने शिखर धवन, ऋतुराज गायकवाड आणि श्रेयस अय्यरला कोविडची लागण झाल्यानंतर मयंक अग्रवालची संघात निवड केली.

आता रोहित सोबत कोण डावाची सुरुवात करणार? धवन रोहित बरोबर डावाची सुरुवात करणारा होता. पण शिखर आणि पर्यायी सलामीवीर ऋतुराज गायकवाड दोघांना कोविडची बाधा झाली. त्यामुळे रोहित आता मयंक सोबक सलामीला उतरु शकतो. आता प्रश्न असा निर्माण होतोय, केएल राहुल पहिल्या वनडेमध्ये का खेळत नाहीय? तो का उपलब्ध नाहीय?

राहुल का पहिली वनडे खेळत नाहीय? अनेक मीडिया रिपोर्टसनुसार राहुल कौटुंबिक कार्यक्रमामुळे पहिल्या वनडेत खेळणार नसल्याची माहिती आहे. राहुलच्या बहिणीचं लग्न असल्यामुळे तो वनडे सीरीजच्या तयारीसाठी संघासोबत अहमदाबादमध्ये नाहीय, असं ESPNCricinfo ने म्हटलं आहे.

राहुल चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरणार होता. पण आता धवन नसल्यामुळे 9 आणि 11 फेब्रुवारीला होणाऱ्या दुसऱ्या आणि तिसऱ्या वनडेमध्ये तो सलामीला येईल. IPL मधील लखनऊ सुपर जायंट्स संघाच्या कर्णधारपदी केएल राहुलची निवड करण्यात आली आहे. 17 कोटी रुपये मोजून लखनऊ सुपर जायंट्सने राहुलला आपल्या चमूत घेतलं आहे.

संबंधित बातम्या: Icc under 19 cricket world cup: सेंच्युरी, पाच विकेट घेणाऱ्या अक्रमचा हा ‘चक्रम’ करुन सोडणारा SIX नक्की पाहा VIDEO IND vs WI: आणखी एका स्फोटक फलंदाजाचा टीम इंडियात समावेश, एका षटकात भारताच्या बाजूने झुकवू शकतो सामना IPL Auction आधीच बेबी एबीचा धमाका, डिविलियर्स सारखा खेळतो, सहा सामन्यात कुटल्या 506 धावा, मोडला भारतीयाचा वर्ल्ड रेकॉर्ड

VIDEO पाकला मोठा हादरा, भारतानं असं उडवलं रावळपिंडीतलं नूर खान एअरबेस
VIDEO पाकला मोठा हादरा, भारतानं असं उडवलं रावळपिंडीतलं नूर खान एअरबेस.
भारताचा मोठा स्ट्राईक, पाकचे 5 एअरबेस उडवले; पाकसाठी किती महत्त्वाचे?
भारताचा मोठा स्ट्राईक, पाकचे 5 एअरबेस उडवले; पाकसाठी किती महत्त्वाचे?.
बलुचिस्तानकडून पाक आणि चीनला उघड धमकी, VIDEO शेअर करत वाढवलं टेन्शन
बलुचिस्तानकडून पाक आणि चीनला उघड धमकी, VIDEO शेअर करत वाढवलं टेन्शन.
पाकड्यांना पाडलं उघडं, भारतीय लष्करानं सांगितलं काय खरं काय खोटं
पाकड्यांना पाडलं उघडं, भारतीय लष्करानं सांगितलं काय खरं काय खोटं.
अमृतसरमध्ये पाकचं ड्रोन घरावर, काचा फुटल्या तर कुठ आग लागली, बघा VIDEO
अमृतसरमध्ये पाकचं ड्रोन घरावर, काचा फुटल्या तर कुठ आग लागली, बघा VIDEO.
पाकच पितळ उघडं, गेले हल्ला करायला अन् मिसाईल फुटलंच नाही; फुसका बार...
पाकच पितळ उघडं, गेले हल्ला करायला अन् मिसाईल फुटलंच नाही; फुसका बार....
राजस्थानात स्फोट, मध्यरात्री भारताच्या धमाक्यांनी पाक एअरबेस उद्ध्वस्त
राजस्थानात स्फोट, मध्यरात्री भारताच्या धमाक्यांनी पाक एअरबेस उद्ध्वस्त.
पाक सेनेसाठी तबाहीची सकाळ, भारताने 'हे' 4 एअरबेस उद्ध्वस्त करत हादरवल
पाक सेनेसाठी तबाहीची सकाळ, भारताने 'हे' 4 एअरबेस उद्ध्वस्त करत हादरवल.
पाकचा मोठा हल्ला, राजौरीमधील घरांची अवस्था बघा, विदारक VIDEO पाहून...
पाकचा मोठा हल्ला, राजौरीमधील घरांची अवस्था बघा, विदारक VIDEO पाहून....
पंतप्रधान नरेंद्र मोदींची तिन्ही सैन्य प्रमुखांसोबत महत्वाची बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदींची तिन्ही सैन्य प्रमुखांसोबत महत्वाची बैठक.