MS Dhoni CSK IPL 2023 : ‘मी त्यांना म्हटलं, हे माझ काम आहे, तुम्ही मला….’, मॅचनंतर धोनीचा खुलासा
MS Dhoni CSK IPL 2023 : मॅच संपल्यानंतर मुरली कार्तिकने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना धोनीने हा खुलासा केला. चांगला फॉर्म असूनही, अजूनही आपण लोअर ऑर्डरमध्ये बॅटिंग का करतो? त्याचं कारण धोनीने सांगितलं.
चेन्नई : प्लेऑफच्या दृष्टीने विजय आवश्यक असलेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने बुधवारी दिल्ली कॅपिटल्सला हरवलं. चेन्नईने दिल्ली कॅपिटल्सवर आरामात विजय मिळवला. CSK ने डेविड वॉर्नरच्या टीमवर 27 धावांनी विजय मिळवला. CSK चा या सीजनधील हा सातवा विजय असून पॉइंट्स टेबलमध्ये ते दुसऱ्या स्थानावर आहेत. फिरकीला अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर चेन्नई सुपर किंग्सने काल 8 बाद 167 धावा केल्या. त्यानंतर त्यांनी दिल्ली कॅपिटल्सला 8 बाद 140 धावांवर रोखलं. चेन्नईच्या एम चिदंबरम स्टेडियमवर ही मॅच झाली.
सीएसकेच्या कुठलाही बॅट्समनने 30 पेक्षा जास्त धावा केल्या नाहीत. एमएस धोनीने डावाच्या अखेरीस फटकेबाजी केली. त्यामुळे सीएसकेला चांगली धावसंख्या उभारता आली. 17 व्या ओव्हरमध्ये 6 बाद 126 धावा असताना, धोनी क्रीजवर बॅटिंगसाठी आला. सीएसकेच्या कॅप्टनने 9 चेंडूत 20 धावा फटकावल्या. यात दोन सिक्स आणि एक फोर होता.
चालू सीजनमध्ये धोनीने आतापर्यंत किती धावा केल्यात?
धोनीने चालू आयपीएल सीजनमध्ये 204.26 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्यात. त्याने 47 चेंडूंचा सामना करताना 96 धावा केल्यात. बाऊंड्रीमधून धोनीने 72 धावा केल्यात.
धोनीने लोअर ऑर्डरमध्ये बॅटिंग करण्याच सांगितलं कारण?
अनेक माजी क्रिकेटपटूंनी धोनीला वरच्या क्रमांकावर बॅटिंगला येण्याचा सल्ला दिलाय. सामना संपल्यानंतर मुरली कार्तिकशी बोलताना धोनीने, चांगला फॉर्म असूनही, अजूनही आपण लोअर ऑर्डरमध्ये बॅटिंग का करतो? त्याचं कारण सांगितल.
धोनी त्याच्या रोलबद्दल काय म्हणाला?
“फिनिशरच्या रोलसाठी मी खास प्रॅक्टिस करतोय. मधल्या ओव्हर्समध्ये पार्ट्नरशिपकडे कल नाहीय. माझा रोल फिनिशरचा आहे, हे मी सांगितलय. फिनिशरच काम मी केलं पाहिजे, मला जास्त पळवू नका” असं धोनी कार्तिकशी बोलताना म्हणाला.
“आमची रणनिती योग्य पद्धतीने काम करतेय. दुसरे त्यांच काम करतायत. माझ्या वाट्याला जे काही चेंडू येत आहेत, त्यात मी माझ्या बाजूने योगदान देतोय. सोबतच मी सरावही करतोय. मी जो सराव करतोय, मॅचमध्ये माझ्या वाट्याला तो रोल येतोय. त्यामुळे परफॉर्म करायला मला मदतच होतेय” असं धोनी म्हणाला. चेन्नईचे किती सामने बाकी?
चेन्नई सुपर किंग्सचे अजून तीन सामने बाकी आहेत. हीच लय कायम ठेवून गुजरातला नंबर 1 स्थानावरुन हटवण्याचा सीएसकेचा प्रयत्न असेल. टॉपवर असलेल्या पहिल्या दोन टीममध्ये क्वालिफायरचा पहिला सामना होईल. विजेता संघ थेट फायनलमध्ये जाईल. हरणाऱ्या टीमला तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावरील विजेत्या टीमशी खेळण्याची संधी मिळेल.