IND vs AUS : Suryakumar Yadav च्या बॅटचा चेंडूला का स्पर्श होत नाहीय? 3 चुकांमुळे 3 वेळा 0,0,0 वर OUT

IND vs AUS 3rd ODI : Suryakumar Yadav वनडे सीरीजमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध खातही उघडू शकला नाही. सूर्यकुमार यादव क्रिकेटमधील असा पहिला बॅट्समन आहे, जो तिन्ही वनडे सामन्यात पहिल्या चेंडूवर बाद झाला.

IND vs AUS : Suryakumar Yadav च्या बॅटचा चेंडूला का स्पर्श होत नाहीय? 3 चुकांमुळे 3 वेळा 0,0,0 वर OUT
Follow us
| Updated on: Mar 23, 2023 | 8:59 AM

IND vs AUS 3rd ODI : कव्हर ड्राइव्ह, स्ट्रेट ड्राइव्ह, पुल शॉट, स्कूप शॉट हे सूर्यकुमार यादवच्या भात्यातील काही खास फटके आहेत. त्याच्या बळावर तो धावांचा पाऊस पाडतो. पण ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे सीरीजमध्ये सूर्यकुमार यादवची बॅट तळपलीच नाही. धावा बनवणं दूर राहिलं, तीन सामन्यांमध्ये सूर्यकुमार यादवची बॅट चेंडूला साधा स्पर्श सुद्धा करु शकली नाही. सूर्यकुमार मुंबई नंतर विशाखापट्टनम त्यानंतर चेन्नई वनडेत शुन्यावर बाद झाला. सूर्यकुमार यादव क्रिकेटमधील असा पहिला बॅट्समन आहे, जो तिन्ही वनडे सामन्यात पहिल्या चेंडूवर बाद झाला.

आता प्रश्न हा आहे की, सूर्यकुमार यादव अशी कुठली चूक करतोय? टी 20 क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडणाऱ्या सूर्यकुमारच्या बॅटला वनडेमध्ये असं कुठलं ग्रहण लागलय? सूर्यकुमार यादवनच्या वनडे सीरीजमधील खराब प्रदर्शनाला तीन कारणं आहेत.

सूर्यकुमार यादवच्या खराब प्रदर्शनाच पहिलं कारण

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे सीरीजमध्ये सूर्यकुमार यादवच्या खराब प्रदर्शनाच पहिलं कारण आहे फुटवर्क. सूर्यकुमार यादव पहिल्या दोन वनडे सामन्यांमध्ये LBW आणि तिसऱ्या सामन्यात बोल्ड झाला. पहिल्या दोन सामन्यात त्याचं बॉडी वेट ऑफ स्टम्पला जास्त ट्रान्सफर झालं. तिसऱ्या मॅचमध्ये तो पुढचा चेंडू मागे खेळला.

दुसरं कारण

सूर्यकुमार यादवच्या खराब प्रदर्शनाच दुसरं कारण आहे, खराब हँड आय कोऑर्डिनेशन. म्हणजे त्याचे हात आणि डोळ्याचा ताळमेळ योग्य बसत नाहीय. या कॉम्बिनेशनमध्ये चूक झाल्यास बॅट्समच्या धावा होत नाहीत. एका गोष्टीमुळे सूर्यकुमार यादववर दबाव

क्रिकेट फक्त टेक्निकचा खेळ नाहीय. इथे मानसिक कणखरता आणि आत्मविश्वास सुद्धा तितकाच महत्वाचा असतो. सूर्यकुमारमध्ये आत्मविश्वास दिसत नाहीय. वर्ल्ड कप जवळ आहे आणि स्क्वाडमध्ये स्थान मिळवण्याचा विषय त्याच्या डोक्यात चालला असणार. त्यामुळे त्याच्यावर दबाव वाढतोय. त्यामुळे प्रदर्शन बिघडतय. आता या खराब कामगिरीमुळे सूर्यकुमार यादवच टीममध्ये स्थान कायम राहणार का? हा प्रश्न आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.