IND vs AUS 3rd Test : Ashiwn सोबतच नेहमी असं का होतं? सुनील गावस्करांचा रोहित शर्माला प्रश्न

IND vs AUS 3rd Test : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये रविचंद्रन अश्विन सर्वाधिक विकेट घेणारा दुसरा गोलंदाज आहे. सुनील गावस्कर यांना रोहित शर्माचा हा निर्णय पटला नाही.

IND vs AUS 3rd Test : Ashiwn सोबतच नेहमी असं का होतं? सुनील गावस्करांचा रोहित शर्माला प्रश्न
Follow us
| Updated on: Mar 03, 2023 | 10:30 AM

IND vs AUS 3rd Test : प्रसिद्ध क्रिकेटपटू आणि विश्लेषक सुनील गावस्कर यांनी रोहित शर्माच्या एका निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. सुनील गावस्कर हे नेहमी स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. त्यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. काल इंदोर कसोटीचा दुसरा दिवस होता. यावेळी कॅप्टन रोहित शर्माने पहिल्या तासाभरात रविचंद्रन अश्विनला गोलंदाजीसाठी आणलं नाही. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये रविचंद्रन अश्विन सर्वाधिक विकेट घेणारा दुसरा गोलंदाज आहे. सुनील गावस्कर यांना रोहित शर्माचा हा निर्णय पटला नाही. ड्रिंक्स ब्रेकच्या काही मिनिट आधी रोहितने अश्विनच्या हाती चेंडू सोपवला. तो पर्यंत पीटर हँडसकॉम्ब आणि कॅमरुन ग्रीनची जोडी सेट झाली होती. ऑस्ट्रेलियाकडे पहिल्या डावात 75 धावांची आघाडी होती.

हँडसकॉम्ब आणि ग्रीन दोघे रायटी बॅट्समन खेळपट्टीवर होते. म्हणून रोहितने वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि डावखुरा फिरकी गोलंदाज रविंद्र जाडेजाला गोलंदाजीसाठी आणलं. या दोघांच्या जागी नंतर अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विनला गोलंदाजीसाठी आणलं.

त्याला आधीच चेंडू द्यायला पाहिजे होता

दोन रायटी बॅट्समन विकेटवर होते. म्हणून रविचंद्रन अश्विनला गोलंदाजीसाठी आणलं नाही. ड्रिंक ब्रेक्सच्या एक ओव्हरआधी त्याला बॉलिंग दिली. “एका रायटी आणि लेफ्टी बॉलिंग करत होता, त्याने काय झालं? कोणाला विकेट मिळाली? अश्विनने हँडसकॉम्बची विकेट काढली. तो टॉप खेळाडू आहे. तो विकेट काढून देणार. मग समोर रायटी किंवा लेफ्टी असो फरक पडत नाही. तो महान गोलंदाज आहे. अश्विनच्या खात्यात 450 पेक्षा जास्त विकेट आहेत. त्याला आधीच चेंडू द्यायला पाहिजे होता” असं सुनील गावस्कर स्टार स्पोर्ट्सच्या कार्यक्रमात म्हणाले. दोघांनी काढल्या प्रत्येकी 3-3 विकेट

अश्विनने लगेच त्याच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये हँडसकॉम्बची विकेट काढून रिझल्ट दिला. त्याने भागीदारी ब्रेक केली. अश्विन आयसीसीच्या रँकिंगमध्ये नंबर 1 स्थानावर पोहोचलाय. पहिल्याडावात ऑस्ट्रेलियाच्या 6 विकेट 11 धावात पडल्या. उमेश यादव आणि अश्विनने प्रत्येकी 3-3 विकेट काढल्या.

रोहिणी खडसेंनी नवऱ्याचं अन् आडनाव लावून फिरावं मग.., चाकणकरांचा निशाणा
रोहिणी खडसेंनी नवऱ्याचं अन् आडनाव लावून फिरावं मग.., चाकणकरांचा निशाणा.
तिरुपती बालाजीच्या प्रसाद लाडूत जनावरांची चरबी अन् माशांचं तेल
तिरुपती बालाजीच्या प्रसाद लाडूत जनावरांची चरबी अन् माशांचं तेल.
'मजुरी बुडवली अन् फाटक्या साड्या', लाडक्या बहिणींचा सन्मान की अपमान?
'मजुरी बुडवली अन् फाटक्या साड्या', लाडक्या बहिणींचा सन्मान की अपमान?.
चाकणकर अन् खडसे भिडल्या, थेट काढला एकमेकांचा बाप! बघा काय झाली खडाजंगी
चाकणकर अन् खडसे भिडल्या, थेट काढला एकमेकांचा बाप! बघा काय झाली खडाजंगी.
नितेश राणेंचं पुन्हा भडकाऊ भाषण, महायुतीत अजित पवार अन् राणे आमनेसामने
नितेश राणेंचं पुन्हा भडकाऊ भाषण, महायुतीत अजित पवार अन् राणे आमनेसामने.
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....