WI vs ENG 2nd ODI | इंग्लंडचा दुसऱ्या सामन्यात विजय, मालिकेत बरोबरी

West Indies vs England 2nd ODI Match Result | उभयसंघात झालेल्या दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला आहे. इंग्लंडने या विजयासह मालिकेत आपलं आव्हान कायम राखण्यात यश मिळवलंय. त्यामुळे तिसरा सामना हा चांगलाच चुरशीचा होणार हे आता स्पष्ट झालं आहे.

WI vs ENG 2nd ODI | इंग्लंडचा दुसऱ्या सामन्यात विजय, मालिकेत बरोबरी
Follow us
| Updated on: Dec 07, 2023 | 4:19 PM

अँटिगा | इंग्लंड क्रिकेट टीमने यजमान वेस्ट इंडिजवर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 6 विकेट्सने विजय मिळवला. इंग्लंडने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली आहे. वेस्ट इंडिजने इंग्लंडसमोर विजयासाठी 203 धावांचं आव्हान ठेवलं होतं. इंग्लंडसाठी मालिकेतील आव्हान कायम राखायचं होतं. इंग्लंडसाठी हा सामना करो या मरो असा होता. इंग्लंडने या प्रतिष्ठेच्या सामन्यात विंडिजवर मात करत मालिकेतील आव्हान कायम राखलं. त्यामुळे तिसरा आणि अंतिम सामना हा निर्णायक असा असणार आहे. दरम्यान दुसऱ्या सामन्यात नक्की काय झालं हे सविस्तर जाणून घेऊयात.

इंग्लंडने टॉस जिंकून विंडिजला बॅटिंगसाठी भाग पाडलं. मात्र विंडिजच्या फंलंदाजांना इंग्लंडसमोर विशेष काही करता आलं नाही. मात्र कॅप्टन शाई होप आणि शेरफेन रदरफोर्ड या दोघांनी वैयक्तिक अर्धशतकं करत विंडिजची लाज राखली. त्यामुळे विंडिजला 200 पार मजल माररात आली. विंडिजकडून शाई होप याने 68 बॉलमध्ये सर्वाधिक 68 धावांची खेळी केली. शेरफेन रदरफोर्ड याने 63 धावा केल्या.

रोमरिओ शेफर्ड याने 19, ब्रँडन किंग याने 17 आणि अल्झारी जोसेफ याने 14 धावा जोडल्या. दोघे आले तसेच झिरोवर परत गेले. तर तिघांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. इंग्लंडकडून लियाम लिविंगस्टोन आणि सॅम करन या दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या. तर गेस एटीकसन आणि रेहान अहमद या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेत विंडिजचं 39.4 ओव्हरमध्ये 202 धावांवर पॅकअप केलं. त्यामुळे इंग्लंडला विजयासाठी 203 धावांचं आव्हान मिळालं.

इंग्लंडची बॅटिंग

फिलीप सॉल्ट आणि विल जॅक्स या सलामी जोडीने 50 धावांची भागीदारी केली. सॉल्ट 21 धावा करुन आऊट झाला. त्यानंतर झॅक क्रॉली आणि बेन डकेड दोघांनी प्रत्येकी 3-3 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. त्यामुळे इंग्लंडची स्थिती 3 बाद 85 अशी झाली. त्यानंतर विल जॅक्स आणि हॅरी ब्रूक या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 31 धावा जोडल्या. मात्र विल जॅक्स यालाही आऊट करण्यात विंडिजला यश आहं. विल 73 धावा करुन मैदानाबाहेर परतला. त्यानंतर हॅरी ब्रूक आणि कॅप्टन जॉस बटलर या जोडीने इंग्लंडला विजयापर्यंत पोहचवलं.

जॉस आणि हॅरी या जोडीने पाचव्या विकेटसाठी 90 धावांची विजयी भागीदारी केली. हॅरी ब्रूक याने 49 बॉलमध्ये नाबाद 43 धावांची खेळी केली. तर जॉसने नाबाद 58 धावांची अर्धशतकी खेळी केली. विंडिजकडून गुडाकेश याने 2 विकेट्स घेतल्या. तर शेरफन रुदरफोर्ड आणि रोमरियो शेफर्ड या दोघांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. दरम्यान मालिकेतील अंतिम सामना हा शनिवारी 9 डिसेंबर रोजी होणार आहे.

वेस्ट इंडिज प्लेईंग इलेव्हन | शाई होप (कॅप्टन आणि विकेटकीपर), अलिक अथनाझे, ब्रँडन किंग, केसी कार्टी, शिमरॉन हेटमायर, शेरफेन रदरफोर्ड, रोमॅरियो शेफर्ड, यानिक कॅरिया, अल्झारी जोसेफ, गुडाकेश मोती आणि ओशाने थॉमस.

इंग्लंड प्लेइंग इलेव्हन | जोस बटलर (कॅप्टन आणि विकेटकीपर), फिलिप सॉल्ट, विल जॅक्स, झॅक क्रॉली, बेन डकेट, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम कुरन, ब्रायडन कार्स, रेहान अहमद आणि गस ऍटकिन्सन.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.