Team India | Bcci ची विंडिज दौऱ्याआधी मोठी घोषणा, ट्विटमुळे एकच चर्चा
Team India vs West Indies | टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्याची सुरुवात कसोटी मालिकेने करणार आहे. मात्र त्याआधी बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे.
मुंबई | भारतीय क्रिकेट नियमाक मंडळ अर्थात बीसीसीआयने टीम इंडियाच्या वेस्ट इंडिज दौऱ्याच्या 11 दिवसांआधी मोठी घोषणा केली आहे. बीसीसीआयने टीम इंडियाच्या नव्या लीड स्पॉन्सरची घोषणा केली आहे. बीसीसीआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. ड्रीम इलेव्हन टीम इंडियाचा लीड स्पॉन्सर असणार आहे. टीम इंडियाच्या जर्सीवर वेस्ट इंडिज दौऱ्यापासून ड्रीम 11 चा लोगो क्रिकेट चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. टीम इंडियाच्या विंडिज दौऱ्याची सुरुवात 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेने होणार आहे. विंडिज विरुद्ध टीम इंडिया पहिला कसोटी सामना हा 12 जुलैपासून खेळवण्यात येणार आहे. टीम इंडिया या मालिकेद्वारे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-25 मोहिमेची सुरुवात करणार आहे.
टीम इंडियाच्या लीड स्पॉन्सर म्हणून ड्रीम 11 ने बायजूसची जागा घेतली आहे. यावर बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी ड्रीम 11 ला शुभेच्छा दिल्या तसेच स्वागतही केलं.
बीसीसीआय अध्यक्ष काय म्हणाले?
“ऑफीशियल स्पॉन्सर ते आता लीड स्पॉन्सर या प्रवाामुळे, बीसीसीआय आणि ड्रीम 11 चं घट्ट नातं तयार झालं आहे. हे नातं क्रिकेटमधील विश्वास, मूल्य आणि विकासाचं प्रतिक आहे. हे नातं भविष्यात आणखी घट्ट आणि दृढ होईल”, असा विश्वास बिन्नी यांनी व्यक्त केला.
टीम इंडिया लीड स्पॉन्सर
? NEWS ?: BCCI announces Dream11 as the new #TeamIndia Lead Sponsor.
More Details ?https://t.co/fsKM7sf5C8
— BCCI (@BCCI) July 1, 2023
टीम इंडिया कीट स्पॉन्सर
काही दिवसांपूर्वी टीम इंडियाच्या किट स्पॉन्सरचं नाव जाहीर करण्यात आलं होतं. जर्मन स्पोर्ट्स ब्रँड आदिदास टीम इंडियाचा किट स्पॉन्सर असणार आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सोशल मीडियाद्वारे याबाबतची माहिती दिली होती.
टीम इंडियाचा वेस्ट इंडिज दौरा
टीम इंडियाचा विंडिज दौरा टेस्ट, वनडे आणि टी 20 असा भरगच्च असा असणार आहे. 2 कसोटी, 3 वनडे आणि 5 टी 20 सामन्यांची मालिका वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यात खेळवण्यात येणार आहे. बीसीसीआयने कसोटी आणि एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे.
कसोटी मालिकेत रोहित शर्मा टीम इंडियाचं कर्णधारपद आणि अजिंक्य रहाणे उपकर्णधारपद सांभाळणार आहे. तर वनडे मालिकेत हार्दिक पंड्या याच्याकडे कर्णधारपदाची सूत्र देण्यात आली आहेत. तर टी 20 मालिकेसाठी अजून संघाची घोषणा करण्यात आलेली नाही.