WI vs IND: भारताच्या पराभवानंतर वसीम जाफर यांनी मीस्टर बीनचा VIDEO शेयर करुन मांडल्या भावना
WI vs IND: सेंट किंट्स मध्ये वेस्ट इंडिजकडून झालेला पराभव अनेकांच्या जिव्हारी लागला आहे. भारतीय चाहत्यांना सहजासहजी हा पराभव पचवता येणार नाही.
नवी दिल्ली: सेंट किंट्स मध्ये वेस्ट इंडिजकडून झालेला पराभव अनेकांच्या जिव्हारी लागला आहे. भारतीय चाहत्यांना सहजासहजी हा पराभव पचवता येणार नाही. भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूने आपल्या स्टाइल मध्ये मॅच हरल्याचा राग व्यक्त केला आहे. त्याने बंदुकीने बल्ब फोडण्याचा व्हिडिओ शेयर केलाय. त्याने केलेलं टि्वट व्हायरल झालं आहे. भारताच्या पराभवानंतर वसीम जाफर यांनी अशा प्रकारची नाराजी व्यक्त केलीय. सोशल मीडियावर सक्रीय असणारे वसीम जाफर पुन्हा एकदा टि्वटमुळे चर्चेत आहेत.
भारताला सेंट किंट्स मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध दुसऱ्या टी 20 सामन्यात 5 विकेटने पराभव स्वीकारावा लागला. भारताचा संघ प्रथम फलंदाजी करताना 138 धावांवर ऑलआऊट झाला. वेस्ट इंडिजने शेवटच्या षटकात हा सामना जिंकला. जाफरचं टि्वट हे शेवटच्या षटकात झालेल्या पराभवावरच आहे.
मिस्टर बीनच्या व्हिडिओचा आधार
आपला मुद्दा आणि चाहत्यांच्या भावना मांडण्यासाठी वसीम जाफर यांनी मिस्टर बीनच्या व्हिडिओचा आधार घेतला. या व्हिडिओ मध्ये मिस्टर बीन रात्रीच्या समयी आपल्या बंदुकीतून गोळी झाडून बल्ब फोडतो. वसीम जाफर सोशल मीडियावर सक्रीय असतात. भारतीय संघाच्या कामगिरीवर ते सतत आपली मत मांडतात. इंग्लंडचा मायकल वॉन आणि त्यांच्यातील टि्वटवरील द्वंद क्रिकेट चाहत्यांना नेहमीच लक्षात राहतं.
Ind fans going to bed at 2.30 am after watching team lose in last over #WIvIND pic.twitter.com/phDoR9sixa
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) August 1, 2022
सामना दोन तास उशिराने
भारत आणि वेस्ट इंडिज मधला दुसरा टी 20 सामना काल दोन तास विलंबाने सुरु झाला. भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता हा सामना सुरु होणार होता. पण हा सामना 10 वाजता सुरु झाला. या विलंबाच कारण ऐकून तुम्ही सुद्धा हैराण व्हाल. पाऊस, खराब वातावरण किंवा मैदान ओलसर असल्यामुळे हा विलंब झाला, असं तुम्हाला वाटेल. पण असं नाहीय. संघाचं सामान वेळेवर न पोहोचल्यामुळे दोन तास उशिराने सामना सुरु झाला. भारत आणि वेस्ट इंडिज मध्ये पाच टी 20 सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. वेस्ट इंडिजने दुसरा सामना जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. अजून तीन टी 20 सामने बाकी आहेत.