WI vs SA 1st Test: केशव महाराजचा मोठा कारनामा, विंडिज विरुद्ध जबरदस्त कामगिरी
West Indies vs South Africa 1st Test: वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना हा त्रिनिदाद येथे खेळवण्यात येत आहे.
वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात केशव महाराज याने मोठा कारनामा केला आहे. उभयसंघात 7-11 ऑगस्ट दरम्यान त्रिनिदाद येथील क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन येथे हा सामना खेळवणयात येत आहे. केशव महाराजने या सामन्यातील पहिल्या डावात एकूण 4 विकेट्स घेतल्या. केशव महाराज याने यासह 250 आंतरराष्ट्रीय विकेट्सचा टप्पा पूर्ण केला. केशव अशी कामगिरी करणारा दक्षिण आफ्रिकेचा दुसरा स्पिनर ठरला आहे. केशवआधी अशी कामगिरी इमरान ताहीर याने केली आहे.
सामन्याचा धावता आढावा
दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. आफ्रिकिने 117.4 ओव्हरमध्ये ऑलआऊट 357 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेसाठी कॅप्टन टेम्बा बावुमा याने सर्वाधिक 86 धावांची खेळी केली. तर टॉनी डी झोर्झी याने 78 धावांचं योगदान दिलं. विंडिजकडून जोमेल वॉरिकन याने 4, जेडेन सील्सने 3 तर केमार रोच याने 2 विकेट्स घेतल्या. तर जेसन होल्डरने 1 विकेट घेत चांगली साथ दिली.
त्यानंतर विंडिजचा पहिला डाव 357 धावांच्या प्रत्युत्तरात 91. 5 ओव्हरमध्ये 233 धावांवर आटोपला. विंडिजकडून जेसन होल्डर याने सर्वाधिक 36 धावा केल्या. तर कॅप्टन क्रेग ब्रेथवेट, मिकील लुईस आणि जोमेल वॉरिकन या तिघांनी प्रत्येकी 35 धावांचं योगदान दिलं. दक्षिण आफ्रिकेकडून कगिसो रबाडा याने 3 विकेट्स मिळवल्या. एडन मारक्रम आणि लुंगी एन्गिडी या दोघांनी 1-1 विकेट मिळवली. तर केशव महाराजने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. केशवने 40 ओव्हरमध्ये 76 धावांच्या मोबदल्यात चौघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. विंडिजला 233 धावांवर रोखल्याने दक्षिण आफ्रिकेला 124 धावांची आघाडी मिळाली.
सामन्यातील तिसऱ्या डावाला सुरुवात
सामन्यातील तिसऱ्या तर दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावाला सुरुवात झाली. दक्षिण आफ्रिकेने 124 धावांच्या आघाडीसह 29 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 173 धावांवर डाव घोषित केला. त्यामुळे विंडिजला 297 धावांचं आव्हान मिळालं. विंडिजने सामन्याच्या पाचव्या दिवशी या धावांचा पाठलाग करताना ताज्या आकडेवारीनुसार 7 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 18 रन्स केल्या आहेत.
वेस्ट इंडिज प्लेइंग ईलेव्हन: क्रेग ब्रॅथवेट (कॅप्टन), मिकील लुईस, केसी कार्टी, ॲलिक अथानाझे, कावेम हॉज, जेसन होल्डर, जोशुआ दा सिल्वा (विकेटकीपर), केमार रोच, जेडेन सील्स, गुडाकेश मोटी आणि जोमेल वॉरिकन.
दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन: टेम्बा बावुमा (कर्णधार), एडन मार्कराम, टोनी डी झोर्झी, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, रायन रिकेल्टन, काइल वेरेन (विकेटकीपर), विआन मुल्डर, केशव महाराज, कागिसो रबाडा आणि लुंगी एन्गिडी.