WI vs SL : वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका श्रीलंकेने 2-0 ने जिंकली, पहिल्या पराभवानंतर केलं कमबॅक
वेस्ट इंडिज आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका पार पडली. या मालिकेतील पहिला सामना श्रीलंकेला गमवावा लागला होता. त्यामुळे संघावर दडपण आलं होतं. पण उर्वरित दोन्ही सामन्यात श्रीलंकेने कमबॅक केलं. प्रशिक्षक जयसूर्याच्या प्रशिक्षणाखाली श्रीलंकन संघ परिपक्व होत असल्याचं दिसत आहे.
वेस्ट इंडिज विरुद्धची तीन सामन्यांची टी20 मालिका श्रीलंकेने 2-1 ने आपल्या खिशात घातली. मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर श्रीलंकेवर दडपण होतं. पण दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात श्रीलंकन संघाने कमबॅक केलं. वेस्ट इंडिजला खरं तर मालिका जिंकण्यासाठी दोन संधी होत्या. पण श्रीलंकेच्या खेळीपुढे वेस्ट इंडिजचं काहीच चाललं नाही. वेस्ट इंडिजने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच या खेळपट्टीवर 150 ते 160 धावसंख्या भरपूर होईल असा अंदाज कर्णधार रोव्हमन पॉवेल याने वर्तवला होता. मात्र हा अंदाज फोल ठरला. वेस्ट इंडिजने 20 षटकात 8 गडी गमवून 162 धावा केल्या आणि विजयासाठी 163 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान श्रीलंकेने 18 षटकात फक्त 1 गडी गमवून पूर्ण केलं.
श्रीलंकेच्या आघाडीच्या फलंदाजांनी साजेशी कामगिरी करून वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना हतबल केलं. पथुम निस्सांकने आक्रमक खेळी करत सुरुवात केली. त्याने 22 चेंडूत 7 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 39 धावा केल्या. पण गुडाकेश मोटीच्या गोलंदाजीवर फटका मारताना चुकला आणि त्रिफळा उडाला. त्यानंतर कुसल मेंडिस आमि कुसल परेरा या जोडीने डाव सावरला. दुसऱ्या विकेटसाठी कुसल मेंडिस आणि कुसल परेरा यांना नाबाद 103 धावांची भागीदारी केली. कुसल मेंडिसने 50 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 68 धावा केल्या. तर कुसल परेराने 36 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने नाबाद 55 धावांची खेळी केली. कुसल मेंडिसला त्याच्या खेळीसाठी सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं.
सामनावीराचा पुरस्कार मिळाल्यानंतर कुसल मेंडिस म्हणाला की, मी खूप चांगला खेळलो. निसांकाने पहिल्या सहा षटकांत चांगला खेळ केला. मी चांगले नियोजन करू शकलो. थोडी संथ विकेट. या परिस्थितीत कसे खेळायचे हे मला माहीत होते. आम्ही पहिल्या 6 षटकांमध्ये सामान्य क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला. या खेळपट्टीवर फिरकीपटू खेळणे कठीण आहे.
दोन्ही संघाची प्लेइंग 11
वेस्ट इंडिज (प्लेइंग इलेव्हन): ब्रँडन किंग, एविन लुईस, शाई होप (विकेटकीपर), रोस्टन चेस, शेरफेन रदरफोर्ड, गुडाकेश मोटी, रोव्हमन पॉवेल (कर्णधार), रोमॅरियो शेफर्ड, फॅबियन ऍलन, अल्झारी जोसेफ, शामर जोसेफ.
श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): पाथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), कुसल परेरा, कामिंदू मेंडिस, चरित असलंका (कर्णधार), भानुका राजपक्षे, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेललागे, महेश थेक्षाना, मथीशा पाथिराना, नुवान थुशारा