Ajit Agarkar: मुंबईकर अजित आगरकर भारताचे मुख्य बॉलिंग कोच होणार?

मागच्या काही दिवसांपासून आपल्याला भारतीय संघामध्ये (Indian Team) मोठे बदल पहायला मिळत आहेत. अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली जात आहे. भविष्याच्या संघ बांधणीच्या दृष्टीने हे बदल केले जात आहेत.

Ajit Agarkar: मुंबईकर अजित आगरकर भारताचे मुख्य बॉलिंग कोच होणार?
Follow us
| Updated on: Feb 22, 2022 | 12:59 PM

मुंबई: मागच्या काही दिवसांपासून आपल्याला भारतीय संघामध्ये (Indian Team) मोठे बदल पहायला मिळत आहेत. अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली जात आहे. भविष्याच्या संघ बांधणीच्या दृष्टीने हे बदल केले जात आहेत. भारतीय टीममध्ये जसे बदल दिसतायत, तसेच संघाच्या सपोर्ट स्टाफमध्येही काही बदल पहायला मिळू शकतात. माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर (Ajit Agarkar) हे भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक बनू शकतात. अजित आगरकर यांना बॉलिंग कोच म्हणून नियुक्त करावं, अशी संघातील काही सिनियर खेळाडूंची इच्छा आहे. आपल्या मागणीबद्दल हे खेळाडू गंभीर आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे. सध्या पारस म्हांब्रे (Paras Mhambrey) यांच्याकडे ही जबाबदारी आहे. ते टीम इंडियाचे गोलंदाजी प्रशिक्षक आहेत. अजित आगरकर यांना 2023 वर्ल्डकप पर्यंत गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्याची खेळाडूंची मागणी आहे.

44 वर्षीय आगरकर चीफ सिलेक्टर बनण्याच्या शर्यतीत होते.

अजित आगरकर सध्या क्रिकेट एक्सपर्ट म्हणून वेगवेगळ्या विषयांवर आपलं मत मांडत असतात. अजित आगरकर यांच्याकडे भारताकडून खेळण्याचा मोठा अनुभव आहे. 1998 ते 2007 या काळात आगरकर भारताकडून 28 कसोटी, 191 वनडे आणि चार टी-20 सामने खेळले आहेत. कसोटीत 47.32 च्या सरासरीने त्यांनी 58 विकेट घेतल्या आहेत. वनडेत 27.85 च्या सरासरीने 288 विकेट आणि चार टी-20 सामन्यात तीन विकेट घेतल्या आहेत. 44 वर्षीय अजित आगरकर मागच्यावर्षी चीफ सिलेक्टर बनण्याच्या शर्यतीत होते. सध्या ते टीव्ही कॉमेंटेटर आहेत.

म्हांब्रे सुद्धा चांगले बॉलिंग कोच, पण….

भारतीय क्रिकेटमध्ये निर्णय प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सिनियर खेळाडूंचा आगरकर सारख्या अनुभवी खेळाडूला कोच बनवण्याचा आग्रह आहे. म्हांब्रे सुद्धा चांगले बॉलिंग कोच आहेत. ते इंडिया ए, अंडर -19 क्रिकेट आणि NCA मध्ये योगदान देऊ शकतात. भारताने सध्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या तीन वनडे आणि तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत क्लीन स्वीप केलं आहे. आता भारताची नजर श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेवर आहे. भारत श्रीलंकेविरुद्ध तीन टी-20 आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.

Will Ajit Agarkar become bowling coach of Team india Senior player keen

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.