PBKS vs MI IPL 2023 : अर्जुनपेक्षा ‘तो’ सरस, त्यामुळे तेंडुलकरला आजपण बेंचवर बसाव लागणार?
PBKS vs MI IPL 2023 : अर्जुनच्या जागी संधी मिळताच, त्याने सोनं करुन दाखवलं. अर्जुन तेंडुलकरला आजच्या मॅचमध्ये संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामागे काही कारणं आहेत.

मोहाली : मुंबई इंडियन्सचा आज पंजाब किंग्स विरुद्ध सामना होणार आहे. मुंबईने मागच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सवर रोमांचक विजय मिळवला होता. प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी आता मुंबई इंडियन्सला प्रत्येक सामना जिंकावा लागणार आहे. आज पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्सची प्लेइंग इलेव्हन काय असेल? याबाबत विविध अंदाज वर्तवले जात आहेत. मुंबई इंडियन्स आजच्या मॅचमध्ये अर्जुन तेंडुलकरला संधी देणार का? हा प्रश्न आहे.
अर्जुन तेंडुलकरने आतापर्यंत मुंबई इंडियन्सकडून खेळताना चांगली कामगिरी केलीय. अपवाद पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्याचा. या मॅचमध्ये 1 ओव्हरमध्ये अर्जुन तेंडुलकरला 31 धावा पडल्या होत्या.
अर्जुनच्या बाबत समस्या काय?
अर्जुन तेंडुलकरने आतापर्यंत 4 सामन्यात 3 विकेट काढल्यात. पावरप्लेमध्ये अर्जुन विशेष चांगली गोलंदाजी करतो. अर्जुनच्या बाबतीत एक समस्या आहे, ती म्हणजे त्याने आतापर्यंत कुठल्याही सामन्यात त्याच्या कोट्यातील 4 ओव्हर्स पूर्ण केलेल्या नाहीत. अर्जुनच्या गोलंदाजीबद्दल कॅप्टन रोहित शर्माला तितका विश्वास नाहीय.
अर्जुनच्या जागी कोण?
खासकरुन डेथ ओव्हर्समध्ये अर्जुनच्या हाती चेंडू सोपवता येत नाही. कारण मार पडल्यास, त्याच्या कॉन्फिडन्सवर परिणाम होऊ शकतो. राजस्थान रॉयल्सस विरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने टीममध्ये बदल करुन सर्वांनाच धक्का दिला. अर्जुन तेंडुलकरच्या जागी त्याने अर्शद खानला संधी दिली.
त्याने मिळालेल्या संधीच सोन केलं
अर्शद खानने सुद्धा याच सीजनमध्ये मुंबई इंडियन्सकडून डेब्यु केलाय. तीन सामने खेळल्यानंतर त्याला ड्रॉप करण्यात आलं होतं. राजस्थान रॉयल्स विरुद्ध संधी मिळाल्यानंतर त्याने संधीच सोन केलं. अर्शद खानन राजस्थानचा कॅप्टन संजू सॅमसन, शिमरॉन हेटमायर आणि यशस्वी जैस्वाल या तीन प्रमुख फलंदाजांना आऊट केलं. त्यामुळे आज पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात अर्शद खानच स्थान कायम राहणार आहे. जोफ्रा आर्चर मुंबई इंडियन्सचा प्रमुख गोलंदाज आहे. राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्याआधी तो खेळला नव्हता. तो सुद्धा आजच्या सामन्यात खेळणार आहे. त्यामुळे अर्जुन तेंडुलकरला आजच्या सामन्यात सुद्धा संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.