Hardik Pandya : हार्दिक पांड्याला T20चा कर्णधार बनवणार? ‘वर्कलोड’ कमी करण्याचीही चर्चा, बीसीसीआयच्या निर्णयाकडे लक्ष
टी 20 मध्ये हार्दिककडे कर्णधारपद सोपण्यामागे भारतीय थिंक टँकचा एक उद्देश आहे आणि तो म्हणजे रोहित शर्मावरील कामाचा ताण कमी करणं. निवडकर्त्यांनी ही नवीन लाईन त्या भागाचाच एक भाग आहे.
मुंबई : रोहित शर्माच्या (Rohit Sharma) कामाचा ताण कमी केल्याच्या वक्तव्यानंतर हार्दिक पांड्याचा (Hardik Pandya) टी20 कर्णधारपदाचा कार्यकाळ वाढविण्याच्या चर्चेला जोर आलाय. हार्दिक सध्या आयर्लंडमधील दोन सामन्यांच्या टी20 (T-20) मालिकेत टीम इंडियाच्या युवा संघाचे नेतृत्व करत आहे. पण, आता तो याही पुढे जाऊन भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. असं बोललं जातंय. टी 20 मध्ये हार्दिककडे कर्णधारपद सोपण्यामागे भारतीय थिंक टँकचा एक उद्देश आहे आणि तो म्हणजे रोहित शर्मावरील कामाचा ताण कमी करणं. निवडकर्त्यांनी ही नवीन लाईन त्या भागाचाच एक भाग आहे. भारतीय निवड समितीच्या म्हणण्यानुसार तो हार्दिकच्या कर्णधारपदाने प्रभावित झाला असून भविष्यात तो त्याच्याकडे ही कर्णधारपदाची महत्वाची भूमिका सोपवू शकतो.
टीम इंडियाच्या निवड समितीच्या एका सदस्यानं इनसाईड स्पोर्ट्सला सांगितलं की, टी20 मध्ये हार्दिकच्या कर्णधारपदाचा विस्तार करण्याचा विचार करत आहोत. रोहितवरील कामाचा ताण कमी करण्याच्या उद्देशानं विचार केला जात आहे. तो म्हणाला, आम्हाला रोहित शर्माची जागा घेण्याची घाई नाही. पण त्यांचा वर्कलोड आपल्याला सांभाळावा लागतो. आगामी काळात अनेक छोटे-मोठे दौरे होणार असल्यानं हार्दिक हा आमच्या योजनेचा एक भाग आहे. याशिवाय हार्दिक सध्या टीम इंडियाच्या कसोटी संघाचा भागही नाही.
बीसीसीआयनं सेहवागचं ऐकलं?
भारताचा माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवागनंही बीसीसीआयनं रोहित शर्माच्या कामाचा ताण हाताळण्याबाबत विचार करायला हवा, असं म्हटंल होतं. त्यांनी रोहितला टी20च्या कर्णधारपदावरुन मुक्त करावं. सेहवाग म्हणाला की, रोहितचे वय पाहता बीसीसीआयनं त्याच्या कामाच्या भारावर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. यामुळे तो कसोटी आणि एकदिवसीय मालिमकेसाठी मानसिक आणि शारिरिकदृष्ट्या ताजेतवाने राहू शकेल. भारतीय निवड समितीच्या नजेरतून भारतीय टी-20 संघाची कमान सांभाळणारा चेहरा असेल तर त्याचा विचार व्हायला हवा, असंती तो म्हणाला.
रोहितचा वर्कलोड वाढला
निवड समितीच्या एका सदस्यानं इनसाईड स्पोर्ट्सला सांगितंल की, नक्कीच आमच्याकडे कर्णधारपदाचे अनेक पर्याय आहेत. मात्र, त्यांना तयार करणं आवश्यक आहे. रोहितच्या वर्कलोड सांभाळणं हे आमचे प्राधान्य आहे आणि आम्ही त्या दिशेनं काम करत आहोत, असंही निवड समितीच्या सदस्यानं म्हटंलय. आता असंही बोललं जातंय की, निवडकर्ते हार्दिककडे कर्णधारपदाचा पर्याय म्हणून पाहत आहोत. कारण, केएल राहुल दुखापग्रस्त आहे. तर ऋषभ पंत हा कसोटी संघाचा महत्वाचा सदस्य आहे.