WIND vs WENG Head To Head | टीम इंडियाचे इंग्लंड विरुद्ध असे आहेत आकडे
WIND vs WENG 1st T20I | वूमन्स टीम इंडिया विरुद्ध वूमन्स इंग्लंड यांच्यातील टी 20 मालिकेला 6 डिसेंबरपासून सुरुवात आहे. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात टी 20 सीरिजमध्ये आकडे कसे आहेत? जाणून घ्या
मुंबई | इंग्लंड मेन्स टीम बुधवारी वेस्ट इंडिज विरुद्ध 3 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना खेळणार आहे. तर दुसऱ्या बाजूला इंग्लंड वूमन्स टीम टीम इंडिया विरुद्ध टी 20 मालिका खेळणार आहे. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात 6 डिसेंबर रोजी पहिला टी 20 सामना होणार आहे. या सामन्याचं आयोजन हे मुंबईतील ऐतिहासिक अशा वानखेडे स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. हा सामना संध्याकाळी 7 वाजता सुरु होणार आहे. हरमनप्रीत कौर टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. या सामन्यासाठी क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. या सामन्यानिमित्ताने टी 20 मध्ये दोन्ही टीमपैकी आतापर्यंत कोण सरस राहिलाय हे जाणून घेऊयात.
हेड टु हेड रेकॉर्ड्स
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात आतापर्यंत भारतात एकूण 9 टी 20 सामने झाले आहेत. टीम इंडियाला या 9 पैकी फक्त 2 सामने जिंकता आले आहेत. तसेच टीम इंडियाला अखेरचा विजय हा आजपासून 5 वर्षांआधी मिळाला होता. टीम इंडियाने इंग्लंडला 2018 मध्ये मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर 8 विकेट्सने लोळवलं होतं. टीम इंडियाला आतापर्यंत एकूण 27 सामन्यांपैकी फक्त 7 सामने जिंकता आले आहेत. टीम इंडियाची टी 20 मध्ये इंग्लंड विरुद्ध फारशी खास कामगिरी राहिलेली नाही. त्यामुळे टीम इंडियाचा या मालिकेनिमित्त आकडे सुधारण्याचा प्रयत्न असणार आहे.
क्रिकेट चाहत्यांनासाठी आनंदाची बातमी
दरम्यान क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात होणाऱ्या टी 20 मालिकेतील तिन्ही सामने हे स्टेडियममध्ये जाऊन फुकटात पाहता येणार आहे. यासाठी क्रिकेट चाहत्यांना एक रुपयाही खर्च करण्याची गरज नाही. त्यामुळे या सामन्याला मोठ्या प्रमाणात क्रिकेट चाहत्यांची उपस्थिती असण्याची शक्यता आहे.
इंग्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी टीम इंडिया | हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, वाय भाटिया (विकेटकीपर), रिचा घोष (विकेटकीपर), अमनजोत कौर, श्रेयंका पाटील, मन्नत कश्यप, सायका इशाक, रेणुका ठाकुर, तितास साधू , पूजा वस्त्राकर, कनिका आहुजा आणि मिन्नू मणी.
इंग्लंड टीम | लॉरेन बेल, माइया बूचियेर, एलिस कॅप्सी, चार्ली डीन, सोफिया डंकली, सोफी एक्सेलेटन, माहिका गौर, डॅनियेले गिब्सन, सारा ग्लेन, बेस हीथ, एमी जोंस, फ्रेया केम्प, हीथर नाइट, नेट स्क्विेर ब्रंट आणि डेनियेले वियाट.