4,4,4,4,4,4,4,4, Smriti Mandhana धमाका, विंडीजविरुद्ध सलग दुसरं अर्धशतक
Smiriti Mandhana Fifty : कॅप्टन स्मृती मंधाना हीने विंडिज विरुद्ध सलग दुसरं अर्धशतक ठोकलंय. स्मृतीच्या टी 20i कारकीर्दीतील हे 29 वं अर्धशतक ठरलं.
वूमन्स टीम इंडिया विरुद्ध वूमन्स वेस्ट इंडिज यांच्यात नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियममध्ये दुसरा टी 20i सामना खेळवण्यात येत आहे. या दुसऱ्या सामन्यात कर्णधार स्मृती मंधाना हीने विस्फोटक खेळी करत अर्धशतक झळकावलं आहे. स्मृतीच्या टी 20i कारकीर्दीतील हे 29 वं तर या मालिकेतील सलग दुसरं अर्धशतक ठरलं आहे. स्मृतीने या खेळी दरम्यान चौफेर फटकेबाजी केली. स्मृतीने पहिल्या सामन्याप्रमाणेच या दुसऱ्या सामन्यातही तडाखेबंद खेळी करत अर्धशतक ठोकलं.
स्मृतीने अवघ्या 37 चेंडूत 8 चौकारांच्या मदतीने 135.14 च्या स्ट्राईक रेटने हे अर्धशतक झळकावलं. स्मृतीने फक्त चौकारांच्या मदतीने 8 चेंडूत 32 धावा केल्या. त्याआधी टीम इंडियाने टॉस जिंकला. स्मृतीने बॅटिंगचा निर्णय केला. स्मृतीसोबत उमा चेत्री सलामीला आली. मात्र टीम इंडियाला 6 धावावंर पहिला झटका लागला. उमा 4 धावा करुन बाद झाली. त्यानंतर जेमिमाह रॉड्रिग्ज्स हीने 15 बॉलमध्ये 13 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. त्यामुळे टीम इंडियाचा स्कोअर हा 2 आऊट 35 असा झाला. त्यानंतर राघवी बिष्ट 5 धावांवर आऊट झाली. त्यामुळे भारताची स्थिती ही 8.1 ओव्हरमध्ये 3 आऊट 48 अशी झाली.
त्यानंतर स्मृतीने दीप्ती शर्मासह टीम इंडियाचा डाव सावरला. दोघींनी चौथ्या विकेटसाठी अर्धशतक भागीदारी केली. स्मृतीने या दरम्यान 13 व्या ओव्हरमधील शेवटच्या चेंडूवर चौकार ठोकत अर्धशतक पूर्ण केलं. स्मृतीने त्यानंतर सलग 2 षटकार ठोकले. स्मृती यासह 62 धावांवर पोहचली. मात्र त्यानंतर उलटसलट फटकेबाजी करण्याच्या नादात स्मृती आऊट झाली. ऍफी फ्लेचे हीने स्मृतीला कॅप्टन हेली मॅथ्यूज हीच्या हाती कॅच आऊट केलं.
स्मृती मंधानाची अर्धशतकी खेळी
Her 2⃣nd successive FIFTY of the series! 👏 👏
Well played, Smriti Mandhana 👍 👍#TeamIndia move closer to hundred.
Updates ▶️ https://t.co/msHanvwQsI#INDvWI | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/7pq0JVpO5D
— BCCI Women (@BCCIWomen) December 17, 2024
वूमन्स इंडिया प्लेइंग ईलेव्हन : स्मृती मंधाना (कर्णधार), उमा चेत्री, जेमिमाह रॉड्रिग्ज, रिचा घोष (विकेटकीपर), राघवी बिस्त, सजीवन सजना, दीप्ती शर्मा, राधा यादव, सायमा ठाकोर, तितास साधू आणि रेणुका ठाकूर सिंग.
वूमन्स विंडीज प्लेइंग इलेव्हन : हेली मॅथ्यूज (कर्णधार), कियाना जोसेफ, शेमेन कॅम्पबेले (विकेटकीपर), डिआंड्रा डॉटिन, चिनेल हेन्री, नेरिसा क्राफ्टन, शबिका गजनबी, जैदा जेम्स, अश्मिनी मुनिसार, ऍफी फ्लेचे आणि करिश्मा रामहरक.