WTC 2023 | वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी टीमची घोषणा, ऋषभ पंत याचा समावेश

क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी संघाची घोषणा करण्यात आली आहे. ट्विट करुन याबाबतची माहिती देण्यात आली आहे. ऋषभ पंत याचा या टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. क्रिकेट चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

WTC 2023 | वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी टीमची घोषणा,  ऋषभ पंत याचा समावेश
Follow us
| Updated on: Mar 21, 2023 | 8:05 PM

मुंबई | टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 अशा फरकाने विजय मिळवला. टीम इंडियाचा हा सलग चौथा बॉर्डर गावसकर ट्रॉफी विजय ठरला. तसेच दुसऱ्या बाजूला न्यूझीलंडने पहिल्या कसोटीत श्रीलंकेवर विजय मिळवल्याने टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये प्रेवश मिळाला. टीम इंडियाची वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनयशीप फायनलमध्ये पोहचण्याची ही सलग दुसरी वेळ ठरली. या कसोटी मालिकेनंतर टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 3 सामन्यांची मालिका खेळवण्यात येत आहे. ही मालिका सध्या 1-1 ने बरोबरीत आहे. तर तिसरा आणि निर्णायक सामना हा 22 मार्च रोजी चेन्नईमध्ये खेळवण्यात येणार आहे.

ही मालिका संपल्यानंतर 31 मार्चपासून आयपीएलच्या 16 व्या मोसमाची सुरुवात होणार आहे. त्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल सामना खेळवण्यात येणार आहे. या ट्रॉफीसाठी टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया भिडणार आहेत. या दरम्यान आता विजडन 2021-2023 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी संघाची घोषणा करण्यात आली आहे. या प्लेइंग इलेव्हनमध्ये एकूण 5 देशाच्या खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाच्या सर्वाधिक 4 खेळाडूंचा तर टीम इंडियाच्या 3 खेळाडूंचा समावेश आहे. यामध्ये ऋषभ पंत याचा समावेश करण्यात आला आहे. पंतशिवाय टीम इंडियाच्या 2 खेळाडूंना या टीममध्ये संधी मिळाली आहे.

टीममध्ये 3 भारतीय खेळाडू

विजडनने 2021-2023 मध्ये झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेतील कामगिरीच्या आधारावर 11 खेळाडूंची ही निवड करण्यात आली आहे. यामध्ये 11 खेळाडूंमध्ये टीम इंडियाचे एकूण 3 खेळाडू आहेत. यात ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जडेजा या तिघांता समावेश आहे. तर रोहित शर्मा, केएल राहुल आणि विराट कोहली यांचा समावेश नाही.

तसेच ऑस्ट्रेलियाच्या उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, पॅट कमिन्स आणि नॅथन लायन यांचा समावेश आहे. श्रीलंकेकडून दिमुथ करुणारत्ने आणि दिनेश चांदीमल यांची निवड झालीय. तर इंग्लंडकडून जॉनी बेयरस्टो आणि दक्षिण आफ्रिकेचा कगिसो रबाडा यांना संधी मिळाली आहे.

विजडन वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी टीम | उस्मान ख्वाजा, दिमुथ करुणारत्ने, मार्नस लाबुशेन, दिनेश चांदीमल, जॉनी बेयरस्टो, ऋषभ पंत, रविंद्र जडेजा, पॅट कमिंस, जसप्रीत बुमराह, कगिसो रबाडा आणि नाथन लियोन.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.