Andrew Symonds चं आयुष्य संपलं, पण त्याच्यासोबतचे दोन कुत्रे वाचले, प्रत्यक्षदर्शीने सांगितलं शेवटच्या क्षणी काय घडलं?

Andrew Symonds death: अपघाताच्यावेळी जी महिला घटनास्थळी होती, तिने सांगितलं की, सायमंड्स सोबत त्यांची दोन कुत्री सुद्धा कारमध्ये होती.

Andrew Symonds चं आयुष्य संपलं, पण त्याच्यासोबतचे दोन कुत्रे वाचले, प्रत्यक्षदर्शीने सांगितलं शेवटच्या क्षणी काय घडलं?
सायमन्डसच्या खास गोष्टी...Image Credit source: Yahoo Sports
Follow us
| Updated on: May 15, 2022 | 3:19 PM

मुंबई: ऑस्ट्रेलियाचा प्रसिद्ध क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचं (Andrew Symonds Death) काल रस्ते अपघातात निधन झालं. सायमंड्सच्या अकाली निधनाने क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. क्वीन्सलँड पोलिसांनी (Queensland Police) रविवारी सकाळी अँड्र्यू सायमंड्सच्या निधनाच्या बातमीची पृष्टी केली. अँड्र्यू सायमंड्सचं क्रिकेट खेळायचा, त्यावेळी त्याची सर्वोत्तम ऑलराऊंडर्समध्ये (All rounder) गणना व्हायची. सायमंड्स त्या तीन ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडूंपैकी आहे, ज्यांनी 5 हजार पेक्षा जास्त धावा आणि 100 पेक्षा जास्त विकेट घेतल्या. क्वीन्सलँडमधील एलिस रिव्हर ब्रिजजवळच्या हरवे रेंज रोडवर अँड्र्यू सायमंड्सच्या गाडीचा अपघात झाला. सायमंड्सची कार रस्ता सोडून पलटी झाली. पोलिसांनी ही माहिती दिली. सायमंड्सचा जीव वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, असं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं. अपघातानंतर दोन मिनिटांनी तिने सायमंड्सला कारमध्ये बघितलं.

एक कुत्रा तर खूप संवेदनशील होता

अपघाताच्यावेळी जी महिला घटनास्थळी होती, तिने सांगितलं की, सायमंड्स सोबत त्यांची दोन कुत्री सुद्धा कारमध्ये होती. या दोन्ही श्वानांचे प्राण वाचले. “एक कुत्रा तर खूप संवेदनशील होता. तो सायमंड्सला सोडून जायला तयार नव्हता” असं तिने सांगितलं. ऑस्ट्रेलियन कुरीयर मेलने तिच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे.

सायमंड्सला पाठिवर घेतलं

या महिलेसोबत एक सहकारी होता. त्याने सायमंड्सचे प्राण वाचवण्याचे प्रयत्न केले. पण त्याची नाडी बंद होती. “माझ्यासोबत असलेल्या सहकाऱ्याने सायमंड्सला कार बाहेर काढलं. स्वत:च्या पाठीवर ठेवलं. तो बेशुद्ध होता. काही प्रतिसाद देत नव्हता. नाडी चालू नव्हती” असं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं. सायमंड्स दारुच्या नशेत असल्याचे कुठलेही संकेत नाहीत, असं पोलीस निरीक्षकाने सांगितलं. पॅरामेडीकलची टीम आली, त्यावेळी स्थानिक रहिवाशी आसपास जमले होते. स्थानिकांनी त्यांना शक्य असलेली सर्व मदत केली व आपातकालीन सेवेशी लगेच संपर्क साधला. यावर्षी अकाली निधन झालेला अँड्र्यू सायमंड्स ऑस्ट्रेलियाचा तिसरा क्रिकेटपटू आहे. काही महिन्यांपूर्वी शेन वॉर्न आणि रॉड मार्श यांचं निधन झालं होतं. अँड्र्यू सायमंड्स क्रिकेट बरोबरच अनेकदा वादांमुळेही चर्चेत राहिला आहे. हरभजन आणि त्याच्यामधलं मंकी गेट प्रकरण बरच गाजलं होतं.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.