आरसीबीचा मोठा डाव! स्पर्धेपूर्वी दिग्गज खेळाडूला 30 लाखात संघात घेऊन टाकलं

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने मागच्या पर्वात वुमन्स प्रीमियर लीगचा किताब पटकावला होता. यंदा वुमन्स प्रीमियर लीगचं तिसरं पर्व आहे. यासाठी सर्व संघ सज्ज असून आरसीबीने पहिला डाव टाकला आहे. दिग्गज खेळाडूला आपल्या ताफ्यात घेतलं आहे.

आरसीबीचा मोठा डाव! स्पर्धेपूर्वी दिग्गज खेळाडूला 30 लाखात संघात घेऊन टाकलं
Follow us
| Updated on: Oct 30, 2024 | 10:30 PM

आयपीएल 2025 स्पर्धेसाठीची खलबतं सुरु असून रिटेन्शन केलेल्या खेळाडूंची यादी 31 ऑक्टोबरला बीसीसीआयकडे सुपूर्द करायची आहे. कोणते खेळाडू रिटेन होणार हे देखील आता हळूहळू स्पष्ट होत आहे. असं असताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने वुमन्स प्रीमियर लीगसाठी तयारी सुरु केली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने एका स्टार खेळाडूला युपी वॉरियर्सकडून ट्रेड केलं आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने इंग्लंडची आक्रमक फलंदाज डॅन वायटला आपल्या संघात घेतलं आहे. डॅनी वायट मागच्या पर्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा भाग होती. आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने डॅनी वायटला युपी वॉरियर्सकडून 30 लाख रुपयांना ट्रेड केलं आहे. डॅनी वायट एक दिग्गज खेळाडू असून अनेकदा तिने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता तिचं हे स्वप्न पूर्ण झालं आहे. स्मृती मंधानाच्या नेतृत्वात आता तिला खेळता येणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला यंदा जेतेपदाचा डबल धमाका करण्याची संधी आहे. नुकतंच स्मृती मंधानाने शतक ठोकून फॉर्मात असल्याचं दाखवून दिलं आहे.

डॅनी वायटने इंग्लंडसाठी आतापर्यंत 2 कसोटी, 112 वनडे आणि 164 टी20 सामने खेळले आहेत. इंग्लंडसाठी सर्वाधिक टी20 सामने खेळणारी खेळाडू आहे. तिने कसोटीत 129, वनडेत 1907 आणि टी20त 2979 धावा केल्या आहेत. टी20 मध्ये तिने 22.91 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. यात 16 अर्धशतकं आणि 2 शतकांचा समावेश आहे. टी20 वर्ल्डकपमध्ये जबरदस्त प्रदर्शन केलं होतं. चार सामन्यात 50.33 च्या सरासरीने 151 धावा केल्या होत्या. यात एका अर्धशतकाचाही समावेश होता.

डॅनी वायट यापूर्वीही अनेक कारणांमुळे चर्चेत आली होती. विराट कोहलीला लग्नासाठी प्रपोज केला होता. टीम इंडिया 2014 साली बांग्लादेश दौऱ्यावर असताना डॅनी वायटने विराट कोहलीसाठी एक पोस्ट केली होती. यात लिहिलं होतं की, कोहली माझ्याशी लग्न कर. या पोस्टमुळे तिची खूपच चर्चा झाली होती. पण नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत वायटने सांगितलं की तो एक मस्करीचा भाग होता. डॅनी वायटने नुकतंच जॉर्जी हॉजसोबत समलैंगिक विवाह केला आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.