T20 World Cup 2024, IND vs SL : नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने, कर्णधार हरमनप्रीत कौरने घेतला असा निर्णय
वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील 12वा सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात होत आहे. हा सामना भारतासाठी खूपच महत्त्वाचं आहे. या सामन्यावर भारताचं उपांत्य फेरीचं गणित अवलंबून आहे. तर श्रीलंकेने हा सामना गमावला तर स्पर्धेतून बाद होणार आहे. नाणेफेकीचा कौल हा श्रीलंकेच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यात करो या मरो असा सामना होत आहे. हा सामना भारत आणि श्रीलंकेचं स्पर्धेतील आव्हान स्पष्ट करणार आहे. जो कोणी आजचा सामना गमवेल त्याचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येणार आहे. त्यामुळे शेवटचा सामना हा नाममात्र उरणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ विजयासाठी प्रयत्नशील असणार आहेत. भारताने न्यूझीलंडविरुद्धचा पहिला सामना 58 धावांनी गमवल्याने नेट रनरेटवर मोठा परिणाम झाला आहे. त्यानंतर पाकिस्तानविरुद्ध सामना जिंकला पण नेट रनरेट काही सुधारता आला नाही. दुसरीकडे, श्रीलंकेने या स्पर्धेतील दोन्ही सामने गमावले आहेत. त्यामुळे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे असंच म्हणावं लागेल. पण आजचा सामना जिंकला तर थोड्याफार आशा राहतील. पण ही आशा देखील अशक्यप्राय असणार आहे. दरम्यान, श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला. भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर हीने क्षणाचाही विलंब न करता प्रथम फलंदाजीला प्राधान्य दिलं.
भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर हीने सांगितलं की, ‘आम्ही प्रथम फलंदाजी करणार आहोत, आतापर्यंत आम्ही प्रथम फलंदाजी केली नाही म्हणून वाटले की, आम्ही प्रथम फलंदाजी करायला हवी आणि बोर्डवर चांगली धावसंख्या उभारण्याचा मानस आहे. बरे वाटत आहे. मानेच्या दुखापतीबाबत सांगायचं तर, आपण चांगले क्रिकेट खेळलो तर कदाचित मला अधिक बरे वाटेल. आशिया चषकात आम्ही चांगले क्रिकेट खेळलो. तो एक वेगळा दिवस होता आणि फायनल हरलो. त्यांनी चांगले क्रिकेट खेळले. आम्ही आज त्याच प्लेइंग 11 सोबत खेळत आहोत ‘
दोन्ही संघांची प्लेइंग 11
भारतीय महिला (प्लेइंग इलेव्हन): शफाली वर्मा, स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, सजीवन सजना, अरुंधती रेड्डी, श्रेयंका पाटील, आशा शोभना, रेणुका ठाकूर सिंग .
श्रीलंका महिला (प्लेइंग इलेव्हन): विश्मी गुणरत्ने, चामारी अटापट्टू (कर्णधार), हर्षिता समरविक्रमा, कविशा दिलहरी, निलाक्षी डी सिल्वा, अनुष्का संजीवनी (विकेटकीपर), अमा कांचना, सुगंधिका कुमारी, इनोशी प्रियदर्शनी, उदेशिका प्रबोधनवेरा, इनोवा रनवीरा. .