वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत दक्षिण अफ्रिकेने वेस्ट इंडिजला लोळवलं, विजयासाठी दिलेलं आव्हान सहज गाठलं

वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत दक्षिण अफ्रिकेने विजयी सलामी दिली आहे. वेस्ट इंडिजचा 10 गडी राखून दणदणीत पराभव केला आहे. वेस्ट इंडिजने विजयासाठी 119 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान वोल्वार्ड-ब्रिट्स या जोडीने पूर्ण केलं.

वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत दक्षिण अफ्रिकेने वेस्ट इंडिजला लोळवलं, विजयासाठी दिलेलं आव्हान सहज गाठलं
Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Oct 04, 2024 | 6:31 PM

वुमन्स टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेतील तिसरा सामना दक्षिण अफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात रंगला. या सामन्यावर पूर्णपणे दक्षिण अफ्रिकेचं वर्चस्व दिसलं. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर दक्षिण अफ्रिकेने खेळपट्टीचा अंदाज घेतला आणि धावांचा पाठलाग करणं पसंत केलं. खरं तर या खेळपट्टीवर वेस्ट इंडिजकडून जास्त धावांची अपेक्षा होती. पण फिरकीपटू नॉनकुलुलेको म्लाबाने डोकंच वर काढू दिलं नाही. 4 षटकात 29 धावा देत 4 गडी बाद केले. तर मारिजाने कॅपने दोन गडी बाद करण्यात यश मिळवलं. त्यामुळे वेस्ट इंडिजला 20 षटकात 6 गडी गमवून 118 धावांपर्यंत मजल मारता आली. दक्षिण अफ्रिकेसाठी हे आव्हान कठीण जाईल असं वाटत होतं. पण लॉरा वोल्वार्ड आणि तझमिन ब्रिट्स या जोडीने विजय सोपा केला. पहिल्या विकेटसाठी त्यांनी विजयी धावांची भागीदारी केली. दोघांनी आपलं अर्धशतक झळकावलं. वेस्ट इंडिजने विजयासाठी दिलेलं 119 धावांचं आव्हान दक्षिण अप्रिकेने 18 षटकातच पूर्ण केलं.

कर्णधार लॉरा वोल्वार्डने 45 चेंडूत 50 धावा केल्या. या खेळीत तिने 7 चौकार मारले. तर तझमिन ब्रिट्सनेही 45 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. या दोघांच्या खेळीमुळे दक्षिण अफ्रिकेचा विजय पक्का झाला होता. वेस्ट इंडिजचे गोलंदाज या दोघांच्या खेळीपुढे पुरते हतबल झाल्याचं दिसून आलं. काही चमत्कार होईल अशी आशा बाळगून चाहते होते. पण तसं काहीच झालं नाही. दक्षिण अफ्रिकेने सहज विजय मिळवला. साखळी फेरीत प्रत्येक सामन्याचं महत्व आहे. कारण प्रत्येक संघाच्या वाटेला 4 सामने आहेत. त्यामुळे उपांत्य फेरी गाठायची तर तीन सामने जिंकणं आवश्यक आहे.

दक्षिण अफ्रिकेने वेस्ट इंडिजला कमी षटकात पराभूत केल्याने नेट रनरेटमध्ये जबरदस्त फायदा झाला आहे. ब गटात दक्षिण अफ्रिकेने गुणतालिकेत अव्वल स्थान गाठलं आहे. तर बांगलादेशचा संघ दुसऱ्या क्रमांकावर ढकलला गेला आहे. दक्षिण अफ्रिकेचा पुढचा सामना इंग्लंडशी होणार आहे. हा सामना 7 ऑक्टोबरला होणार आहे. या सामन्यात दक्षिण अफ्रिकेची कसोटी लागणार आहे. वेस्ट इंडिजचा पुढचा सामना 6 ऑक्टोबरला स्कॉटलंडशी होणार आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.