VIDEO : MS Dhoni आणि Harmanpreet Kaur च्या ‘त्या’ Video ने कोट्यवधी फॅन्सचे डोळे पाणावले

INDW vs AUSW T20 WC Semifinal : प्रत्युत्तरात भारताकडून हरमनप्रीत कौरने सर्वाधिक 52 धावा केल्या. या सामन्यात हरमनप्रीत क्रीजवर टीकली असती, तर टीम इंडियाचा विजय झाला असता.

VIDEO :  MS Dhoni आणि Harmanpreet Kaur च्या 'त्या' Video ने कोट्यवधी फॅन्सचे डोळे पाणावले
Harmanpreet Kaur Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Feb 24, 2023 | 7:46 AM

INDW vs AUSW T20 WC Semifinal : भारताच पुन्हा एकदा वर्ल्ड चॅम्पियन बनण्याच स्वप्न मोडलं. महिला T20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला 5 धावांनी हरवलं. भारताला विजयासाठी 173 धावांच टार्गेट मिळालं होतं. प्रत्युत्तरात भारताकडून हरमनप्रीत कौरने सर्वाधिक 52 धावा केल्या. या सामन्यात हरमनप्रीत क्रीजवर टीकली असती, तर टीम इंडियाचा विजय झाला असता. पण ती रनआऊट झाल्याने कोट्यवधी भारतीयांच मन मोडलं. तिच्या रनआऊटचा व्हिडिओ व्हायरल होतोय. यााआधी एमएस धोनीचा असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. जो पाहून आजही भारतीय फॅन्सचे डोळे पाणावतात.

शेफाली वर्मा, स्मृती मांधना आणि यास्तिका भाटिया लवकर आऊट झाल्यानंतर कॅप्टन हरमनप्रीत कौरने टीम इंडियाचा डाव सावरला. अर्धशतक ठोकून टीमच्या विजयाची आशा कायम ठेवली. पण सामन्याच्या महत्त्वाच्या टप्प्प्यावर 15 ओव्हरच्या 5 व्या चेंडूवर रनआऊट झाली.

भारतासाठी मोठा झटका होता

हरमनप्रीतची बॅट क्रीजमध्ये रुतली, त्यामुळे वेळेत ती क्रीजमध्ये पोहोचू शकली नाही. तिला पॅव्हेलियनमध्ये परताव लागलं. हरमनप्रीतची विकेट हा भारतासाठी मोठा झटका होता. कॅप्टन हरमनप्रीतला सुद्धा त्याची पुरेपूर कल्पना होती. हरमनप्रीत आऊट झाल्यानंतर पुन्हा एकदा भारताचा डाव गडगडला. आऊट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतताना निराशा तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.

View this post on Instagram

A post shared by ICC (@icc)

धोनीच्या रनआऊटची आठवण

हरमनप्रीतच्या रनआऊटने प्रत्येकाला एमएस धोनीची आठवण करुन दिली. आयसीसीने हरमनप्रीत आणि एमएस धोनीच्या एकत्रित रनआऊटचा व्हिडिओ शेअर केलाय. या रनआऊटमुळे कोट्यवधींच मन मोडलं, असं कॅप्शन आयसीसीने या व्हिडिओला दिलय. 2019 च्या वनडे वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये भारताचा डाव अडचणीत सापडला होता. त्यावेळी एमएस धोनीने डाव सावरला. भारताने या सामन्यात पुनरागमन केलं. अनेकांचे डोळे पाणावले

धोनीमुळे टीम इंडियाने फक्त मॅचमध्येच पुनरागमन केलं नाही, तर टीम विजयाच्या जवळ पोहोचली होती. तो 50 धावांवर बॅटिंग करत होता. त्यावेळी डीपवरुन मार्टिन गप्टिलच्या डायरेक्ट थ्रो वर धोनी रनआऊट झाला. धोनी बाद होताच भारतीय ड्रेसिंग रुमसह संपूर्ण देशात सन्नाटा पसरला. पॅव्हेलियनमध्ये परतताना धोनीचे डोळे भरुन आले होते. धोनी सारखीच आता हरमनप्रीत रनआऊट झाली. ज्यामुळे कोट्यवधी भारतीयांच मन मोडलं.

सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....